(Source: ECI/ABP News/ABP Majha)
VIDEO : बर्फांची चादर अन् जज्बा! बर्फवृष्टीत शिवरायांना सलाम, जवानाचा जम्मू काश्मिरमधील व्हिडीओ व्हायरल
बर्फामध्ये एका जवानचा छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडीओ सध्या खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
VIDEO Viral : सर्वत्र कडाक्याची थंडी पडली आहे. लोक थंडीपासून वाचण्यासाठी शेकोटीचा आधार घेत आहेत. अनेकजण घराच्या बाहेरच पडत नाहीयेत. मात्र देशाच्या रक्षणासाठी जवानांना अशा थंडीत पहारा द्यावा लागतोय तिथं बर्फवृष्टी होत आहे. जम्मू-काश्मीरच्या कुपवाडाच्या माछिल सेक्टरमध्ये (Macchil sector of Kupwara) बर्फामध्ये भारतीय जवान तैनात आहेत. या ठिकाणी काम करत असताना जवानाच्या अनोख्या जज्ब्याचं एक उदाहरण समोर आलं आहे. बर्फामध्ये एका जवानचा छत्रपती शिवाजी महाराजांना ( chhatrapati Shivaji Maharaj statute) मुजरा करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडीओ सध्या खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे स्फूर्ती देणारं व्यक्तिमत्व. त्यांच्या व्यक्तिमत्वाची प्रेरणा महाराष्ट्रचं नव्हे तर देशदुनियेतील अनेक राष्ट्रांमधील लोक घेत असतात. त्यांनी घडवलेल्या इतिहासाची उदाहरणं वेळोवेळी दिली जातात आणि त्यातून प्रेरणा घेतली जाते. सीमेवर देशाच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले आपले जवान देखील नेहमी शिवरायांचा जयघोष करत असतात आणि शत्रूंशी मुकाबला करताना प्रेरणा देखील घेत असतात.
बर्फवृष्टी होत असताना आणि चोहीबाजूला बर्फाची चादर असताना एक जवान छत्रपती शिवरायांना उत्साहाने मुजरा घालत असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. हा जवान कुपवाडामधील माछिल सेक्टरमध्ये कार्यरत आहे. अद्याप या जवानाचे नाव समजू शकलेलं नाही. मात्र या निमित्तानं जवानावर कौतुकाचा वर्षाव होत असून लोक हा व्हिडीओ शेअर करत त्या जवानाला देखील सलाम करत आहेत.
माछिल सेक्टर हा कुपवाडामधील सर्वात धोकादायक भाग मानला जातो. या ठिकाणी नेहमीच पाकिस्तानकडून घुसखोरीच्या घटना घडत असतात. तसेच अनेकदा या ठिकाणी हल्ल्यांच्या बातम्या देखील येत असतात. या ठिकाणी शिवाजी महाराजांचा एक पूर्णाकृती अश्वावर स्वार असलेला पुतळा आहे. याकडून जवान प्रेरणा घेत विपरित परिस्थितीला सामोरे जाण्यास नेहमीच सज्ज असतात.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
इतर महत्वाच्या बातम्या