(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Indo-Pak Partition : स्वातंत्र्यांच्या 75 वर्षांनंतर काका-पुतण्याची भेट, भारत-पाकिस्तान फाळणीमुळे दूर गेले 22 नातेवाईक, आता पाकिस्तानमध्ये सापडला भाचा
Indo-Pak Partition : भारत - पाकिस्तान फाळणीमुळे दूर झालेले चाचा-भतीजाची सोशल मीडियामुळे एकमेकांसोबत भेट झाली आहे.
Indo-Pak Partition : भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाली तेव्हा हजारो लोक एकमेकांपासून दूर झाले. अनेक जणांचे नातेवाईक दोन देशात विभागले गेले. काही कुटुंबातील सदस्य हरवले. अनेक नातेवाईक एकमेकांपासून दूर झाले. अशी काहीशी कहाणी आहे एका 92 वर्षीय व्यक्तीची. या व्यक्तीचा भारत-पाक फाळणी वेळी त्यांच्या 22 नातेवाईकांशी संपर्क तुटला. सर्व नातेवाईकांपासून वेगळे झालेल्या 92 वर्षांच्या आजोबांची तब्बल 75 वर्षानंतर त्यांच्या भाच्यासोबत भेट झाली आहे. या आजोबांना त्यांचा भाचा पाकिस्तानमध्ये सापडला आहे.
92 वर्षीय सरवन सिंह यांची कहाणी
भारत - पाकिस्तान फाळणीमुळे सरवन सिंह त्यांच्या कुटुंबापासून वेगळे झाले. सरवन सिंह सध्या 92 वर्षांचे आहेत. 1947 मध्ये कुटुंबापासून वेगळं त्यांचे इतर नातेवाईक सामुदायिक हिंसेमध्ये मारले गेले. त्यानंतरही आजपर्यंत त्यांनी नातेवाईकांचा शोध सुरुच ठेवला. अखेर सोश मीडियामुळे त्यांची पाकिस्तानमध्ये असणारा त्यांच्या भावाचा मुलगा मोहन सिंह यांच्यासोबत भेट झाली आहे. सरवन सिंह आणि त्यांचा भाचा मोहन सिंह यांनी सोमवारी करतारपूर साहिब गुरुद्वारे येथे एकमेकांची भेट घेतली. यावेळी दोघांनी एकमेकांना कडकडून मिठी मारली.
1947 मध्ये दूर झालं कुटुंब
1947 मध्ये भारत - पाकिस्तान फाळणी दरम्यान सहा वर्षीय मोहन सिंह त्यांच्या कुटुंबापासून वेगळे झाले होते. मोहन सिंह यांच्या कुटुंबात 22 सदस्य होते, पण फाळणीमुळे ते कुटुंबाापसून विभक्त झाले. फाळणीवेळई मोहन सिंह यांच्या कुटुंबातील अनेक पुरुषांची हत्या करण्यात आली होती, तर महिलांनी लहान मुलांसह विहिरीत उडी घेत आत्महत्या केली होती. यावेळी मोहन सिंह बचावले होते. फाळणीमुळे मोहन सिंह पाकिस्तानात गेले. तेथे एका मुस्लिम कुटुंबानं त्यांचं पालनपोषण केलं. मोहन सिंह आता अब्दुल खालिक असून त्यांचं वय 75 वर्ष आहे. त्यांनी कुटुंबापासून वेगळं झाल्यावरही कुटुंबाचा शोध सुरुच ठेवला आणि अखेर त्यांना यामध्ये यश आलं.
भारतात 'चाचा', पाकिस्तानात 'भतीजा'
भारतात असलेले मोहन यांचे काका सरवन सिंह यांनीही मोहन आणि कुटुंबातील इतर सदस्यांचा शोध सुरुच ठेवला. यामुळेच या चाचा-भतीजाची भेट झाली आहे. सोशल मीडियामुळे हे काका-पुतण्या एकमेकांना शोधण्यात यशस्वी झाले आहेत. कॅनडा आणि पंजावमध्ये काही मीडियाने सरवन सिंह यांची मुलाखत घेतली होती. त्यामुळे या दोघांची भेट होण्यास मदत झाली. आता अखेरीस भारतातील सरवन सिंह आणि पाकिस्तानमध्ये असणारा त्यांचा भाचा मोहन सिंह यांची भेट झाली आहे.