![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Maharashtra Political Crisis: हरिश साळवेंचं पुन्हा उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यावर बोट; राज्यातील सत्तासंघर्षाची आजची सुनावणी संपली, पुढील सुनावणी होळीनंतर
हरिश साळवे यांनी आज सुप्रीम कोर्टात शिंदे गटाकडून युक्तीवाद केला आहे. हरिश साळवे यांनी उद्धव ठाकरे बहुमत चाचणीला सामोरे गेले नाहीत, त्यावर जोरदार टीका केली आहे.
![Maharashtra Political Crisis: हरिश साळवेंचं पुन्हा उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यावर बोट; राज्यातील सत्तासंघर्षाची आजची सुनावणी संपली, पुढील सुनावणी होळीनंतर Maharashtra Political Crisis Supreme Court hearing latest update further discussion will be done by after holi harish salve Maharashtra Political Crisis: हरिश साळवेंचं पुन्हा उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यावर बोट; राज्यातील सत्तासंघर्षाची आजची सुनावणी संपली, पुढील सुनावणी होळीनंतर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/07/10dc42b6ccc9c9e8453417c7007291061667810343440575_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची (Maharashtra Political Crisis) आजची सुप्रीम कोर्टातील (Supreme Court) सुनावणी संपली आहे. आज दोन तासातच कामकाज संपवले कारण आज दिवसभरामध्ये सुनावणी पूर्ण होऊ शकत नव्हती. होळीच्या सुट्टीनंतर पुढील कामकाज होणार आहे. पुढील सुनावणी 14 मार्चला होण्याची शक्यता आहे. हरिश साळवे यांनी आज सुप्रीम कोर्टात शिंदे गटाकडून युक्तीवाद केला आहे. हरिश साळवे यांनी उद्धव ठाकरे बहुमत चाचणीला सामोरे गेले नाहीत, त्यावर जोरदार टीका केली आहे.
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनवाणी आज संपणार असे जवळपस निश्चित होते. काल सरन्यायाधिशांनी तसे संकेत देखील दिले होते.परंतु आज नाट्यमयरित्या ज्येष्ठ विधिज्ञ हरिश साळवे यांनी ऑनलाईन हजेरी लावली. हरिश साळवे यांनी आज सुप्रीम कोर्टात युक्तीवाद केला. उद्धव ठाकरे बहुमत चाचणीला सामोरे गेले नाहीत, त्यावर जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरे बहुमत चाचणीला सामोरे गेले असते तर काय माहीत त्यांच्या आघाडीतील एखाद्या पक्षाने त्यांची साथ सोडली असती, काहीही होऊ शकले असते? असा सवाल देखील उपस्थित केला.
Sr Adv Harish Salve: court embarking on this journey will be perilous since there are delicate balances between constitutional functionaries involved. There was no floor test here and not in what would have happened and what would have not happened#ShivSenaCrisis
— Bar & Bench (@barandbench) March 2, 2023
सध्या 16 अपात्र आमदारांचा मुद्दा कोर्टासमोर
उद्धव ठाकरेंना राजीनामा दिला तिथेच महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा विषय संपला. उद्धव ठाकरे बहुमत चाचणीला सामोरे गेले नाहीत. सध्या हे प्रकरण पुस्तकी (अॅकेडमिक) आहे. त्यामुळे जे आमदार 16 अपात्र झाले तोच मुद्दा सुप्रीम कोर्टासमोर आहे, असे देखील हरिश साळवे म्हणाले.
राज्यपालांची भूमिका योग्य
राज्यपालांची भूमिका योग्य होती. राज्यपालांनी उद्धव ठाकरेंना बहुमत चाचणीसाठी बोलावले होते. परंतु उद्धव ठाकरेंनी बहुमत चाचणीला नकार दिला आणि राजीनामा दिला. त्यावेळी महाराष्ट्राला मुख्यमंत्री नव्हता. राज्यपालांसमोर पर्याय नव्हता त्यामुळे त्यांनी एकनाथ शिंदेने बहुमत चाचणीसाठी बोलावले. एकनाथ शिंदे बहुमत चाचणीत बहुमत मिळवण्यात यश आले, असे देखील हरिश साळवे म्हणाले.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)