Mann Ki Baat | सकाळी 11 वाजता पंतप्रधानांची 'मन की बात'; मोदी काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष
देशातील कोरोना बाधितांचा आकडा एक हजार पार गेला आहे. देशात एकूण 1029 कोरोनाग्रस्त आहेत. तर आतापर्यंत कोरोनामुळे 19 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशातील सर्वाधिक कोरोनाचे रूग्ण महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात एकूण 186 कोरोना बाधित आहेत.
नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या दहशतीखाली संपूर्ण जग आहे. अशातच भारतातही कोरोना व्हायरस फोफावत जात आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मन की बात या कार्यक्रमामार्फत जनतेला संबोधित करणार आहेत. यामुळे नव्या वर्षातील पंतप्रधानांचं हे तिसरं संबोधन असणार आहे. यंदाच्या मन की बातमध्ये जगभरासह देशात फोफावत असलेल्या कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाबाबत नरेंद्र मोदी चर्चा करणार आहेत. नेहमीप्रमाणे मन की बातचा कार्यक्रम सकाळी 11 वाजता आकाशवाणी, दूरदर्शन आणि नरेंद्र मोदी मोबाईल अॅपमार्फत प्रसारित करणात येणार आहे.
भारतासह संपूर्ण देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशन कोरोना व्हायरसला जागतिक महामारी म्हणून घोषित केलं आहे. भारतातही हा व्हायरस फोफावत असल्याचं पाहायला मिळत आहे. देशातील कोरोना बाधितांचा आकडा एक हजार पार गेला आहे. देशात एकूण 1029 कोरोनाग्रस्त आहेत. तर आतापर्यंत कोरोनामुळे 19 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशातील सर्वाधिक कोरोनाचे रूग्ण महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात एकूण 186 कोरोना बाधित आहेत.
पाहा व्हिडीओ : हायड्रोक्सीक्लोरिक्विन औषधाने कोरोनाचा प्रभाव घटतो : संशोधक
दरम्यान, असं सांगण्यात येत आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावासोबतच देशात सुरू असलेल्या 21 दिवसांच्या लॉकडाऊन संदर्भातही चर्चा करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी देशात लॉकडाऊनची घोषणा केली होती. त्यामुळे संपूर्ण देशात जीवनावश्यक वस्तूंची दुकानं आणि सेवा वगळता इतर सर्व गोष्टी बंद करण्यात आल्या आहेत. देशातील रेल्वे सेवाही बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे हातावरचं पोट असणाऱ्या लोकांचे हाल होत आहेत. तर अनेकांना आपलं पोट भरणंही अशक्य आहे. त्यामुळे मोदी आपल्या मन की बातमधून या मुद्यांवर चर्चा करण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या :
IndiaFightsCorona | कोरोनाविरोधात लढ्यासाठी दानशूरांचे हात सरसावले, मदतीचा ओघ सुरु
Coronavirus | कोरोना व्हायरसच्या लढ्यात भाजपचा मदतीसाठी मास्टर प्लॅन तयार
Coronavirus | कोरोना व्हायरसच्या लढ्यात भाजपचा मदतीसाठी मास्टर प्लॅन तयार
लढा! कोरोनाशी | दानशूर रतन टाटा यांच्याकडून तब्बल 1500 कोटींची मदत जाहीर