एक्स्प्लोर

ममतांना झटका, राजीव कुमार यांना सीबीआयसमोर हजर राहण्याचा आदेश

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता सीबीआयविरोधात तीन दिवसांपासून धरणं आंदोलन करत आहेत.

नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी सरकारला सर्वोच्च न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. शारदा चिटफडं घोटाळ्याच्या चौकशीसाठी कोलकाता पोलिस आयुक्त राजीव कुमार यांना सीबीआयसमोर हजर राहण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला आहे. मात्र राजीव कुमार यांना सध्या अटक होणार नाही, असंही सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं. सोबतच न्यायालयाने राज्याचे मुख्य सचिव, डीजीपी आणि कोलकाता पोलिस आयुक्तांना अवमानाची नोटीसही पाठवली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 20 फेब्रुवारीला होणार आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता सीबीआयविरोधात तीन दिवसांपासून धरणं आंदोलन करत आहेत. सुप्रीम कोर्टाच्या या आदेशाने त्यांना मोठा झटका बसल्याचं म्हटलं जात आहे. एसआयटीने पुराव्यांसोबत छेडछाड केली : अॅटर्नी जनरल सुप्रीम कोर्टात अॅटर्नी जनरल केके वेणुगोपाल यांनी सीबीआयची बाजू मांडली. ते म्हणाले की, एसआयटीने पुराव्यांसोबत छेडछाड केली आणि प्रकरणाचा योग्य पद्धतीने तपास केला नाही. बंगालमध्ये घटनात्मक संस्था बिथरल्या आहेत. एसआयटीला डेटा आणि लॅपटॉप सुरक्षित ठेवता आला नाही. एसआयटीने सीबीआयला चुकीचा कॉल्स डेटा दिला होता. तर सीबीआयला कोलकाता पोलिसांना त्रास द्यायचा आहे, असा आरोप पश्चिम बंगाल सरकारते वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी केला आहे. चौकशीची अडचण काय? : सरन्यायाधीश यावर राजीव कुमार यांना चौकशीची काय अडचण आहेय? पोलिस आयुक्त सीबीआयसमोर हजर का होत नाहीत? असे प्रश्न सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी विचारले. कोलकाता पोलिस आयुक्तांना तपासात सहकार्य करण्याचा आदेश देण्यात आम्हाला कोणतीही अडचण नाही, असं तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाने म्हटलं. सीबीआयची याचिका याआधी सोमवारी सुप्रीम कोर्टाने सीबीआयच्या याचिकेवर सुनावणी करताना म्हटलं होतं की, "जर कोलकाता पोलिस आयुक्त राजीव कुमार पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करत असतील, तर सीबीआयने त्यांच्याविरोधात पुरावे द्यावेत, आम्ही त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करु." आमचा नैतिक विजय दुसरीकडे हा आमचा नैतिक विजय असल्याची प्रतिक्रिया ममता बॅनर्जी यांनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर दिली. "राजीव कुमार यांच्यावर जबरदस्तीने कारवाई होणार नाही. सुप्रीम कोर्टाचा आदेश हा बंगालच्या जनतेचा, देशातील जनतेचा आणि मीडियाचा विजय आहे. केंद्र सरकार संविधानाचं उल्लंघन करत आहे, आम्ही सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन करणार. कोणीही या देशाचा बिग बॉस असू शकत नाही. लोकशाहीच बिग बॉस आहे. केंद्र सरकारवर टीका केली तर आमचा विरोध होता, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.

महत्त्वाच्या बातम्या

ट्रकमध्ये गॅस भरताना मोठा स्फोट! तीघांचा जागीच मृत्यू, तर तीन जण गंभीर, धक्कादायक घटनेनं राजधानी हादरली
ट्रकमध्ये गॅस भरताना मोठा स्फोट! तीघांचा जागीच मृत्यू, तर तीन जण गंभीर, धक्कादायक घटनेनं राजधानी हादरली
सणासुदीच्या काळात ग्राहकांना झटका! साखरेच्या दरात मोठी उसळी! 18 दिवसात 18 रुपयांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय? 
सणासुदीच्या काळात ग्राहकांना झटका! साखरेच्या दरात मोठी उसळी! 18 दिवसात 18 रुपयांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय? 
E10 Petrol : E20 पेट्रोलमुळे इंजिन खराब अन् मायलेज घटल्याची तक्रार; केंद्र सरकार पुन्हा E10 पेट्रोल आणण्याच्या तयारीत!
E20 पेट्रोलमुळे इंजिन खराब अन् मायलेज घटल्याची तक्रार; केंद्र सरकार पुन्हा E10 पेट्रोल आणण्याच्या तयारीत!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
Embed widget