एक्स्प्लोर

Congress Lok sabha List: इकडे मविआच्या वाटाघाटी सुरु, तिकडे काँग्रेसकडून 43 उमेदवारांची यादी जाहीर

Congress Lok sabha candidate list: काँग्रेस पक्षाकडून मंगळवारी दिल्लीत लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली. या उमेदवारी यादीत एकूण 43 जणांचा समावेश आहे. महाराष्ट्रात अद्याप महाविकास आघाडीत जागावाटपाच्या वाटाघाटी सुरु आहेत.

नवी दिल्ली:  काँग्रेस पक्षाकडून मंगळवारी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत लोकसभा उमेदवारांची (Loksabha Election candidates) दुसरी यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये एकूण 43 उमेदवारांचा समावेश आहे. काँग्रेसचे सरचिणीस केसी वेणुगोपाल आणि अजय माकन यांच्याकडून काँग्रेसच्या (Congress) उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचा समावेश नाही. महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीत अद्याप जागावाटपाची बोलणी सुरु असल्यामुळे महाराष्ट्रातील उमेदवार जाहीर करण्यात आले नाहीत, असे के.सी. वेणुगोपाल यांनी सांगितले. 

काँग्रेसकडून जाहीर करण्यात आलेल्या दुसऱ्या उमेदवारी यादीत आसाम, मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील नेत्यांचा समावेश आहे. काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांना आसामच्या जोरहाट येथून उमेदवारी देण्यात आली आहे. तर कमलनाथ यांचे पुत्र नकुल नाथ यांना मध्य प्रदेशच्या छिंदवाडा मतदारसंघातून लोकसभेच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे.तर राजस्थानच्या चुरु मतदारसंघातून राहुल कासवा आणि वैभव गेहलोत यांना जालोरे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसच्या दुसऱ्या उमेदवारी यादीचे वैशिष्ट्य म्हणजे यादीतील 76.07 टक्के एससी, एसटी आणि ओबीसी उमेदवारांचा समावेश आहे. तर 76.07 टक्के उमेदवारांचे वय 60 पेक्षा कमी आहे. या तरुण उमेदवारांना जनता निवडून देईल, अशा विश्वास अजय माकन यांनी व्यक्त केला.


काँग्रेस उमेदवारांची यादी खालीलप्रमाणे

मध्य प्रदेश

 टिकमगड-पंकज अहिरवार

सीधी-  कमलेश्वर पटेल

 छिंदवाडा -नकुलनाथ

 देवास- राजेंद्र मालवीय

खरगोन- पोरलाल खर्ते

भिंड- फूल सिंह बरैया

सतना - सिद्धार्थ कुशवाहा

झाबुआ- कांतिलाल भूरिया

मंडला- ओमकार मरकाम

 

राजस्थान

 चुरू-राहुल कासवान

 अलवर- ललित यादव

 जालोरे- वैभव गेहलोत

अहमदाबाद पूर्व- रोहन गुप्ता

 

आणखी वाचा

गडकरींना नागपूरमधून उमेदवारी मिळणार का? किती खासदारांचा पत्ता कट होणार? महाराष्ट्रातील 25 उमेदवारांच्या घोषणेची आज शक्यता

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde and PM Modi: सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्षाचा खटला निर्णायक वळणावर, जेन झी आंदोलनाचेही पडसाद, एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदींना भेटणार
सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्षाचा खटला निर्णायक वळणावर, जेन झी आंदोलनाचेही पडसाद, एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदींना भेटणार
AI Deepfake Ban Rules : एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
CJP : कॉकरोच जनता पार्टीची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, अभिजीत दिपके यांच्या टीममध्ये कोणाला संधी?  सौरव दास, आशुतोष रांका यांच्यावर कोणती जबाबदारी?
कॉकरोच जनता पार्टीची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, अभिजीत दिपके यांच्या टीममध्ये कोणाला संधी?
PM Modi Instagram Reel :'साथियो...' म्हणत नरेंद्र मोदींकडून रात्री पुन्हा व्हिडीओ शेअर, हातात शॉल घेऊन दिला 1905 चा संदर्भ
'साथियो...' म्हणत नरेंद्र मोदींकडून रात्री पुन्हा व्हिडीओ शेअर, हातात शॉल घेऊन दिला 1905 चा संदर्भ

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Pune Expressway Missing Link Accident: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर धडकी भरवणारा भीषण अपघात, कार टेम्पोला धडकली, एकाचा मृत्यू, पाहा भयंकर व्हिडीओ
मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर धडकी भरवणारा भीषण अपघात, कार टेम्पोला धडकली, एकाचा मृत्यू, पाहा भयंकर VIDEO
Pranit More Comeback After Controversy: 370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'
370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'
Mumbai Railway: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाट क्रमांक 16 वरील ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉकला पुन्हा मुदतवाढ; मेल-एक्सप्रेस गाड्यांवर होणार परिणाम
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाट क्रमांक 16 वरील ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉकला पुन्हा मुदतवाढ; मेल-एक्सप्रेस गाड्यांवर होणार परिणाम
Bhandara Crime News: भंडारा हादरलं! अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर सार्वजनिक शौचालयात अत्याचार; संतप्त नागरिकांकडून नराधमाला चोप, शहरात आज कडकडीत बंद
भंडारा हादरलं! अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर सार्वजनिक शौचालयात अत्याचार; संतप्त नागरिकांकडून नराधमाला चोप, शहरात आज कडकडीत बंद
Nagpur Crime: नागपूरमध्ये मुलीसोबत नको ते केलं, पोलिसांना खोलीत उत्साहवर्धक गोळ्या, पट्टा अन् हातमोजे सापडले, पोलिसांसमोर आरोपीचा माज कायम
नागपूरमध्ये मुलीसोबत नको ते केलं, पोलिसांना खोलीत उत्साहवर्धक गोळ्या, पट्टा अन् हातमोजे सापडले, पोलिसांसमोर आरोपीचा माज कायम
Eknath Shinde and PM Modi: सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्षाचा खटला निर्णायक वळणावर, जेन झी आंदोलनाचेही पडसाद, एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदींना भेटणार
सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्षाचा खटला निर्णायक वळणावर, जेन झी आंदोलनाचेही पडसाद, एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदींना भेटणार
Prashant Kishor and Sunil Tatkare: मी तुमच्यासोबत काम करावं वाटत असेल तर प्रदेशाध्यक्षांबाबत निर्णय घ्या, प्रशांत किशोरांनी सुनेत्रा पवारांना थेटच सांगितलं, सुनील तटकरेंबाबत नाराजी
मी तुमच्यासोबत काम करावं वाटत असेल तर प्रदेशाध्यक्षांबाबत निर्णय घ्या, प्रशांत किशोरांनी सुनेत्रा पवारांना थेटच सांगितलं, सुनील तटकरेंबाबत नाराजी
Nagpur Crime: वेळेत डिलिव्हरी करणं पडलं महाग! सहकाऱ्यानंच डिलिव्हरी बॉयचा काटा काढला; ऑनलाइन कंपनीतील कामगिरीच्या स्पर्धेतून जीवघेणा हल्ला, दोघांना अटक
वेळेत डिलिव्हरी करणं पडलं महाग! चांगला इन्सेंटिव्ह मिळवतो म्हणून सहकाऱ्यानंच डिलिव्हरी बॉयचा काटा काढला; दोघांना अटक, नागपूर हादरलं
Embed widget