एक्स्प्लोर
भाजप कार्यालयावर ममता बॅनर्जींचा कब्जा?
पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्ष आणि तृणमूल काँग्रेसमधील वाद दिवसेंदिवस विकोपाला जात आहे. दोन्ही पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते आता हिंसेच्या मार्गावर उतरले आहेत.

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्ष आणि तृणमूल काँग्रेसमधील वाद दिवसेंदिवस विकोपाला जात आहे. दोन्ही पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते आता हिंसेच्या मार्गावर उतरले आहेत. दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांच्या कार्यालयांवर कब्जा करण्याचा प्रयत्नात असल्याचे पाहायला मिळाले. स्वतः ममता बॅनर्जी यांनी भारतीय जनता पक्षाच्या एका कार्यालयाचे कुलूप फोडून कार्यालय ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे. 30 मे रोजी ममता बॅनर्जी पश्चिम बंगालमधील 24 परगना जिल्ह्याच्या दौऱ्यावर होत्या. यावेळी नौहाटी परिसरातील एका पक्ष कार्यालयावर त्यांनी कब्जा केला. या कार्यालयाबाहेर भारतीय जनता पक्षाचा झेंडा लावण्यात आला होता. तसेच बाहेरील भिंतीवर भाजपचे नाव लिहिण्यात आले होते. ममता बॅनर्जी यांनी स्वतः कार्यालयाबाहेरील भगव्या रंगाच्या भिंतीला काळा रंग दिला तसेच तृणमूल काँग्रेस पक्षाचे पक्षचिन्हदेखील रंगवले असल्याचे भाजप नेत्यांनी म्हटले आहे. तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की, या कार्यालयावर भाजप खासदार अर्जुन सिंह यांच्या समर्थकांनी कब्जा केला होता. तर भाजप कार्यकर्त्यांनी सांगितले की हे आमचेच कार्यालय आहे. तृणमूल काँग्रेसने आमच्या कार्यालयावर कब्जा केला आहे. पश्चिम बंगालमध्ये 'जय श्री राम' या घोषणांमुळे राजकीय वातावरण तापलेले आहे. काही दिवसांपूर्वी 'जय श्री राम'च्या घोषणा देणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी भडकल्या असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर भाजपकडून 'जय श्री राम' लिहलेले 10 लाख पोस्टकार्ड ममतांना पाठवले जाणार असल्याचे जाहीर केले होते.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमधील 42 जागांपैकी 18 जागांवर भाजपने विजय मिळवला होता. तर तृणमूल काँग्रेसला 22 जागांवर विजय मिळवता आला. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर तृणमूलच्या अनेक नेत्यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे त्यांच्या कार्यालयांना भाजपच्या कार्यालयांमध्ये परिवर्तित करण्यात आले. भाजप कार्यकर्ते ममता बॅनर्जींना 'जय श्रीराम' लिहिलेले 10 लाख पोस्टकार्ड पाठवणार | स्पेशल रिपोर्ट | एबीपी माझाW Bengal: Post polls, politics of 'capturing offices' begins between TMC, BJP
Read @ANI Story | https://t.co/6n9pcUeVvc pic.twitter.com/nZ46cIWAtn — ANI Digital (@ani_digital) June 3, 2019
आणखी वाचा























