एक्स्प्लोर
त्यावेळी माया कोडनानी माझ्यासोबत विधानसभेत होत्या, शाहांची कोर्टात साक्ष
18 सप्टेंबरच्या सुनावणीवेळी, कोर्टाने अमित शाहांना समन्स बजावून कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आज अमित शाह कोर्टात हजर राहिले.
गांधीनगर: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आज, नरोदा दंगलप्रकरणी अहमदाबादच्या विशेष एसआयटी कोर्टात हजेरी लावली. दंगलीदरम्यान माजी मंत्री माया कोडनानी विधानसभेतच उपस्थित होत्या, असा जबाब अमित शाह यांनी कोर्टात दिला.
18 सप्टेंबरच्या सुनावणीवेळी, कोर्टाने अमित शाहांना समन्स बजावून कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आज अमित शाह कोर्टात हजर राहिले.
अमित शाह कोर्टात साक्षीदार म्हणून हजर होते. अमित शाहांनी कोर्ट रुममध्ये माया कोडनानी या दंगलीवेळी विधानसभेतच असल्याची साक्ष, न्यायाधींशासमोर दिली.
अमित शाहांच्या या साक्षीमुळे माया कोडनानींना मोठा दिलासा मिळू शकतो.
गोध्रा जळीतकांडानंतर 2002 मध्ये नरोदा पाटिया हत्याकांड झालं होतं. यामध्ये 97 जणांचा मृत्यू झाला होता. या दंगल प्रकरणात गुजरातमधील तत्कालिन मोदींच्या मंत्रिमंडळातील सहकारी माया कोडनानी या मुख्य आरोपी आहेत.
माया कोडनांना 28 वर्षांची शिक्षा
गुजरातमधील नरोदा-पाटिया हत्याकांडप्रकरणात न्यायालयाने 31 जणांना शिक्षा सुनावली आहे. याप्रकरणी माजी मंत्री माया कोडनानीला 28 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर बजरंगदलाचे माजी नेते बाबू बजरंगीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. याशिवाय इतर 29 आरोपींनाही जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
काय होती नरोदा पाटिया दंगल?
गोध्रा जळीतकांडानंतर गुजरातमध्ये दंगली भडकल्या, या दरम्यान 28 फेब्रुवारी 2002 रोजी नरोदा पाटियात 97 लोकांची हत्या करण्यात आली.
नरोदा पाटिया हत्याकांड प्रकरणात तत्कालिन मोदी सरकारमधील माजी मंत्री आणि नरोदाचे आमदार माया कोडनानी, बजरंग दलचे माजी नेते बाबू बजरंगी, स्थानिक भाजप नेते बिपिन पांचाळ, किशन कोरानी, अशोक सिंधी आणि वकील राजू चौमाल यांच्यासह 61 आरोपी आहेत.
नरोदा पाटिया हत्याकांड प्रकरणाची कारवाई ऑगस्ट 2009 मध्ये सुरू झाली होती. यात 62 आरोपींच्या विरोधात आरोप दाखल करण्यात आले. यात सुनावणी दरम्यान यापूर्वी एका आरोपीचा मृत्यू झाला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
बीड
क्राईम
राजकारण
Advertisement