एक्स्प्लोर
परदेशी महिला पर्यटकांनी स्कर्ट घालून फिरु नये, केंद्रीय पर्यटन मंत्र्यांचा अजब सल्ला
नवी दिल्ली : परदेशी महिला पर्यटकांनी स्कर्ट घालू नये, तसंच रात्री एकट्यानं बाहेर पडू नये, असा अजब सल्ला केंद्रीय पर्यटन मंत्री महेश शर्मांनी दिला आहे. पर्यटकांनी एअरपोर्टवर कसं वागावं, याच्या नियमावलीची पुस्तिका पर्यटकांना दिली जात आहे. या पुस्तिकेतही परदेशी महिला पर्यटकांना हे सल्ले देण्यात आले आहेत. या वक्तव्यानंतर महेश शर्मा यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.
परदेशी पर्यटकांची सुरक्षा लक्षात घेता काही सूचना दिल्या आहेत. एअरपोर्टवर ज्या कोणत्या टॅक्सीमध्ये बसाल, त्या टॅक्सीचा नंबर आपल्या मित्रांना किंवा नातेवाईकांना पाठवून ठेवा, अशी सूचनाही महेश शर्मा यांनी दिली आहे.
महेश शर्मा यांच्या वक्तव्यावर सर्व स्तरातून टीकेची झोड उठल्यानंतर त्यांनी सारवासारव केली की, कपड्यांवरुन कोणताही सल्ला दिलेला नाही. मात्र, पर्यटकांना देण्यात येणाऱ्या वेलकम किटमध्ये म्हटलंय की, भारत विविध संस्कृतींचा आणि मंदिरांचा देश आहे. त्यामुळे त्यानुसारच कपडे परिधान करावे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement