एक्स्प्लोर
Advertisement
आईला नाही तर अफझल गुरुला सलाम करणार का? : उपराष्ट्रपती
विश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक सिंघल यांच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू बोलत होते.
नवी दिल्ली : वंदे मातरम् वर सुरु असलेल्या वादावर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनीही आपली बाजू मांडली आहे. "वंदे मातरम् बोलण्यावर आक्षेप का? आईला नाही तर अफझल गुरुला सलाम करणार का?" असा सवाल व्यंकय्या नायडू यांनी विचारला आहे.
विश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक सिंघल यांच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू बोलत होते.
https://twitter.com/ANI/status/938959089211600897
नायडू म्हणाले की, "वंदे मातरम् म्हणजे आई तुला सलाम. अडचण काय आहे? आईला सलाम करणार नाही तर कोणाला करणार? अफझल गुरुला का? जर एखादा भारतीय भारत माता की जय बोलतो तर ते कोणत्या देवाबद्दल नसतं. ते जात, रंग, पंथ किंवा धर्माबाबत नसून देशातील 125 कोटी लोकांबाबत असतं."
व्यंकय्या नायडू यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या 1955 मधील आदेशाचा दाखला दिला. "हिंदू हा धर्म नाही तर जगण्याची पद्धत आहे. हिंदू धर्म एक संकुचित संकल्पना नाही, तो भारताचा एक व्यापक सांस्कृतिक अर्थ आहे. हिंदू धर्म भारताची संस्कृती आणि परंपरा आहे, जी पिढ्यानपिढ्या सुरु आहे," असं उपराष्ट्रपती म्हणाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्राईम
निवडणूक
निवडणूक
Advertisement