एक्स्प्लोर

Cyclone Amphan | पश्चिम बंगालमध्ये अ‍ॅम्फान चक्रीवादळचं रौद्र रूप; आतापर्यंत 72 जणांचा बळी

पश्चिम बंगालमध्ये अ‍ॅम्फान चक्रीवादळने हाहाकार माजवला आहे. या वादळात आतापर्यंत 72 जणांचा बळी घेतल्याची माहिती मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिली.

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये अ‍ॅम्फान चक्रीवादळने रौद्र रूप धारण केलंय. या चक्रीवादळच्या तडाख्याने आतापर्यंत 72 जणांचा बळी घेतला आहे, अशी माहिती पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांमी पश्चिम बंगालमध्ये येऊन चक्रीवादळाने प्रभावित झालेल्या भागाला भेट देण्याची विनंती त्यांनी केली. या वादळात नुकसान झालेल्या लोकांना भरपाई देण्याची घोषणाही बॅनर्जी यांनी यावेळी केली.

पश्चिम बंगाल सरकार अ‍ॅम्फान चक्रीवादळात मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना दोनदोन लाख रुपये देणार असल्याचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितले. दरम्यान, अ‍ॅम्फान चक्रीवादळाने प्रभावित झालेल्या लोकांना सर्व प्रकारची मदत करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीने (एनसीएमसी) चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या पश्चिम बंगाल आणि ओडिशामधील मदत कार्यांचा आढावा घेतला. भारतीय हवामान खात्याच्या अचूक अंदाजामुळे आणि एनडीआरएफच्या जवानांना वेळेवर तैनात केल्यामुळे कमी प्रमाणात हानी झाली आहे. कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांच्या अध्यक्षतेखालील एनसीएसएमने पश्चिम बंगाल आणि ओडिशामधील चक्रीवादळाच्या परिस्थितीचा राज्य व केंद्रीय पथकांसमवेत आढावा घेतला.

म्हणून मनुष्यहानी टळली ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या मुख्य सचिवांनी सांगितले, की हवामान खात्याने योग्य वेळी इशारा दिला. त्यामुळे एनडीआरएफच्या मदतीने पश्चिम बंगालमधील सुमारे पाच लाख नागरिक आणि ओडिशामधील सुमारे दोन लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलवले. यामुळे मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी टळल्याचे ते म्हणाले. योग्यवेळी हालचाली केल्याने मनुष्यहानी कमी झाली. ओडिशामध्ये 1999 साली झालेल्या चक्रीवादळानंतर 'अ‍ॅम्फान' सर्वात भयंकर आणि भयानक होतं, अशी माहिती निवेदनात दिली आहे.

Cyclone Amphan | अॅम्फान चक्रीवादळ रौद्ररुप धारण करण्याचा अंदाज : हवामान विभाग

हवामान विभागाचा इशारा काय होता? अॅम्फानचं केंद्र पश्चिम-मध्य बंगालच्या खाडीत होतं, जे पारादीप (ओदिशा) पासून सुमारे 420 किलोमीटर दक्षिण, दीघापासून 570 किलोमीटर दक्षिण-दक्षिण पश्चिम आणि बांगलादेशच्या खेपुपारापासून 700 किलोमीटर दक्षिण-दक्षिण पश्चिम भागात आहे, अशी माहिती भुवनेश्वर हवामान केंद्राचे संचालक एच आर विश्वास यांनी मंगळवारी सकाळी दिली होती. ते म्हणाले की, "चक्रीवादळ अंशत: कमकुवत झालं आहे. हे वादळ उत्तर-उत्तरपूर्वच्या दिशेला बंगालच्या खाडीवर पोहोचण्याची आणि बुधवारी दुपारी किंवा संध्याकाळी पश्चिम बंगालच्या दीघा आणि बांगलादेशमधील हटिया बेटावरुन जाण्याची शक्यता आहे. या वादळाच्या वेळी हवेचा वेग 155 ते 165 किलोमीटर प्रतितास कायम राहिल. तर अधूनमधून हा वेग 180 किलोमीटर प्रतितासापर्यंत वाढू शकतो."

Cyclone Amphan | अम्फान चक्रीवादळ पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर धडकलं

महत्त्वाच्या बातम्या

Success Story:  वडिलांचा मृत्यू, मजुरी करुन आईनं वाढवलं, 8 वेळा नापास झाला पण नाद नाही सोडला, शेवटी सैन्यात लेफ्टनंट झालाच
वडिलांचा मृत्यू, मजुरी करुन आईनं वाढवलं, 8 वेळा नापास झाला पण नाद नाही सोडला, शेवटी सैन्यात लेफ्टनंट झालाच
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
पवारांची साथ मोदींचा हात! फणसकिंगने घेतली पंतप्रधानांची भेट, 12 मिनीटांच्या भेटीत नेमकी काय झाली चर्चा? 
पवारांची साथ मोदींचा हात! फणसकिंगने घेतली पंतप्रधानांची भेट, 12 मिनीटांच्या भेटीत नेमकी काय झाली चर्चा? 
दररोज संपत्तीत 4 हजार कोटींची वाढ, देशातील सर्वात श्रीमंत व्यावसायिकांकडे किती पैसा? जाणून घ्या कमाईबद्दल माहिती 
दररोज संपत्तीत 4 हजार कोटींची वाढ, देशातील सर्वात श्रीमंत व्यावसायिकांकडे किती पैसा? जाणून घ्या कमाईबद्दल माहिती 

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget