एक्स्प्लोर
दिल्लीच्या राष्ट्रीय संग्रहालय इमारतीला आग, मोठं नुकसान
नवी दिल्ली : दिल्लीतल्या 'नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री'च्या इमारतीला लागलेल्या भीषण आगीत म्युझियमधील वस्तू जळून खाक झाल्या आहेत. फिक्की (FICCI) ऑडिटोरियमच्या शेजारी असलेल्या इमारतीला सोमवारी रात्री उशिरा आग लागली.
सर्वात वरच्या म्हणजे सहाव्या मजल्यावरुन सुरु झालेल्या या आगीने संपूर्ण इमारतीला वेढा घातला. आगीने रौद्र रुप धारण केलं आणि आग खालच्या मजल्यांवर पसरत गेली.
1978 मध्ये या संग्रहालयाचं उद्घाटन झालं होतं. इथे झाडं, वन्य जीव, खनिजं यांसारख्या नैसर्गिक स्त्रोतांविषयी माहिती दिली जाते. इमारतीच्या पहिल्या तीन मजल्यांवर नॅशनल म्युझियमची कलेक्शन गॅलरी आणि प्रदर्शनं असतात, तर चौथ्या मजल्यावर नूतनीकरणाचं काम सुरु होतं. पाचव्या आणि सहाव्या मजल्यावर संग्रहालयातील अधिकारी आणि शास्त्रज्ञांची कार्यालयं आहेत.
अग्निशमन दलाच्या 11 गाड्यांनी घटनास्थळी धाव घेत ही आग आटोक्यात आणली. सुदैवाने याती जीवितहानीचं कोणतंही वृत्त नसलं तरी संग्रहालयाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement