Success story : मोमोज विकून दोन हजार कोटींचा मालक, सागरची यशोगाथा तुम्हालाही प्रेरणा देईल
Success story : मोमोज (Momos) विकून तो कोट्यवधी रुपयांची कमाई करतोय. तीस हजार रुपयांत सुरु केलेली कंपनी आज दोन हजार कोटींची झाली आहे.
नवी दिल्ली : शहरातील प्रत्येक खाऊ गल्लीमध्ये मोमोज (Momos) विक्रीसाठी उपलब्ध असतात. ते खाता खाता तुम्ही तो किती कमवत असेल.. याचा विचारही कधीतरी केला असेलच. अंदाजे महिन्याला तो दुकानदार 30-40 हजार रुपयांची कमाई करत असेल. पण एका तरुणाने मोमोज (Momos)चा व्यवसाय करत तब्बल 2000 कोटी रुपयांची कंपनी उभारली... तो दिवसाला सहा लाखांपेक्षा जास्त मोमोज (Momos) विकतो.. महिन्याला कोट्यवधी रुपयांची कमाई करतो... होय... कोलकात्याच्या वॉव मोमो (Wow Momo)चा सह संस्थापक सागर दरयानी (Sagar Daryani) याची सक्सेस स्टोरी सध्या चर्चेचा विषय आहे. मोमोज (Momos) विकून तो कोट्यवधी रुपयांची कमाई करतोय. तीस हजार रुपयांत सुरु केलेली कंपनी आज दोन हजार कोटींची झाली आहे. सागरची यशोगाथा पाहूयात...
30000 रुपयांनी सुरुवात -
प्रत्येक आई-वडिलांना आपला मुलगा चांगले शिकून डॉक्टर, इंडिनिअर, आयएएस अथवा चांगला नोकरदार व्हावा असेच वाटत असते. मध्यमवर्गीय कुटुंबातील आई-वडिलांच्या मोठ्या आपेक्षा नसतात, मुलाला चांगली नोकरी असावी, हीच माफक आपेक्षा त्यांची असते. सागरच्या आई-वडिलांचीही अशीच आपेक्षा होती. पण सागरला वेगळे काही करायचे होते. सागरने मोमोड विकण्याचा निर्णय घेतला होता. हे एकताच वडिलांना राग अनावर झाला होता. ते त्याला वारंवार टोमणे मारत होते. सागरचे शिक्षण कोलकाता येथील सेंट जेव्हियर्स कॉलेजमध्ये झालेय. पदवीच्या अखेरच्या वर्षाला असताना त्याने मोमोज विकण्याचा व्यावसाय करायचाय, असे सागरने वडिलांना सांगितले. त्यानंतर त्याच्या वडिलांची पायाखालील जमीन सरकली. वडिलांनी सागरला समजावण्याचा प्रयत्न केला. पण सागर त्याच्या निर्णायावर ठाम होता. 2008 मध्ये सागर आणि त्याचा मित्र बिनोद यांनी मोमोज विकण्याचे पहिले पाऊल उचलले. दोन्ही मित्रांनी वॉव मोमो नावाचे छोटे दुकान टाकून मोमोज विकण्याचा व्यावसाय सुरु केला. दोघांनी 30 हजार रुपयांची गुंतवणूक करत एक सिंगल टेबल आणि दोन पार्ट टायम शेफ याच्यासोबत व्यावसायाला सुरुवात केली होती.
कुठून मिळाली आयडिया -
कॉलेजमध्ये असताना रात्री भूक लागल्यानंतर सागर आणि त्याचे मित्र मॅगी, डोमिनोज पिज्जा आणि बर्गर ऑर्डर करायचे.. एकदिवस अचानक मोमोज विकण्याची आयडिया डोक्यात आली. विदेशातून येऊन लोक भारतात व्यवसाय करतात, आपण का नाही? हे सागरच्या डोक्यात बसले होते. त्यानंतर व्यावसाय काय करायचा, कसा करायचा यावर त्याने काम सुरु केले. सागरच्या घराजवळच मोमोजचा एक स्टॉल होता. त्या स्टॉलवर लोकांची गर्दी असायची... मोमोज खाण्यासाठी लांबच लांब रांगा लागायच्या...हे सगळे पाहून सागरच्या डोक्यात मोमोजला ब्रँड करायचे डोक्यात आले... त्यानंतर मित्राच्या मदतीने वॉव मोमोज (Wow Momos) ची सुरुवात केली.
चढ-उतारानंतर यशाची चव चाखली -
वॉव मोमोच्या माध्यमातून मोमोज विकण्याचा व्यावसाय तर सुरु केला... पण यश मिळाले नाही. दोन वर्ष चढ उताराचा सामना केला. दोन वर्ष लोक मोमोजसाठी त्यांच्या स्टॉलवर येतच नव्हते.. त्यानंतर त्यांना एक आयडिया आली... त्या दोघांनी वॉव मोमोज नावाचा टी शर्ट छापला. त्यावर त्यांच्या कंपनीचा लोगोही होता. ते कुठेही जाऊ देत... तो टी शर्ट घालूनच जात होते.. त्यानंतर हळू हळू लोकांची गर्दी व्हायला सुरुवात झाली. त्याशिवाय स्टीम मोमोजशिवाय तंदूरी मोमोज, कॉकलेज मोमोज, फ्राय मोमोज यासारख्या व्हरायटी लोकांना देऊ लागले. त्यांची ही आयडिया यश देऊन गेली. लोकांची गर्दी वाढली.
कोलकाता येथून सुरु केलेला हा व्यवसाय हळू हळू इतर शहरात पसरला.. छोटे दुकान आऊटलेटमध्ये बदलले.. देशबरात वॉव मोमोच्या फ्रेंचायजी आऊटलेट्स उघडले गेले. आज भारतभर वॉव मोमोच्या माध्यमातून सहा लाख मोमोज विकले जातात. 26 राज्यात 800 पेक्षा जास्त ठिकाणी वॉव मोमोच्या फ्रेंचायजी आहेत. 30000 रुपयांपासून सुरु झालेल्या कंपनीची किंमत आज 2000 कोटींपेक्षा जास्त झाली. सागर दिवसाला 40 कोटींची कमाई करतो. सागर आणि त्याच्या मित्राने कोणत्याही कामाला लहान समजले नाही, अपयश आल्यावर थांबला नाही... त्यामुळेच आज तो कोट्यवधीचा मालक आहे. सागरचा प्रवास आज सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे.
आणखी वाचा :