Lok Sabha Election Exit Poll 2024 LIVE Updates : मतदान सुरु असतानाच इंडिया आघाडीची बैठक; ममता दीदींच्या निर्णयाने भूवया उंचावल्या
काँग्रेस, सीपीआय-एम, सीपीआय, डीएमके, ए, आरजेडी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी चर्चा करणार आहेत.
![Lok Sabha Election Exit Poll 2024 LIVE Updates : मतदान सुरु असतानाच इंडिया आघाडीची बैठक; ममता दीदींच्या निर्णयाने भूवया उंचावल्या Lok Sabha Election Exit Poll 2024 LIVE Updates top leaders of the INDIA bloc will meet here on Saturday to discuss their strategy for the counting of votes on June 4 Lok Sabha Election Exit Poll 2024 LIVE Updates : मतदान सुरु असतानाच इंडिया आघाडीची बैठक; ममता दीदींच्या निर्णयाने भूवया उंचावल्या](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/01/73eafcc6391c04f0a4ece6b6dc378f3c1717234194453736_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान आज (1 जून) होत आहे. आज सायंकाळी सहा वाजल्यापासून एक्झिट पोलचा अंदाज (Lok Sabha Election Exit Poll 2024 LIVE Updates ) येणार आहेत. दुसरऱ्या बाजूला 4 जून रोजी होणाऱ्या मतमोजणीसाठी रणनीतीवर चर्चा करण्यासाठी इंडिया आघाडीची सुद्धा महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. TMC आणि PDP ने बैठकीपासून अंतर ठेवले आहे. काँग्रेस, सीपीआय-एम, सीपीआय, डीएमके, ए, आरजेडी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी चर्चा करणार आहेत.
ममता बॅनर्जी उपस्थित राहणार नाहीत
टीएमसी प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आधीच सांगितले आहे की ते राज्यात निवडणूक असल्याने बैठकीला उपस्थित राहणार नाही. पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता कमी आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल जेलमध्ये आत्मसमर्पण करणार असल्याने पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. तसेच राहुल गांधी आणि केसी वेणुगोपाल यांच्यासह काँग्रेसचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत.
मतमोजणीच्या तयारीवर चर्चा करण्यासाठी बैठक
द्रमुकचे प्रमुख आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी सांगितले की, पक्षाचे नेते टीआर बालू या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. एमके स्टॅलिन 'एक्स'वर पोस्ट करत म्हटले आहे की, "4 जून हा दिवस भारतासाठी एका नवीन पहाटेची सुरुवात करेल. भारताच्या गटनेत्यांच्या आजच्या बैठकीत, DMK चे प्रतिनिधित्व आमच्या पक्षाचे कोषाध्यक्ष आणि DMK च्या संसदीय पक्षाचे नेते करतील. खरगे यांनी दिलेल्या माहितीनुसार अनौपचारिक बैठक असेल. मतमोजणीच्या दिवशी कोणत्या प्रकारची तयारी करावी आणि लोकांनी कसे सतर्क राहावे. तसेच ईव्हीएम किंवा फॉर्म 17 सी वापरण्याबाबत चर्चा करतील. ही बैठक केवळ मतमोजणीच्या तयारीवर चर्चा करण्यासाठी आहे आणि काँग्रेसने आधीच आपल्या राज्य घटकांना फॉर्म 17C बाबत सतर्क राहण्यास सांगितले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)