एक्स्प्लोर

ऑपरेशन लोटस मध्य प्रदेशमध्ये सक्रीय; मुख्यमंत्री कमलनाथ यांनी घेतले सर्व मंत्र्यांचे राजीनामे

कर्नाटकप्रमाणेच काँग्रेसच्या हातातून मध्यप्रदेशची सत्ता खेचण्यासाठी भाजपनं कमलनाथ सरकारचे मंत्री आणि आमदार फोडायला सुरुवात केली आहे. मध्यप्रदेशातल्या कमलनाथ यांच्या सरकारमधल्या 6 मंत्र्यांसह 17 आमदारांनी काँग्रेसला दणका देत बंगळुरु गाठलं आहे.

नवी दिल्ली : मध्य प्रदेशमधील कमलनाथ सरकार पाडण्यासाठी ऑपरेशन लॉटस सुरू झाल्याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री कमलनाथ यांनी कॅबीनेटची बैठक बोलावली होती. या बैठकीला उपस्थित सर्व मंत्र्यांचे राजीनामे कमलनाथ यांनी घेतले आहे. नाराज आमदारांना शांत करण्यासाठी आणि मंत्रिमंडळाच्या नव्या रचनेसाठी हे पाऊल उचलण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे मध्यप्रदेश मधील ऑपरेशन लोटस यशस्वी होणार की फेल जाणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

कर्नाटकप्रमाणेच काँग्रेसच्या हातातून मध्यप्रदेशची सत्ता खेचण्यासाठी भाजपनं कमलनाथ सरकारचे मंत्री आणि आमदार फोडायला सुरुवात केल्याची चर्चा आहे. मध्यप्रदेशातल्या कमलनाथ यांच्या सरकारमधील्या 6 मंत्र्यांसह 17 आमदारांनी काँग्रेसला दणका देत बंगळुरु गाठलं आहे. या आमदारांना विशेष विमानानं बंगळुरुमध्ये आणण्यात आल्याची माहिती आहे. भाजपनं काँग्रेसला खिंडार पाडल्यानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी दिल्लीत सोनिया गांधींची भेट घेतली. विशेष म्हणजे 15 मार्चपासून मध्यप्रदेश विधानसभेचं अधिवेशन सुरू होत आहे आणि अधिवेशनच्या पहिल्याच दिवशी भाजप अविश्वास प्रस्ताव सादर करुन काँग्रेसचं सरकार पाडण्याचा प्रयत्न करणार आहे.

काँग्रेसशी बंडखोरी करणाऱ्या हरदीप सिंग डंग या आमदाराने विधानसभा अध्यक्षांना राजीनामा देखील सोपवला आहे. बीसाऊ लालसिंग हे देखील काल बंगळूरहून भोपाळला आले आहे. परंतु भाजप सूत्रांचे म्हणणे आहे की, बिसाऊ लालसिंगही त्यांच्यासोबत आहेत आणि गरज भासल्यास ते भाजपबरोबर उभे राहतील या आश्वासनानंतर ते भोपाळला रवाना झाले आहेत.

दरम्यान, ज्योतिरादित्य शिंदेंचे समर्थक असलेल्या मध्य प्रदेश काँग्रेसमधील 17 आमदारांनी आज बंडाचा पवित्रा घेत कर्नाटक गाठले आहे. या आमदारांमध्ये कमलनाथ सरकारमधील 6 मंत्र्यांचाही समावेश आहे. सध्या मिळत असलेल्या माहितीनुसार इमरती देवी, प्रद्युम्न सिंह तोमर, महेंद्र सिंह सिसोदिया, तुलसी सिलावट, प्रभुराम चौधरी आणि गोविंद सिंह राजपूत हे आमदार कर्नाटकात पोहोचल्याचे वृत्त आहे. दुसरीकडे काँग्रेसमधील घडामोडींवर भाजपा बारीक लक्ष ठेवून आहे. भाजपाने आपल्या सर्व आमदारांना तातडीने भोपाळमध्ये बोलावले आहे. दरम्यान, कर्नाटक गाठलेल्या काँग्रेसच्या बंडखोर आमदारांची जबाबदारी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या पुत्रावर सोपवण्यात आली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आज चंद्र दिसतोय का ते बघा ते कोणत्या गावाला गेले शोधा? आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
आज चंद्र दिसतोय का ते बघा ते कोणत्या गावाला गेले शोधा? आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Raigad And Nashik Guardian Minister : रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 07 PM 20 January 2025Aaditya Thackeray PC : जाळपोळ करुन पालकमंत्रिपद मिळात असेल तर चुकीचं : आदित्य ठाकरेTop 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 20 Jan 2025 : ABP Majha : 5 PMABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 06 PM 20 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आज चंद्र दिसतोय का ते बघा ते कोणत्या गावाला गेले शोधा? आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
आज चंद्र दिसतोय का ते बघा ते कोणत्या गावाला गेले शोधा? आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Raigad And Nashik Guardian Minister : रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
Embed widget