(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'सोबत मिळून काम करू', पंतप्रधान मोदींनी ऋषी सुनक यांना ब्रिटनचे पंतप्रधान झाल्याबद्दल दिल्या शुभेच्छा
PM Modi-Rishi Sunak: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिटनचे नवे पंतप्रधान म्हणून निवड झाल्याबद्दल भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांचे अभिनंदन केले.
PM Modi-Rishi Sunak: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिटनचे नवे पंतप्रधान म्हणून निवड झाल्याबद्दल भारतीय वंशाचे ऋषी सुनक (Rishi Sunak) यांचे अभिनंदन केले. तसेच जागतिक समस्यांवर एकत्र काम करण्यास आणि रोडमॅप 2030 ची अंमलबजावणी करण्यास ते उत्सुक असल्याचे सांगितले आहे. पंतप्रधान मोदी ट्वीट करून असे म्हणाले आहेत.
पंतप्रधान मोदी ट्वीट करून म्हणाले की, “ऋषी सुनक यांचे मनःपूर्वक अभिनंदन! तुम्ही ब्रिटनचे पंतप्रधान बनणार आहात, मी जागतिक समस्यांवर एकत्र काम करण्यास आणि रोडमॅप 2030 ची अंमलबजावणी करण्यास उत्सुक आहे. ब्रिटिश भारतीयांना दिवाळीच्या विशेष शुभेच्छा. आपण ऐतिहासिक संबंधांचे आधुनिक भागीदारीत रूपांतर केले आहे. तसेच ब्रिटनच्या पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल ऋषी सुनक यांनी म्हटलं आहे की, सहकारी खासदारांचा पाठिंबा मिळाल्याने आणि नेतेपदी निवड झाल्याने ते कृतज्ञ आहेत. ही जबाबदारी ते नम्रतेने स्वीकारतात, असं ते म्हणाले आहेत. तसेच ब्रिटनच्या पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल ऋषी सुनक यांनी म्हटलं आहे की, सहकारी खासदारांचा पाठिंबा मिळाल्याने आणि नेतेपदी निवड झाल्याने ते कृतज्ञ आहेत. ही जबाबदारी ते नम्रतेने स्वीकारतात, असं ते म्हणाले आहेत.
दरम्यन, भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे ब्रिटनचे नवे पंतप्रधान बनून नवा इतिहास रचणार आहेत. दिवाळीच्या दिवशी पेनी मॉर्डेंटने शर्यतीतून माघार घेतल्याच्या घोषणेसह, सुनक यांची कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेतेपदी बिनविरोध निवड झाली. 42 वर्षीय ऋषी सुनक कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या 357 खासदारांपैकी अर्ध्याहून अधिक खासदारांचा पाठिंबा होता, तर विजयासाठी त्यांना किमान 100 खासदारांची गरज होती.
Warmest congratulations @RishiSunak! As you become UK PM, I look forward to working closely together on global issues, and implementing Roadmap 2030. Special Diwali wishes to the 'living bridge' of UK Indians, as we transform our historic ties into a modern partnership.
— Narendra Modi (@narendramodi) October 24, 2022
या निवडणुकीत ब्रिटनच्या माजी गृहमंत्री प्रिती पटेल, कॅबिनेट मंत्री जेम्स क्लेव्हर्ली आणि नदीम जाहवी यांच्यासह अनेक प्रमुख कंझर्वेटिव्ह खासदारांनी माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा गट सोडत सुनक यांना पाठिंबा दिला आहे.
इतर महत्वाची बातमी: