एक्स्प्लोर

'अंजिठा लेण्यांचा वारसा डिजिटल होणार', पंतप्रधान मोदींची Mann ki Baat मध्ये घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी 'मन की बात' (Mann Ki Baat) कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधला. आपली एक अतिशय प्राचीन काळातली देवी अन्नपूर्णा मातेची मूर्ती कॅनडावरून परत भारतात येतेय अशी माहिती पंतप्रधान मोदींनी दिली.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी 11 वाजता 'मन की बात' रेडिओ कार्यक्रमाद्वारे संवाद साधत असतात. आज 29 नोव्हेंबर रोजी त्यांनी 'मन की बात' (Mann Ki Baat) कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधला. त्यांनी मन की बातच्या सुरुवातीलाच एक आनंदाची बातमी शेअर केली. आपली एक अतिशय प्राचीन काळातली देवी अन्नपूर्णा मातेची मूर्ती कॅनडावरून परत भारतात येतेय. ही मूर्ती जवळपास 100 वर्षांपूर्वी वाराणसीच्या एका मंदिरातून चोरून बाहेर पाठवली होती, अशी माहिती पंतप्रधान मोदींनी दिली.

अंजिठ्याच्या लेण्यांचा वारसाही डिजिटल होणार

मोदी म्हणाले की, अंजिठ्याच्या लेण्यांचा वारसाही डिजिटल करण्यात येत आहे. यामध्ये अजिंठा लेण्यांची संपूर्ण झलक पाहायला मिळेल. यामध्ये डिजिटलाइज्ड आणि पुन्हा स्थापन केलेल्या कलाकृती यांच्या बरोबरच यासंबंधित दस्तऐवज आाणि अनेकांनी व्यक्त केलेल्या शब्दभावना, यांचाही समावेश असेल, असंही ते म्हणाले.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, दिनांक 12 नोव्हेंबरपासून डॉक्टर सलीम अलीजी यांच्या 125 व्या जयंतीच्या कार्यक्रमाला प्रारंभ झाला आहे. डॉक्टर सलीम अली यांनी पक्ष्यांच्या दुनियेमध्ये, पक्षी निरीक्षणासंबंधी अतिशय उल्लेखनीय कार्य केलं आहे.

मोदींच्या संवादातील महत्वाचे मुद्दे - न्यूझीलँडमध्ये नव्यानं निवडून आलेले संसद सदस्य डॉ. गौरव शर्मा यांनी या विश्वातल्या सर्वात प्राचीन भाषांपैकी एक असलेल्या संस्कृत भाषेतून शपथ घेतली. मी गौरव शर्मा जी, यांना शुभेच्छा देतो.

- लंगरची प्रथा सुरू करणारे गुरू नानकदेवजीच होते. आणि आज आपण पाहिलं की, दुनियाभरामध्ये शीख समुदायाने कोरोना काळामध्ये लोकांना भोजन देऊन कशा प्रकारे आपली परंपरा सुरू ठेवली आहे. मानवतेची सेवा केली. ही परंपरा आपल्या सर्वांना निरंतर प्रेरणा देण्याचे काम करते.

- युवा मित्रांनो,आपण जोपर्यंत शिक्षण घेत असतो, तोपर्यंतच, आपण त्या संस्थेचे विद्यार्थी असतो, मात्र आपण आजन्म तिथले ‘माजी विद्यार्थी’ असतो. दोन गोष्टी कधीही संपत नाहीत- एक आपल्या शिक्षणाचा आपल्यावरचा प्रभाव आणि दुसरी आपल्या शाळा-कॉलेजविषयी असलेली आत्मीयता!

2014 पासून सतत करत आहेत मन की बात पंतप्रधान झाल्यापासून नरेंद्र मोदी यांनी रेडिओवर ‘मन की बात’ कार्यक्रमाची सुरुवात केली होती. ऑक्टोबर 2014 मध्ये मोदींनी मन की बातची सुरुवात केली होती. पंतप्रधान मोदी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवार मन की बातद्वारे संवाद साधत असतात.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde on Uddhav Thackeray  | जे गेटमधून बाहेर निघत नव्हते ते शेताच्या बांधावर पोहोचले, शिंदेंची टीकाManoj Jarange Parbhani : लोकसभेत धडा मिळाला, आता अंत पाहू नका, मराठा महिलांचा सरकारला इशाराSambhajiraje chhatrapatil on Vishalgad : विशाळगड अतिक्रमण मुक्त करा, संभाजीराजेंची मागणीManoj Jarange Parbhani :

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
Embed widget