एक्स्प्लोर
मी माझ्या सैनिकांना लढायला सांगू शकतो, मरायला नाही : लष्करप्रमुख
नवी दिल्ली : दगडफेकीच्या घटनांपासून वाचण्यासाठी काश्मीरी तरुणाला ढाल बनवणारे मेजर लीतुल गोगोई यांचं लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी समर्थन केलं आहे. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी गोगोईंच्या कृतीचं समर्थन करताना मी माझ्या सैनिकांना लढायला सांगू शकतो, मरायला नाही, अशा शब्दात प्रतिक्रिया दिली आहे.
सध्या काश्मीरमध्ये छळ युद्ध सुरू आहे. अशा परिस्थितीचा सामना करण्यासाठी नवीन युक्त्या लढवायलाच हवा, असं ते यावेळी म्हणाले आहेत.
रावत म्हणाले की, ''सध्या काश्मीरमध्ये आपल्या जवानांना डर्टी वॉरचा सामना करावा लागत आहे. त्याचा यशस्वी सामना करण्यासाठी अशा नवनव्या युक्त्या लढवण्याची गरज आहे. आम्ही दगडफेक करणाऱ्या काश्मीरी तरुणाला जीपला बांधणाऱ्या जवानाचा यासाठी गौरव केला, जेणेकरुन दहशतवाद्यांविरोधात लढताना आपल्या इतर जवानांचे मनोबल वाढेल.''
ते पुढे म्हणाले की, ''जेव्हा काश्मीर खोऱ्यात अशांतता पसरवण्यासाठी आमच्यावर दगडफेक आणि पेट्रोल बॉम्ब फेकले जातात, तेव्हा मी माझ्या जवानांना शांत राहण्याचं कधीही सांगणार नाही. माझं काम लढणाऱ्या सैन्याचं मनोबल उंचावण्यासाठी प्रयत्न करणं आहे, नाकी त्यांना शांत राहू देण्यास सांगणं.''
दरम्यान, मेजर गोगोई यांनी दगडफेकीच्या घटनांपासून वाचवण्यासाठी एका काश्मीरी तरूणाला जीपला बांधलं होतं. या घटनेवर विविध स्तरातून संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. विशेष म्हणजे, जम्मू काश्मीर पोलिसात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
एका खासगी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना मेजर गोगोई यांनी आपल्या कृतीचं समर्थन केलं होतं. ''मी काहीच गैर केलेलं नाही. मी माझ्या कामाशी प्रामाणिक होतो. मी घाबरलो नव्हतो. दगडफेक करणाऱ्यांनी सर्व बाजुंनी घेरलं, मात्र पोटनिवडणुका सुरळीत पार पडण्याकडे आमचं लक्ष होतं,'' असं लीतुल गोगोई म्हणाले होते.
काय आहे प्रकरण?
9 एप्रिलला श्रीनगरमध्ये पोटनिवडणुकीची ड्युटी संपवून सीआरपीएफचे जवान निघाले होते. त्यावेळी काश्मिरच्या फुटीरतावाद्यांनी जे कृत्य केलं, त्याने देशवासियांच्या तळपायाची आग मस्तकात गेली.
पोटनिवडणुकीच्या बंदोबस्तावरुन परतणाऱ्या सीआरपीएफ जवानांना काही टवाळखोर फुटीरतावाद्यांनी चक्क लाथा-बुक्यांनी मारलं.
विशेष म्हणजे हे फुटीरतावादी तरुण मारत असताना, हातात एके-47 असलेले देशाचे रक्षणकर्ते शांत होते.
ते कुठल्याही प्रकारचं प्रत्युत्तर देत नव्हते. याचं कारण म्हणजे शत्रूच्या नरडीचा घोट घेणाऱ्या जवानांना देशातील नागरिकांना हात न लावण्याची शिकवण दिली जाते. फुटीरतवाद्यांसाठी हेच खरं चोख प्रत्युत्तर आहे.
संबंधित बातम्या
जीपवर काश्मिरी तरुणाला बांधणाऱ्या मेजर गोगोईंचा सत्कार
VIDEO : दगडफेक रोखण्यासाठी जवानांनी काश्मिरी तरुणाला जीपवर बांधलं!
जवानांवर हात उचलणाऱ्या नराधमांची ओळख पटली
श्रीनगरमध्ये फुटीरतावाद्यांचं CRPF जवानांशी गैरवर्तन, व्हिडीओ व्हायरल
एका थप्पडच्या बदल्यात 100 जिहादींना ठार करा : गंभीर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement