एक्स्प्लोर

Exam Reforms Task Force : पेपरफुटी रोखण्यासाठी आता 'आधार' कार्डचे जनक मैदानात, पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा, हाय-पावर टास्क फोर्सची स्थापना

Nandan Nilekani Exam Reforms Panel : NEET पेपरफुटी प्रकरणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इन्फोसिसचे सह-संस्थापक नंदन नीलेकणी यांच्या नेतृत्वाखाली विशेष टास्क फोर्स स्थापन करण्याची घोषणा केली आहे.

नवी दिल्ली : नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणानंतर आणि केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आणि परीक्षा व्यवस्थेतील सुधारणांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. इन्फोसिसचे सह-संस्थापक आणि नामांकित तंत्रज्ञान तज्ज्ञ नंदन नीलेकणी (Nandan Nilekani) यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय 'हाय-पावर टास्क फोर्स' (High Powered Task Force) स्थापन करण्यात येत असल्याची मोठी घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली आहे. परीक्षा पद्धत अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि विश्वासार्ह बनवणे हा या टास्क फोर्सचा मुख्य उद्देश असेल.

PM Modi Message To Students : विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांची जागा तुरुंगात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इन्स्टाग्राम आणि इतर सोशल मीडियावर व्हिडीओ संदेश शेअर करत देशातील तरुणांना आणि पालकांना आश्वस्त केले. ते म्हणाले, "भारत सरकार विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सातत्याने ठोस निर्णय घेत आहे. ज्या लोकांनी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ केला आहे, ते आज तुरुंगात सडत आहेत. अशा प्रकरणांच्या जलद सुनावणीसाठी आपण आधीच फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन केले आहेत. याशिवाय संसदेत कडक कायदेशीर तरतुदींसह नवीन कायदा बनवण्याच्या दिशेनेही वेगाने काम सुरू आहे."

NEET Paper Leak Case : परीक्षा व्यवस्थेत तंत्रज्ञानाचा वापर

भविष्यातील परीक्षा प्रणालीबद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले की, आता आपल्याला केवळ कारवाईवर न थांबता भविष्याचा विचार करावा लागेल. आपली परीक्षा पद्धत पूर्णपणे पारदर्शक आणि तंत्रज्ञानावर आधारित असणे अत्यंत गरजेचे आहे. याच पार्श्वभूमीवर नंदन नीलेकणी यांच्या नेतृत्वाखालील ही टास्क फोर्स संपूर्ण परीक्षा यंत्रणेचा अभ्यास करेल आणि त्यात आवश्यक सुधारणा सुचवेल. या टास्क फोर्सच्या अहवालाच्या आधारे आगामी सर्व परीक्षा पूर्णपणे पारदर्शक आणि लीक-प्रूफ (Leak proof) पद्धतीने घेतल्या जातील.

Nandan Nilekani Role : कोण आहेत नंदन नीलेकणी?

नंदन नीलेकणी हे देशातील अग्रगण्य तंत्रज्ञान कंपनी 'इन्फोसिस'चे सह-संस्थापक आहेत आणि त्यांनी 'आधार' (Aadhaar) या भारतातील सर्वात मोठ्या डिजिटल ओळख प्रकल्पाचे यशस्वी नेतृत्व केले आहे. सार्वजनिक परीक्षांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पेपरफुटीच्या घटना कायमच्या रोखण्यासाठी आणि परीक्षा प्रक्रिया डिजिटल आणि पारदर्शक बनवण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखालील ही टास्क फोर्स महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

ही बातमी वाचा:

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Advertisement

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
Embed widget