Mahakumbh 2025 : प्रयागराजमध्ये कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी, अनेक जण जखमी अमृतस्नान रद्द, 10 जणांचा मृत्यू, सूत्रांची माहिती
Mahakumbh 2025 : उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये सुरु असलेल्या महाकुंभमेळ्यात मध्यरात्री चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
Maha Kumbh Stampede प्रयागराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी झाली आहे. या चेंगराचेंगरीत अनेक जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 10 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामळं आखाडा परिषदेनं मौनी अमावस्येनिमित्त होणारं अमृत स्नान रद्द करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आखाडा परिषदेचे अध्यक्ष रवींद्र पुरी यांनी दिली आहे. प्रयागराज येथील कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी झाल्यानंतर मौनी अमावस्येनिमित्त होणाऱ्या अमृत स्नानाचा निर्णय रद्द केला आहे. आज कोणत्याही आखाड्याकडून अमृत स्नान होणार नाही. आखाड्यांनी त्यांच्या मिरवणुकांना शिबिरांना माघारी बोलावण्यात आलं आहे. यासंदर्भातील माहिती महंत रवींद्र पुरी यांनी दिली.
घटना कधी घडली?
उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील कुंभमेळ्यातील दुसऱ्या अमृत स्नानाच्या म्हणजेच मौनी अमावस्येच्या पूर्वी चेंगराचेंगरी झाली. रात्री 1 वाजताच्या सुमारास चेंगराचेंगरी झाल्याची माहिती आहे. जिथं लोक झोपली होती तिथं त्या ठिकाणी मागील बाजूनं लोक आले आणि त्यानंतर चेंगराचेंगरी झाली. त्याचवेळी लाखो लोक संगमाच्या तटावर स्नान करत होते. घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका दाखल झाल्या आणि जखमींना बाहेर काढण्याचं काम सुरु करण्यात आलं.
रुग्णवाहिका चालकांनी चेंगराचेंगरी झाली झाल्याची माहिती आहे. सर्व भाविकांना संगम घाटावर स्नान करायचं होतं. दुसऱ्या घाटावर स्नान करायला ते तयार नव्हते. त्यामुळं एका ठिकाणी गर्दी वाढली आणि चेंगराचेंगरी झाली. यानंतर पळापळ झाली. मिळालेल्या माहितीनुसार 111 ते 122 पोल नंबरमध्ये चेंगराचेंगरी झाली. या घटनेतील जखमींना स्वरुप रानी नेहरु रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे.
चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर सातत्यानं जिथं चेंगराचेंगरी झाली आहे त्या संगम घाटावर कोणी जाऊ नये, असं आवाहन केलं आहे संगम घाटावरुन लोकांना बाहेर काढण्यासंदर्भात प्रयत्न सुरु आहेत.
घटनेच्या साक्षीदारांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस लोकांना घाटावरुन बाजूला करत होते. त्यावेळी लोक जोरदार पळू लागले आणि स्थिती नियंत्रणाबाहेर गेली. प्राथमिक माहितीनुसार 50 ते 80 लोक जखमी झाल्याची माहिती आहे. मात्र, प्रशासनानं आकडेवारी जाहीर केलेली नाही.
रवींद्र पुरी यांनी या कुंभमेळ्याचं साक्षीदार व्हावं असं जगातील लोकांना आवाहन केलं होतं. आमच्या आवाहनाला सर्वांनी प्रतिसाद दिला होतं. रवींद्र पुरी यांनी आता वसंत पंचमीच्या दिवशी अमृत स्नाना संदर्भात निर्णय घेणार असल्याचं म्हटलं. आज होणारं अमृत स्नान टाळावं लागणार आहे. आजच्या अमृत स्नानासाठी तयारी केली होती, मात्र नियतीला ते मान्य नसेल. प्रयागराजमध्ये जिथं आहेत तिथं त्यांनी थांबावं, असं आवाहन पुरी यांनी केलं.
इतर बातम्या :