एक्स्प्लोर
Advertisement
मॅगझिन कव्हरवर मॉडेलचा स्तनपान करतानाचा फोटो
स्तनपान हे एका आईला मिळालेलं वरदान आहे. जर एखादी महिला आपल्या बाळाला दूध पाजत असेल तर त्यात लाज वाटण्याची गोष्ट नाही.
कोची : स्तनपान हा मातृत्वाचा एक सुंदर आणि नैसर्गिक भाग आहे. नवजात बाळाच्या आरोग्यासाठी मातेने केलेलं स्तनपान अतिशय महत्त्वाचं असतं. परंतु तरीही सार्वजनिक ठिकाणी स्तनपान करणं हे अजूनही लोकांनी स्वीकारलेलं नाही. अशाच लोकांना एका मल्याळम मॅगझिनने बोल्ड कव्हर पेजद्वारे बोल्ड उत्तर दिलं आहे.
मल्याळम मॅगझिन 'गृहलक्ष्मी'च्या कव्हर पेजवर मॉडेल नवजात बाळाला स्तनपान करताना झळकली आहे. या फोटोमधील मॉडेलचं नाव गिलू जोसेफ आहे. गिलू जोसेफ एक कवयित्री, लेखिका आणि एअरहोस्टेस आहे. या मॅगझिनच्या कव्हर पेजवर लिहिलं आहे की, "स्तनपान करत असताना आम्हाला रोखून पाहू नका." स्तनपानादरम्यान रोखून पाहणाऱ्यांना दिलेल्या मेसेजमध्ये म्हटलं आहे की, "केरळमधील माता बोलत आहेत की, कृपया रोखून पाहू नका, आम्हाला स्तनपानाची आवश्यकता आहे."
एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत, गिलू जोसेफ म्हणाली की, "या प्रोजेक्टसाठी जेव्हा मला विचारणा करण्यात आली तेव्हा मी हो म्हणण्यास क्षणाचाही विलंब केला नाही. स्तनपान हे एका आईला मिळालेलं वरदान आहे. जर एखादी महिला आपल्या बाळाला दूध पाजत असेल तर त्यात लाज वाटण्याची गोष्ट नाही. या गोष्टीकडे लैंगिकदृष्ट्या पाहणं चुकीचं आहे. हे चुकीचं/अयोग्य आहे, असा विचार तुम्ही का करता? जर तुम्ही तुमच्या बाळाला सार्वजनिक ठिकाणी दूध पाजत असाल तर कोणता देव तुमच्यावर नाराज होईल?" या कॅम्पेनसाठी होकार देण्याआधी तुमच्या मनात कोणता किंतु परंतु होता का?, असं विचारलं असता गिलू जोसेफ म्हणाली की, "असं काही झालेलं नाही आणि मला माझ्या शरीराचा अभिमान आहे. योग्य वाटतील त्या गोष्टी मी करते." "पण या प्रकरणात मला माझ्या कुटुंबाकडून कोणताही पाठिंबा मिळाला नाही. उलट हा प्रोजेक्ट स्वीकारल्याने त्यांनी मला जोरदार विरोध केला," असंही गिलू जोसेफ यांनी नमूद केलं.Malayalam magazine Grihalakshmi, from @mathrubhumieng, has this new cover. It says, "Mothers tell Kerala, "please don't stare, we need to breastfeed"". WOW. Unusually bold. pic.twitter.com/Nwz6nAF0Fk
— Vivek S Nambiar (@ivivek_nambiar) February 28, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रीडा
राजकारण
भारत
Advertisement