Mahashivratri 2022 : भगवान शंकराला अर्पित केल्या जाणाऱ्या ‘या’ गोष्टी आरोग्यासाठीही लाभदायी!
Mahashivratri 2022 : महादेवाच्या पूजेत अर्पण केलेल्या बहुतेक गोष्टी औषधी गुणांनी परिपूर्ण असतात. चला तर, या गोष्टींच्या औषधी गुणधर्मांविषयी जाणून घेऊया...
Maha Shivratri 2022 : महादेवाला अशा गोष्टी अपर्ण केल्या जातात, ज्या इतर कोणत्याही देवाला वाहिल्या जात नाहीत. भगवान शंकराला बेल, भांग, धोतरा आणि आकची फुले अतिशय प्रिय असल्याचे मानले जाते. दैनंदिन जीवनात या गोष्टींचा तसा फारसा उपयोग होत नसल्याने, लोक या सर्व गोष्टींना निरुपयोगी मानतात. मात्र, या गोष्टी आपल्या दैनंदिन आयुष्यातही खूप लाभदायी आहेत. महादेवाच्या पूजेत अर्पण केलेल्या बहुतेक गोष्टी औषधी गुणांनी परिपूर्ण असतात. चला तर, या गोष्टींच्या औषधी गुणधर्मांविषयी जाणून घेऊया...
बेलाची पाने
महादेव सोडून इतर कोणत्याही देवाच्या पूजेमध्ये बेलाची पाने वापरली जात नाहीत. असे म्हणतात की, महादेवाच्या शरीरातील विषाची जळजळ बेलाची पाने चघळल्याने शांत झाली होती. बेलाच्या पानांमध्येही अनेक औषधी गुणधर्म असतात. बेलाचे पान थंड प्रभावाचे असते. मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल आणि हृदयाशी संबंधित रोगांवर उपचार करण्यासाठी बेलाच्या पानाचा उपयोग होतो.
धोतरा
धोतरा हे गोल आकाराचे काटेरी फळ आहे. हे सामान्यतः एक विषारी फळ मानले जाते, म्हणून ते घरांमध्ये वापरले जात नाही. पण, प्रत्यक्षात धोतरा ही खूप उपयुक्त गोष्ट आहे. आयुर्वेदात याचा उपयोग औषध म्हणून केला जातो. जुनाट ताप, सांधेदुखीच्या समस्येवर हे फळ फायदेशीर आहे, तसेच विषाचा प्रभाव नाहीसा करण्यासाठीही उपयुक्त आहे.
भांग
भांग महादेवाला अतिशय प्रिय आहे, असे म्हटले जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी खास ‘भांग की थंडाई’ केली जाते. पण, गांजा ही नशा मानली जाते. मात्र, योग्य प्रमाणात सेवन केल्यास ती औषधी देखील आहे. निद्रानाश, तणाव, डोकेदुखी, त्वचेशी संबंधित सर्व समस्या दूर करण्यासाठी भांग उपयुक्त आहे. परंतु, कोणत्याही समस्येमध्ये तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय याचा वापर करू नये.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा फक्त माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं घेण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
संबंधित बातम्या
- Mahashivratri 2022 : महाशिवरात्रीला रात्रीच्या पूजेचे विशेष महत्त्व, 'या' मंत्राचे करा पठण
- Maha Shivratri 2022 : 'हर हर महादेव' ; जाणून घ्या महाशिवरात्रीचा शुभ मुहूर्त अन् पूजा विधी
- Mahashivratri 2022 : महाशिवरात्रीनिमित्त शुभेच्छा देण्यासाठी 'असे' डाऊनलोड आणि शेअर करा WhatsApp स्टिकर्स
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha