देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...
दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Beed News: पंकजा मुंडे यांच्या ताब्यात असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर
Beed News: वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची अखेर निवडणूक जाहीर झाली आहे. 21 जागांसाठी 11 जून रोजी मतदान होणार असून 12 जूनला मतमोजणी होणार आहे याबाबत अधिकृत निवडणूक परिपत्रक सहकार आयुक्तांनी जाहीर केले आहे. वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यासाठी 10 मे ते 16 मे नामनिर्देशन पत्र दाखल करणे, 17 मे रोजी अर्जाची छाननी, 18 मे ते 1 जून पर्यंत अर्ज माघारी घेता येणार आहे. तर दोन जून रोजी उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात येणार आहे. ॥ जून रोजी मतदान होणार आहे तर लागलीच दुसऱ्या दिवशी 12 जून रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे.

Maharashtra Unseasonal Rains: गोंदियात अवकाळी पुन्हा बरसला..... वादळी वाऱ्याने गोंदिया -कोहमारा महामार्गावर झाड कोसळले
Gondia News: गोंदिया जिल्ह्यामध्ये मागील आठवड्यात सतत अवकाळी पाऊस सुरू होता. मात्र गेल्या 3 दिवसापासून जिल्ह्यात सातत्याने पारा वाढत होता. अश्यातच आज सायंकाळच्या सुमारास पुन्हा अवकाळी पावसाने गोंदिया जिल्ह्यात दमदार हजेरी लावली आहे. तर वादळी वाऱ्याने गोंदिया-कोहमारा मार्गावरील झाड कोसळले यात सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र महामार्गावर झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली
Karnataka Election: कर्नाटक: मतदानाच्या पार्श्वभूमीवर गोव्याहून होणारी मद्य तस्करी वाहतूक रोखण्यासाठी पोलीस सतर्क
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकात मद्य विक्री सोमवार पासून बंद करण्यात आली असून गोव्यातून बेळगावात मद्य आणले जाईल म्हणून गोव्यातून येणाऱ्या वाहनांची आणि बसची पोलिसांच्या कडून तपासणी केली जात आहे.
Police Arrested For Bribe : दोन पोलिसांना 1500 रुपयांची लाच घेताना अटक, पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयामधील दोन पोलीस कर्मचारी यांना लाच घेताना पालघरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात ताब्यात घेतले आहे.
तक्रारदार हे देखील पोलिस अंमलदार आहेत. वैद्यकीय बिल आणि सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम मिळण्याकरिता 1500 रुपयांची लाच यांनी तक्रारदाराकडे मागितली होती.
लाच घेणारे पोलीस अंमलदार संजय पवार आणि गणेश वाघेरे अशी त्यांची नावे असून हे दोघेही पोलीस आयुक्तालयात लिपिक म्हणून काम करत आहेत.
पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोघांना रंगेहात लाच घेताना पोलीस आयुक्तालयातून ताब्यात घेतले आहे. आता पुढील तपास सुरू आहे.