एक्स्प्लोर

Melghat Food Poisoning : मेळघाटात आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, टिटंबानंतर आता बिजुधावडी आश्रमशाळेत 50 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा

Melghat Ashram School Poisoning : अमरावतीच्या मेळघाटात टिटंबा आश्रमशाळेतील विषबाधेच्या घटनेनंतर आज पुन्हा बिजुधावडी येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत दूषित अन्नामुळे विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली आहे.

अमरावती : अमरावतीच्या मेळघाट भागातील आश्रमशाळांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी गंभीर खेळ सुरू असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. शनिवारी टिटंबा येथील आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना ताजी असतानाच, रविवारी बिजुधावडी येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत 40 ते 50 विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाच्या जेवणामुळे विषबाधा झाली आहे. विशेष म्हणजे राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके हे स्वतः रविवारी दुपारपासून धारणी आणि टिटंबा भागाच्या दौऱ्यावर असतानाच ही दुसरी मोठी घटना घडल्याने सर्वत्र तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Central Kitchen Stale Food : टेंबली सेंट्रल किचनमधून आलेले शिळे अन्न कारणीभूत?

टिटंबा आणि बिजुधावडीसह परिसरातील इतर तीन आश्रमशाळांना दररोजचे जेवण हे 'टेंबली' येथील मध्यवर्ती स्वयंपाकघरातून (Central Kitchen) पुरवले जाते. शनिवारी विद्यार्थ्यांना अत्यंत निकृष्ट आणि शिळे अन्न पुरवण्यात आल्याचा आरोप पालकांनी आणि स्थानिकांनी केला होता. रविवारीदेखील त्याच सेंट्रल किचनमधून जेवण पुरवण्यात आले आणि ते खाल्ल्यानंतर विद्यार्थ्यांना मळमळ, उलट्या व पोटदुखीचा त्रास सुरू झाला. यावरून मध्यवर्ती स्वयंपाकघरातील अन्न शिजवण्याच्या पद्धतीवर आणि गुणवत्तेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

Bijudhawadi Food Poisoning : बिजुधावडी रुग्णालयात उपचार सुरू

विषबाधा झालेल्या 40 ते 50 विद्यार्थ्यांना तात्काळ बिजुधावडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातून रुग्णवाहिका (Ambulances) आणि इतर वैद्यकीय पथके तात्काळ बिजुधावडीकडे रवाना करण्यात आली असून विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत.

Melghat Ashram School Poisoning : चौकशीची मागणी

या प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते रमेश तोटे यांनी आदिवासी मंत्र्यांवर आरोप केले आहेत. राज्यात अनेक ठिकाणी सुरू असलेलं सेट्रल किचन बंद करण्यात यावं असं पत्र आपण या आधीच दिलं होतं. हे जवळपास 1000 हजार कोटींचे बजेट असून आदिवासी मंत्र्यांनी यामध्ये पैसे खाल्ल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 

एकापाठोपाठ एक घडलेल्या या दोन विषबाधेच्या घटनांमुळे शासकीय आदिवासी आश्रमशाळांमधील अन्नाच्या गुणवत्तेचा आणि प्रशासकीय देखरेखीचा प्रश्न पुन्हा एकदा अत्यंत गंभीरपणे ऐरणीवर आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी आणि कंत्राटदारावर कडक कारवाई करण्याची मागणी आदिवासी बांधव आणि विविध संघटनांकडून केली जात आहे.

ही बातमी वाचा:

एबीपी माझाच्या स्थापनेपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात
Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
PM Modi Independence Day speech: भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
Advertisement

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात
Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
PM Modi Independence Day speech: भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Embed widget