एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
जुन्या नोटा भरण्यासाठी उरला अवघा 1 दिवस, RBI बाहेर रांगा!
मुंबई: नोटबंदीनंतर जुन्या नोटा बँकेत भरण्यासाठी आरबीआयनं दिलेली मुदत संपायला अवघे काहीच तास उरले आहेत. रिझर्व्ह बँकेत उद्या 31 मार्चला संध्याकाळपर्यंतच या नोटा बदलून देण्यात येणार आहेत.
त्यामुळे ही शेवटची संधी साधण्यासाठी आरबीआयच्या बाहेर लोकांची गर्दी दिसून येत आहे. आरबीआयच्या मुंबई, नागपूर, दिल्ली, कोलकाता आणि चेन्नई या कार्यालयांतच जुन्या नोटा भरता येणार आहेत.
नोटाबंदीदरम्यान परदेशात असणाऱ्या भारतीयांनाच या नोटा बँकेत जमा करता येणार आहेत. तर अनिवासी भारतीयांसाठी ही मुदत 30 जूनपर्यंत आहे.
सध्या तापमानाचा पारा वाढला असून एरव्ही गारेगार एसीमध्ये एमिग्रेशनसाठी रांगा लावणारे एनआरआय तसंच घरातल्या डब्यात, पुस्तकांत नोटा जपून ठेवणारे सर्वसामान्य असे सगळे या रांगेत उभे राहिल्याचं दिसून येत आहेत.
नागपुरातही कडाक्याच्या उऩ्हात नोटा बदलण्यासाठी रांगाच रांगा लागलेल्या दिसून येत आहेत.
कोणाच्या आईला विस्मृतीचा आजार झाल्यानं, कोणाच्या मुलाला लग्नात जुन्या नोटांचा आहेर मिळाल्यानं तर कुणा एनआरआयला परदेशातून आणलेल्या नोटा बदलायच्या असल्यानं उन्हातान्हात हे लोक रांगा लावून उभे आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी 500 आणि 1 हजार रुपयांच्या जुन्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी 30 डिसेंबरपर्यंत बँकांमधून नोटा बदलून मिळतील असं जाहीर केलं होतं. मात्र तरीही नोटा असतील तर त्या प्रतिज्ञापत्रासह रिझर्व्ह बँकेतूनच बदलून मिळणार होत्या. त्यासाठी 31 मार्च ही मुदत होती. ही मुदत उद्या संपणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement