एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'कश्मीर तो होगा लेकिन पाकिस्तान नही होगा' म्हणणाऱ्या जवानाला धमकी
नवी दिल्ली: उरी हल्ल्यानंतर हिमाचल प्रदेश पोलीस दलातील एका जवानाने सादर केलेल्या कवितेने कोट्यवधी भारतीयांच्या मनामध्ये राष्ट्र चेतनेचं स्फूरण चढवलं होतं. त्याने 'कश्मीर तो होग लेकिन पाकिस्तान नही होगा' या कवीतेतील या शेवटच्या शब्दांचा व्हिडिओ उरी हल्ल्यानंतर कमालीचा व्हायरल झाला होता. पण ही कविता सादर करणाऱ्या जवानाला दहशतवाद्यांकडून धमक्या मिळत आहेत.
उरी हल्ल्यानंतर हिमाचल प्रदेशच्या पोलीस दलातील कॉन्स्टेबल मनोज कुमारने सादर केलेली कविता सोशल मीडियावर कमालीची व्हायरल झाली होती. या कवितेत त्याने दहशतवाद्यांना चांगलेच फटकारले होते. तसेच दहशतवाद्यांना पाठीशी घालणाऱ्या पाकिस्तानला ललकारले होते. या व्हायरल व्हिडिओमुळे मनोज कुमार हा कोट्यावधी भारतीयांच्या गळ्यातला ताईत बनला होता.
पण आता त्याला दहशतवाद्यांकडून धमक्या मिळत आहेत. मनोज कुमारने याबाबतची माहिती आपल्या फेसबुकवरुन दिली. विशेष म्हणजे, जर त्यांच्याशी आमना सामना झाला तर मोठं वादळ येईल असं त्यानं फेसबूक पोस्टवर लिहलं आहे.
व्हिडिओ पाहा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
राजकारण
Advertisement