एक्स्प्लोर
इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याच्या मुदतीत 5 दिवसांनी वाढ
नवी दिल्ली : इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत 5 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी आणखी 5 दिवसांचा अवधी मिळणार आहे.
यापूर्वी रिटर्न भरण्याची मुदत 31 जुलैपर्यंत होती. मात्र बँकांच्या संपामुळे सरकारनं 5 ऑगस्टपर्यंत मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकार बँकिग क्षेत्रात करत असलेल्या विविध बदलांना विरोध म्हणून आज देशभरातील बँकांचा एकदिवसीय संप आहे. त्यामुळे शनिवार, रविवार पकडून 3 दिवस सलग बँका बंद असणार आहेत. यामध्ये सहकारी, खासगी आणि विदेशी बँकांचा समावेश आहे.
देशभरातील बँकाचा आज एकदिवसीय संप, पुढचे सलग 3 दिवस बँका बंद
या संपामुळे बँकांच्या चेक क्लिअरन्स, पैसे भरणे, पैसे काढणे यासारख्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होईल. दरम्यान काश्मीरमधील करदात्यांना 31 ऑगस्टपर्यंत इन्कम टॅक्स रिटर्न भरता येणार आहे. तिथं सुरु असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर सरकारनं हा निर्णय घेतला आहे.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement