एक्स्प्लोर

मध्य प्रदेशमध्ये कोरोना नियंत्रणाबाहेर जात असल्याने शुक्रवार ते सोमवारपर्यंत शहरी भागात लॉकडाऊन

सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून शहरी भागात शुक्रवारी संध्याकाळी 6 ते सोमवार या काळात दोन दिवस पूर्ण लॉकडाउन लागू केला आहे. यासह पाच दिवस शासकीय कार्यालये सुरू करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

इंदोर : मध्य प्रदेशातील सर्व शहरी भागात कोरोनोव्हायरसच्या वाढत्या घटना लक्षात घेता शुक्रवारी संध्याकाळी 6 ते सोमवारी सकाळी 6 वाजेपर्यंत संपूर्ण लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. शहरी भागात कोरोना संसर्गाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे दोन दिवसांचा लॉकडाउन लागू करण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली. ते म्हणाले की लॉकडाऊनला माझाच विरोध आहे, मात्र सद्य परिस्थिती लक्षात घेऊन सरकारला हा निर्णय घ्यावा लागला आहे. यापूर्वी छिंदवाडा, शाजापूर आणि इतर अनेक ठिकाणी लॉकडाउन लागू करण्यात आले आहेत. लॉकडाऊन दरम्यान लसीकरण सुरुच राहणार आहे.

रुग्णालयांमध्ये बेडची संख्या 1 लाख करणार
लॉकडाऊन सोबतच मोठ्या शहरांमध्ये कंटेन्मेंट झोनही तयार करण्यात येतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या कंटेन्मेंट झोनमध्येही लॉकडाऊन केलं जाणार आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी असेही सांगितले की राज्यातील रुग्णालयांमध्ये बेडची संख्या वाढवून 1 लाख केली जाईल. विशेष म्हणजे ऑक्सिजनच्या अभावामुळे गेल्या 48 तासांत सागर जिल्ह्यात चार तर खरगोनमध्ये एक कोरोना पेशंटचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर ऑक्सिजनची कमतरता दूर करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने भिलाई स्टील प्लांटशी करार केला आहे. आतापासून दिवसाला 60 टन ऑक्सिजन पुरविला जाईल.

पाच दिवसचं सरकारी कार्यालये सुरू राहतील

कोरोनाची वाढते प्रकरणं लक्षात घेता आठवड्यातून पाच दिवस सर्व शासकीय कार्यालये उघडण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत शासकीय कार्यालये सुरू ठेवली जातील. म्हणजेच, या आदेशानंतर शनिवार व रविवारी सरकारी कार्यालये बंद ठेवण्यात येणार आहेत.

मुख्यमंत्री कार्यालयाकडून ट्विट
त्याचबरोबर राज्यातील कोरोनाची भीषण परिस्थिती पाहता मुख्यमंत्री कार्यालयानेही लोकांना जाणीव करून देण्याच्या उद्देशाने ट्विट केलं आहे. ट्विटमध्ये असे लिहिले आहे की, "साथीचा रोग लक्षात घेता फेस मास्कचा वापर अवश्य करा, सामाजिक अंतर कायम ठेवा आणि हात वारंवार स्वच्छ करा."

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
मोठी बातमी ! कोर्टात SIT चे 7 खळबळजनक दावे; खंडणीला अडथळा ठरल्याने संतोष देशमुखांचा खून, वाल्मिक कराड गोत्यात?
मोठी बातमी ! कोर्टात SIT चे 7 खळबळजनक दावे; खंडणीला अडथळा ठरल्याने संतोष देशमुखांचा खून, वाल्मिक कराड गोत्यात?
Walmik Karad : गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
वाल्मिक कराडला 7 दिवसांची कोठडी, बीड कोर्टाबाहेर राडा; निदर्शने, घोषणाबाजी, गृहमंत्री जिल्ह्यात या
वाल्मिक कराडला 7 दिवसांची कोठडी, बीड कोर्टाबाहेर राडा; निदर्शने, घोषणाबाजी, गृहमंत्री जिल्ह्यात या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pankaja Munde on Beed : बीडमधील तणाव कसा कमी होणार? पंकजा मुंडे म्हणाल्या..Walmik Karad Court Case : महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला विनंती आहे! दवेंद्र फडणवीस बीड जिल्ह्यात याWalmik Karad Court : वाल्मिक कराडला कोर्टातून बाहेर आणताच काय घडलं? संपूर्ण व्हिडीओ...Walmik Karad Case : खोटे गुन्हे मागे झालेच पाहिजेत! वाल्मिकसाठी वकिलाची घोषणाबाजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
मोठी बातमी ! कोर्टात SIT चे 7 खळबळजनक दावे; खंडणीला अडथळा ठरल्याने संतोष देशमुखांचा खून, वाल्मिक कराड गोत्यात?
मोठी बातमी ! कोर्टात SIT चे 7 खळबळजनक दावे; खंडणीला अडथळा ठरल्याने संतोष देशमुखांचा खून, वाल्मिक कराड गोत्यात?
Walmik Karad : गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
वाल्मिक कराडला 7 दिवसांची कोठडी, बीड कोर्टाबाहेर राडा; निदर्शने, घोषणाबाजी, गृहमंत्री जिल्ह्यात या
वाल्मिक कराडला 7 दिवसांची कोठडी, बीड कोर्टाबाहेर राडा; निदर्शने, घोषणाबाजी, गृहमंत्री जिल्ह्यात या
इकडं भारतात असलेल्या माजी पीएम शेख हसीनांवर गुन्ह्यांचा पाऊस, पासपोर्टही रद्द अन् तिकडं खालिदा जियांची शिक्षा माफ झाली!
इकडं भारतात असलेल्या माजी पीएम शेख हसीनांवर गुन्ह्यांचा पाऊस, पासपोर्टही रद्द अन् तिकडं खालिदा जियांची शिक्षा माफ झाली
लय भारी! मुंबईतून धावली देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन; कुल प्रवास, वाऱ्याचा वेग, चाचणी यशस्वी
लय भारी! मुंबईतून धावली देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन; कुल प्रवास, वाऱ्याचा वेग, चाचणी यशस्वी
Ajit Pawar : अजितदादांचे बीडमध्ये एकाच दिवसात दोन निर्णय; धनंजय मुंडे अडचणीत, संतोष देशमुखांच्या तालुक्यात कोणता निर्णय घेतला?
अजितदादांचे बीडमध्ये एकाच दिवसात दोन निर्णय; धनंजय मुंडे अडचणीत, संतोष देशमुखांच्या तालुक्यात कोणता निर्णय घेतला?
Santosh Deshmukh : संतोष देशमुखांच्या अपहरणाची वेळ आणि तीन मारेकऱ्यांची फोनाफोनीची वेळ मिळतीजुळती; एसआयटीने वेळ तारीख सादर केली
संतोष देशमुखांच्या अपहरणाची वेळ आणि तीन मारेकऱ्यांची फोनाफोनीची वेळ मिळतीजुळती; एसआयटीने वेळ, तारीख सादर केली
Embed widget