एक्स्प्लोर

मध्यप्रदेशात पावसाचा हाहाकार; वेळेवर जलाशयातून पाणी न सोडल्यामुळे पूरस्थिती, स्थानिकांचा आरोप

नर्मदा नदीच्या काठावर असलेल्या मानवी वस्ती जलमय झाल्याच चित्र असून शेकडो कुटुंबावर घर सोडून सुरक्षित स्थळी जाण्याची वेळ आली आहे.

उज्जैन :  मध्यप्रदेशात (MadhyaPradesh Rain) पावसाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. तीर्थक्षेत्र ओंकारेश्वरचं अमाप नुकसान झालाय. 'मुख्यमंत्र्यांना खुश करण्यासाठी वेळेत पाणी न सोडल्यामुळे पूर आल्याचा आरोप ओंकारेश्वरमधील रहिवाशांनी केला. इंदिरासागर, ओंकारेश्वर जलाशयांचे सर्व गेट अचानक उघडल्यानं ओंकारेश्वर शहर जलमय झालंय. आदी शंकराचाऱ्यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना तिथं जाता यावं म्हणून तात्पुरता पूल बांधला होता. तो पूल पाण्याखाली जाऊ नये म्हणून जलाशयांतून आधी पाणी सोडलं नाही. आणि जलाशयांत प्रचंड पाऊस झाल्यानंतर अचानक दोन्ही जलाशयांचे सर्व दरवाजे उघडल्याने ओंकारेश्वराचं नुकसान झाल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. तर जलाशयाच्या अगदी जवळ शहर असल्याने ही परिस्थिती उद्भवल्याचा दावा खांडव्याचे जिल्हाधिकारी अनुपकुमार यांनी केलाय.

ओंकारेश्वर जलाशयातून होणारा विसर्ग वाढविल्याने ओंकारेश्वर परिसरात पुन्हा पूरस्थिती निर्माण झाली आहे. प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. इंदिरासागर व ओंकारेश्वर जलाशयातून अचानक सर्व गेट उघडल्याने तीर्थक्षेत्र ओंकारेश्वर जलमय झालं आहे. नर्मदा नदीच्या काठावर असलेल्या मानवी वस्ती जलमय झाल्याच चित्र असून शेकडो कुटुंबावर घर सोडून सुरक्षित स्थळी जाण्याची वेळ आली आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी पूर नियंत्रण विभाग व स्थानिक प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. 

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार ओंकारेश्वर पर्वतात एकात्म धाम म्हणून निर्माणाधीन असलेल्या आदी शंकराचार्य यांच्या महाकाय अशा मूर्तीच मुख्यमंत्री लोकार्पण करणार होते या स्थळी पोहचण्यासाठी नर्मदा नदीतून एक तात्पुरता पुल बनविण्यात आला होता. हा पुल पाण्याखाली जाऊ नये म्हणून धरणात मोठा जलसाठा असूनही स्थानिक प्रशासनाने व पूर नियंत्रण विभागाने जलाशयातील पाणी वेळेआधी सोडलं नाही व धरण क्षेत्रात अचानक मोठा पाऊस पडल्याने धरणात अचानक मोठा पाणीसाठी जमा झाल्यावर प्रशासनाने सर्वच गेट उघडून मोठा विसर्ग केल्याने ओंकारेश्वर शहर जलमय होऊन नागरिकांचं नुकसान झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

याप्रकरणी प्रशासनाची बाजू मांडताना खंडवा जिल्हाधिकारी म्हणाले की , नर्मदा नदीच्या व जलाशय परिसर क्षेत्रात  अती मुसळधार पाऊस सुरू असल्याने ओंकारेश्वर जलाशयाचे सर्व गेट उघडावे लागले आणि जलाशयाच्या अगदी जवळ शहर असल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. सध्या युद्धपातळी बचाव कार्य सुरू असल्याची माहिती ही जिल्हाधिकारी अनुपकुमार यांनी दिली आहे. मध्य प्रदेशमध्ये आठवडाभरात सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस नद्या-नाल्यांना पूर आला आहे. 10 धरणांचे दरवाजे उघडले असून राजस्थानातील पाच मोठी धरणंही ओव्हरफ्लो झाले आहे. बरगी, तवा, ओंकारेश्वर, इंदिरा सागर, यशवंत सागर, सातपुडा, माचागोरा, परसडोह, गंभीर, क्षिप्रा धरणांचे दरवाजे उघडून पाणी सोडण्यात आले. 

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पुरामुळे प्रभावित झालेल्या जिल्ह्यांमध्ये तात्काळ मदत पोहचवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच यामध्ये आतापर्यंत 8718 नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे.  तर एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे अनेक जवान सध्या पुरात अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाटी पोहचले आहेत. 

हे ही वाचा :

राजस्थानसह मध्य प्रदेशात जोरदार पाऊस, काही भागात जनजीवन विस्कळीत; आज 'या' राज्यात पावसाचा इशारा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prajakta Mali Trimbakeshwar | प्राजक्ता माळीच्या नृत्याला विरोध, वादाचा 'तांडव' Special ReportMalvan| छत्रपतींच्या मालवणमध्ये देशद्रोह्यांचा मुक्काम? भारत-पाक सामन्यानंतर देशविरोधी घोषणाGangster Gaja Marne | गजा मारणेवर कारवाई, नेत्यांमधील कोल्ड वॉर? Special ReportZero Hour Full | गजा मारणेसारख्या प्रवृत्तींना आपली यंत्रणा पाठीशी का घालते? ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
प्रतिक्षा संपली... BMC मधील '1846 कार्यकारी सहायक' पदांसाठीचा निकाल जाहीर, इथं पाहा तुमची निवड झाली का?
प्रतिक्षा संपली... BMC मधील '1846 कार्यकारी सहायक' पदांसाठीचा निकाल जाहीर, इथं पाहा तुमची निवड झाली का?
गोंदियात रेल्वे इंजिन अनियंत्रित झाल्याने थेट भिंतीवर आदळलं; सुदैवाने जिवीतहानी टळली
गोंदियात रेल्वे इंजिन अनियंत्रित झाल्याने थेट भिंतीवर आदळलं; सुदैवाने जिवीतहानी टळली
Indrajit Sawant : इंद्रजीत सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर विरोधात कारवाई; महापुरुषांचा अवमान, जातीय तेढ आणि जीवे मारण्याचा गुन्हा दाखल
इंद्रजीत सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर विरोधात कारवाई; महापुरुषांचा अवमान, जातीय तेढ आणि जीवे मारण्याचा गुन्हा दाखल
Sushma Andhare On Neelam Gorhe: नीलम गोऱ्हेंच्या विरोधात ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा; सुषमा अंधारेंकडून थेट अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस
नीलम गोऱ्हेंच्या विरोधात ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा; सुषमा अंधारेंकडून थेट अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस
Embed widget