एक्स्प्लोर
Advertisement
लोकसभा अध्यक्षांच्या दिमतीला भारदस्त जग्वार, किंमत....
नवी दिल्ली : लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या दिमतीला भारदस्त जग्वार कार आली आहे. त्यामुळेच आज ट्विटरवर जग्वार ट्रेण्डिंगमध्ये आहे. त्याचं कारणही तसंच आहे. या 'जग्वार'ची किंमत तब्बल 48.25 लाख इतकी आहे. या लॅविश कारच्या किमतीमुळे 'जग्वार' ट्विटरवर ट्रेण्ड करत आहे.
सुरक्षेसाठी भारदस्त कार
सुमित्रा महाजन यांच्याकडे असलेली ही जग्वार पांढऱ्या शुभ्र रंगाची आहे. लोकसभा अध्यक्ष असल्याने सुमित्रा महाजन यांच्या सुरक्षेची मोठी जबाबदारी सुरक्षा रक्षकांवर असते. त्यामुळेच सुरक्षा कवच असलेली 'जग्वार' सुमित्रा महाजन यांच्या ताफ्यात जमा झाली आहे.
ही गाडी महाजन यांना सोमवारी नवी दिल्लीत सुपूर्द करण्यात आली. यापूर्वी त्या टोयोटा कॅमरी वापरत होत्या. मात्र अद्ययावत आणि सुरक्षेच्या दृष्टीने त्यांच्यासाठी नव्या कारची मागणी होत होती. त्यासाठी 23 मे रोजी जग्वार या कारसाठी रक्कम मंजूर झाली होती. अखेर 48 लाख 25 हजार 661 रुपयांची जग्वार महाजन यांच्या दिमतीला आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बीड
करमणूक
राजकारण
Advertisement