एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
23 वर्षीय हिजाबधारी बॉडीबिल्डर 'मि. केरळ'च्या महिला गटात अव्वल
कोझीकोडेतील ओर्कट्टेरीची रहिवासी असलेली मजिझिया व्यावसायिक शरीरसौष्ठवपटू आहे. मात्र यापूर्वी तिने कधीच बॉडीबिल्डिंग स्पर्धांमध्ये सहभाग घेतला नव्हता.
कोची : 23 वर्षीय हिजाबधारी मजिझिया भानू 'मिस्टर केरळ' स्पर्धेच्या महिला विभागात विजेती ठरली. कोचीमध्ये रविवारी झालेल्या बॉडीबिल्डिंग स्पर्धेत मजिझिया अव्वल ठरली. यावेळी उपस्थितांनी उभं राहून टाळ्यांचा कडकडाट केला.
मजिझिया भानू ही केरळातील माहे इन्स्टिट्यूट ऑफ डेंटल सायन्सेसमध्ये बीडीएसच्या शेवटच्या वर्षाची विद्यार्थिनी आहे. कोझीकोडेतील ओर्कट्टेरीची रहिवासी असलेली मजिझिया व्यावसायिक शरीरसौष्ठवपटू आहे. मात्र यापूर्वी तिने कधीच बॉडीबिल्डिंग स्पर्धांमध्ये सहभाग घेतला नव्हता.
'मी पॉवरलिफ्टर आहे. बॉडीबिल्डिंग स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचा माझा कधीच इरादा नव्हता. त्यामागील एक महत्त्वाचं कारण म्हणजे शरीराचं प्रदर्शन. जेव्हा मी या स्पर्धेची फेसबुक पोस्ट पाहिली, तेव्हाही मी साशंक होते. मात्र माझ्या होणाऱ्या नवऱ्याने मला काही फोटो पाठवले. ते फोटो होते परदेशात हिजाब घालून बॉडीबिल्डिंग स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या मुस्लिम महिलांचे. त्यामुळे मी या स्पर्धेत भाग घेण्याचा निर्णय घेतला. हा फक्त एक प्रयत्न होता. किताब पटकावेन, असं स्वप्नातही वाटलं नाही' असं मजिझिया हसत सांगते.
भावी नवऱ्याचं प्रोत्साहन आणि वेटलिफ्टिंग प्रशिक्षकाच्या मदतीमुळे हे शक्य झाल्याच्या भावना मजिझियाने व्यक्त केल्या आहेत. कोचने व्हॉट्सअॅपवर बॉडीबिल्डिंगच्या पोझचे फोटो पाठवले, असं ती सांगते. पोझ देताना चेहऱ्यावर हास्य ठेवणं आपल्याला कठीण जात होतं, मात्र पुरुष बॉडीबिल्डर्सनी आपल्याला हास्याचं महत्त्व पटवून दिल्यामुळे ते सुधारता आल्याचंही मजिझिया आवर्जून सांगते.
लहानपणापासूनच तिने अॅथलेटिक्ससारख्या क्रीडाप्रकारात सहभाग घेतला आहे. मजिझियाने 2016 मध्ये बॉक्सिंगच्या रिंगणात प्रवेश केला, मात्र दातांना ब्रेसेस लावून खेळण्यास तिला मज्जाव करण्यात आला. त्यामुळे तिने आपला मोर्चा पॉवरलिफ्टिंगकडे वळवला. आशियाई पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशीप 2017 मध्ये तिला रौप्यपदकही मिळालं होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
निवडणूक
करमणूक
निवडणूक
Advertisement