एक्स्प्लोर

पाचपैकी चार राज्यात भाजपची सत्ता, मणिपूरमध्येही बहुमत सिद्ध

इंफाळ : गोव्यानंतर भाजपने मणिपूरमध्येही बहुमत सिद्ध केलं आहे. 60 सदस्यसंख्या असलेल्या मणिपूर विधानसभेत भाजपला 33 सदस्यांनी पाठिंबा दिला. भाजपचे यमनम खेमचंद यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. भाजपचे एन बिरेन सिंह यांनी 16 मार्च रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. मणिपूरमध्ये पहिल्यांदाच भाजप सरकार स्थापन झालं आहे. एक अपक्ष आणि तृणमूल काँग्रेसच्या एका आमदारानेही भाजपला पाठिंबा दिला. एनपीपीच्या चारही आमदारांना मंत्रिपद मंत्रिमंडळात मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांच्यासह भाजपच्या दोन आमदारांना मंत्रिपद देण्यात आलं आहे. तर एनपीपी 4, एनपीएफ, एलजेपी प्रत्येकी एक आणि काँग्रेस सोडून भाजपमध्ये आलेल्या एका आमदाराला मंत्रिपद दिलं आहे. भाजपने विधानसभा निवडणुकीत 21 जागांवर विजय मिळवला होता. तर काँग्रेस 28 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला होता. मात्र भाजपने अन्य पक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन केली. 11 मार्च रोजी पाच राज्यांच्या निकाल लागल्यानंतर चार राज्यात भाजपचा मुख्यमंत्री होईल, असं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी सांगितलं होतं. गोवा आणि मणिपूरमध्ये संख्याबळ कमी असतानाही भाजपने अन्य पक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन केली. तर उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये भाजपने बहुमताने सरकार स्थापन केलं. मणिपूर विधानसभेतील पक्षीय बलाबल :
  • भाजप – 21
  • काँग्रेस – 28
  • नागा पीपल फ्रंट – 4
  • नॅशनल पीपल्स पार्टी – 4
  • तृणमूल काँग्रेस  -1
  • अपक्ष – 1
  • लोकजनशक्ती पार्टी – 1
गोव्यात भाजपची काँग्रेसवर मात गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी बहुमतासाठीची अग्निपरीक्षा पार पाडली. गोवा विधानसभेत भाजपने 16 विरुद्ध 22 मतांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, गोवा विधानसभेत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना बहुमत सिद्ध करायचं होतं. 40 जागांच्या गोवा विधानसभेत 13 जागा मिळवणाऱ्या भाजपच्या समर्थनार्थ 22 आमदारांनी मतदान केलं. तर 17 आमदारांनी सरकारविरोधात मत केलं. तर मतदानापूर्वी काँग्रेस आमदार विश्वजीत राणे यांनी सभात्याग केला. अशाप्रकारे पर्रिकर यांनी विधानसभेत बहुमतासाठी आवश्यक 21 आमदारांचा आकडा सहजरित्या पार केला. विधानसभा निवडणुकीत 40 पैकी काँग्रेसला सर्वाधिक 17 भाजपला 13 महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला 3, गोवा फॉरवर्ड पार्टीला 3 जागा मिळाल्या होत्या. तर अपक्षांना 3 तर राष्ट्रवादीला एक जागा मिळाली होती. त्यातील मगोप, गोवा फॉरवर्ड पार्टी आणि अपक्षांनी भाजपला पाठिंबा दिल्यानं भाजपचं संख्याबळ 21 वर आलं. उत्तर प्रदेश, उत्तराखंडमध्ये बहुमत भाजपने देशातील सर्वात मोठं राज्य उत्तर प्रदेशमध्ये मित्रपक्षांसह 325 जागांवर विजय मिळवला. तर काँग्रेस-सपा 54, बसपा 19 आणि 5 अपक्षांनी विजय मिळवला. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी योगी आदित्यनाथ विराजमान झाले. उत्तराखंडमध्येही भाजपने घवघवीत यश मिळवलं. 70 सदस्यसंख्या असलेल्या उत्तराखंड विधानसभेत भाजपने 57 जागांवर विजय मिळवत काँग्रेसकडून सत्ता खेचून आणली. काँग्रेसला केवळ 11 जागांवर समाधान मानावं लागलं. भाजपचे त्रिवेंद्र सिंह रावत उत्तराखंडच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत. पंजाबमध्ये काँग्रेसला घवघवीत यश मणिपूर आणि गोव्यात सर्वात मोठा पक्ष ठरलेला असतानाही काँग्रेसला सत्ता स्थापन करता आली नसली तरी पंजाबमध्ये मात्र काँग्रेसने बहुमताने सरकार स्थापन केलं आहे. पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी शपथ घेतली. WEB-RESULTS-FNL संबंधित बातम्या :

योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान

त्रिवेंद्र सिंह रावत उत्तराखंडचे मुख्यमंत्री

भाजपने उत्तर प्रदेश, उत्तराखंड कमावलं, गोवा मात्र गमावलं

मनोहर पर्रिकर गोव्याचे 13वे मुख्यमंत्री, कोंकणीतून शपथ

Assembly Election Result 2017 : पाच राज्यांचे अंतिम निकाल

देशातील 12 राज्य भाजपमय, काँग्रेसचं अस्तित्व नगण्य

UP Assembly Election Result 2017: उत्तर प्रदेशचा निकाल

Punjab Assembly Election Result 2017: पंजाबचा निकाल

GOA Assembly Election Result 2017: गोवा निवडणूक निकाल

Uttarakhand Assembly Election Result 2017 : उत्तराखंडचा निकाल

Manipur Assembly Election Result 2017: मणिपूर विधानसभा अंतिम निकाल

महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीच्या आंदोलनाची संयुक्त राष्ट्राने घेतली दखल, आंदोलकांना तात्काळ सोडा, संयम बाळगा, अधिकाऱ्यांना सूचना
दिल्लीच्या आंदोलनाची संयुक्त राष्ट्राने घेतली दखल, आंदोलकांना तात्काळ सोडा, संयम बाळगा, अधिकाऱ्यांना सूचना
सरकार घाबरलंय, आंदोलन शक्तीशाली! 40 हजार निमलष्करी जवान तैनात करावे लागले, प्रशांत किशोरांचं मोठं वक्तव्य 
सरकार घाबरलंय, आंदोलन शक्तीशाली! 40 हजार निमलष्करी जवान तैनात करावे लागले, प्रशांत किशोरांचं मोठं वक्तव्य 
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला

व्हिडीओ

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं

आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
Embed widget