Mahashivratri 2022 : महाशिवरात्रीनिमित्त ईशा फाऊंडेशनचा भव्य उत्सव; 170 देशांमधील एक कोटींपेक्षा जास्त भाविक सहभागी
Mahashivratri 2022 : ईशा योग केंद्रामध्ये खास उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
Mahashivratri 2022 : आज देशभरात महाशिवरात्रीचा (Mahashivratri 2022) उत्सव साजरा केला जात आहे. सद्गुरू जग्गी वासुदेव (Sadhguru) यांच्या तमिळनाडूमधील (Tamil Nadu) कोयंबटूर (Coimbatore ) येथील ईशा योग केंद्रामध्ये (Isha Foundation) खास उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा उत्सव 12 तास साजरा केला जाणार आहे. या उत्सवाची सुरूवात संध्याकाळी सहा वाजता सुरू होणार आहे. सकाळी सहा वाजेपर्यंत हा उत्सव सुरू राहणार आहे. या उत्सवामध्ये 170 देशांमधील एक कोटी लोक सहभागी होणार आहेत. ज्या लोकांनी या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आधी रजिस्ट्रेशन केले आहे ते लोक कार्यक्रस्थळी पोहचून सहभाग घेऊ शकतात. पण ज्यांनी नाव नोंदवलं नाहिये ते ऑनलाइन पद्धतीनं हा कार्यक्रम पाहू शकतात.
तुम्ही देखील हा उत्सव पाहू शकता
ईशा योग केंद्र महाशिवरात्री उत्सव हा यूट्यूब चॅनलवर लाइव्ह स्ट्रीम होणार आहे. त्याचप्रमाणे https://isha.sadhguru.org/mahashivratri/live-webstream/ या वेबसाइटवर देखील लोक हा कार्यक्रम पाहू शकतात. कार्यक्रमामध्ये पेपॉन, शॉन रोल्डन, मास्टर सलीम आणि हंसराज रघुवंशी हे सहभागी होणार आहेत. इंग्रजी, तमिळ, कन्नड, मराठी अशा एकूण 16 भाषांमध्ये हा कार्यक्रम प्रसारित होणार आहे.
कोरोनामुळे या कार्यक्रमामध्ये फक्त ज्या लोकांना खास आमंत्रण आहे, असेच लोक सहभागी होऊ शकतात. घरी बसून भक्त हा कार्यक्रम टिव्हीवर आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पाहू शकतात. कार्यक्रामात ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीनं सामिल होणाऱ्या लोकांना रूद्राक्ष देण्यात येणार आहेत.
संबंधित बातम्या
Maha Shivratri 2022 : 'हर हर महादेव' ; जाणून घ्या महाशिवरात्रीचा शुभ मुहूर्त अन् पूजा विधी
Mahashivratri 2022 : महाशिवरात्रीला रात्रीच्या पूजेचे विशेष महत्त्व, 'या' मंत्राचे करा पठण
Mahashivratri 2022 : भगवान शंकराला अर्पित केल्या जाणाऱ्या ‘या’ गोष्टी आरोग्यासाठीही लाभदायी!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha