एक्स्प्लोर

उत्तराखंडमध्ये दरड कोसळली, औरंगाबादच्या 102 भाविकांसह 15 हजार जण अडकले

देहरादून: उत्तराखंडमध्ये मोठ्या प्रमाणात दरड कोसळल्यामुळे जवळपास 15 हजार भाविक अडकले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील औरंगाबादच्या 102 भाविकांचाही समावेश आहे. औरंगाबादमधील 102 भाविक रूद्रप्रयागमध्ये अडकले असल्याची माहिती मदत व पुनर्वसनमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.  सर्व भाविक सुखरूप असून राज्य सरकराच्या संपर्कात असल्याचंही त्यांनी 'एबीपी माझा'ला सांगितलं.

"आम्ही उत्तराखंडमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील भाविकांच्या संपर्कात आहोत.

औरंगाबादचे सर्व 102 भाविक सुखरुप आहेत.

स्थानिक प्रशासनाच्या मदतीने सर्वांना हॉटेलपर्यंत पोहोचवलं आहे.

लवकरच ते महाराष्ट्रात परततील",

असं चंद्रकांतदादा म्हणाले.

  दोन दिवस रस्ता बंद? दरड कोसळल्यामुळे बद्रीनाथचा रस्ता बंद झाला असून तो पुन्हा सुरु करण्यासाठी दोन दिवस लागण्याची शक्यता आहे. विष्णूप्रयाग परिसरातील हाथी पर्वत भागात भूस्खलन होऊन 15 हजार भाविक अडकले आहेत. चामोली जिल्ह्यातील जोशीमठ भागापासून 9  किलोमीटर अंतरावर भूस्खलन झालं. भूस्खलनानंतर रस्त्यावर पडलेल्या ढिगाऱ्यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे. रस्त्यावरील मातीचे ढिगारे हटवून वाहतूक लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे बद्रिनाथकडे जाणारी वाहतूक पूर्ववत होण्यास वेळ लागणार आहे. चार धाम यात्रेला सुरुवात झाल्याने उत्तराखंडमध्ये मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी झाली आहे. लातूर जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन दरम्यान, लातूरमधील भाविक उत्तराखंड परिसरात अडकले असल्यास त्यांच्या नातेवाईकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. लातूर जिल्ह्यातून काही भाविक उत्तराखंड येथे या परिसरात असल्यास संबंधित नातेवाईकांनी तत्काळ लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियंत्रण कक्षास माहिती द्यावी. 02382 220204/टोल फ्री 1077 ,  या नंबरवर संपर्क साधावा, असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे.  उस्मानाबाद जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन बद्रीनाथ येथे झालेल्या "लँड स्लाइड" मुळे उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीत उस्मानाबाद जिल्ह्यातीलही काही नागरीक अडकले आहेत. तरी  माहितीकरिता त्यांच्या नातेवाईकांनी 02472-225618 / 227301 या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाने केले आहे. डोंगरकडा कोसळला  शुक्रवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास जोशीमठापासून 9 किमी अंतरावर, विष्णूप्रयागजवळ डोंगरकडा कोसळला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र मोठा कडा थेट रस्त्यावर कोसळल्यामुळे हा रस्ताच बंद झाला. जवळपास 150 मीटर भाग पूर्णपणे उद्ध्व्स्त झाला. गेल्या दोन दिवसांपासून हा डोंगरकडा धोकादायक स्थितीत होता. दरम्यान, भाविकांना दुर्घटनास्थळापासून 200 मीटर मागे रोखण्यात आलं आहे. प्रवासी अडचणीत भूस्खलनामुळे देशभरातील जवळपास 15 हजार भाविक बद्रीनाथ धाम रस्त्यावर अडकले आहेत. उत्तराखंड सरकारने या भाविकांच्या राहण्याची व्यवस्था करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. तसंच भाविकांना आहे तिथेच थांबण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. याशिवाय रस्त्यावर उभ्या असलेल्या गाड्याही आहे त्याच परिस्थितीत रोखण्यास सांगितलं आहे. काही भाविक तर बद्रीनाथकडे पोहोचलेही नाहीत, ते परतण्याच्या तयारीत आहेत. यापूर्वीही भूस्खलन यापूर्वी 2015 मध्येही भूस्खलन झालं होतं. त्यावेळी हा रस्ता जवळपास आठवडाभर बंद होता. त्यावेळी सरकारने भाविकांना बाहेर काढण्यासाठी सबसिडी तत्त्वावर हेलिकॉप्टर यात्रा सुरु केली होती. आता मात्र हा रस्ता 2 दिवसात सुरळीत होईल, असा दावा करण्यात येत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget