गेल्या 24 तासात देशभरात 9 हजार 195 कोरोना रुग्णांची नोंद, तर 302 जणांचा मृत्यू
आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात देशात नऊ हजाराहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 302 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
India Coronavirus Updates : सध्या देशात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. गेल्या 24 तासात देशात नऊ हजाराहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासांमध्ये 9 हजार 195 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, 302 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर देशात ओमायक्रॉन रुग्णांच्या संख्येत देखील वाढ होत आहे. सध्या देशभरात ओमायक्रॉनची संख्या ही 800 च्या जवळपास गेली आहे.
देशात ओमायक्रॉनचा धोका देखील वाढ असल्याचे चित्र दिसत आहे. देशातील 21 राज्यांमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. मागच्या 24 तासात ओमायक्रॉनच्या 128 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या देशात ओमायक्रॉनची रुग्णसंख्या ही 781 आहे. तर उपचारानंतर 241 ओमायक्रॉनचे रुग्ण बरे झाले आहेत.
देशभरात कोरोना संसर्गाची स्थिती
कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत देशात एकूण 3 कोटी 48 लाख 8 हजार लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 4 लाख 80 हजार लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. चांगली बाब म्हणजे आतापर्यंत 3 कोटी 42 लाख 51 हजार लोक कोरोनामधून बरे झाले आहेत. सध्या देशात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ही 1 लाखांपेक्षा कमी आहे. सध्या देशात 77 हजार 2 लोक हे कोरोनाबधीत असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर देशात एकूण लसीकरणाचे 143 कोटी 15 लाख 35 हजार डोस देण्यात आले आहेत.
143 कोटी लसींचे डोस
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार 28 डिसेंबर 2021 पर्यंत देशभरात कोरोना लसीचे 143 कोटी 15 लाख 35 हजार डोस देण्यात आले आहेत. शेवटच्या दिवशी 64.61 लाख लसीकरण करण्यात आले. त्याच वेळी, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) नुसार, आतापर्यंत सुमारे 67.52 कोटी कोरोना चाचण्या झाल्या आहेत. शेवटच्या दिवशी 11.67 लाख कोरोना सॅम्पल टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्याचा पॉझिटिव्ह रेट हा 1 टक्क्यांपेक्षा देखील कमी आहे. देशात कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण हे 1.38 टक्के आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 98.40 टक्के आहे. सक्रिय रुग्णांचे प्रमाण हे 0.22 टक्के आहे. कोरोना अॅक्टिव्ह केसेसच्या बाबतीत भारत आता जगात 33 व्या क्रमांकावर आहे. एकूण संक्रमित संख्येच्या बाबतीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर अमेरिका आणि ब्राझीलमध्ये सर्वाधिक मृत्यू हे भारतात झाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
- PM Modi New Car : स्फोटकं असो की AK47, अभेद्य सुरक्षा कवच, पंतप्रधान मोदींची 12 कोटीची कार नेमकी आहे कशी?
- Thackeray vs Koshyari : ही कोणती भाषा? मुख्यमंत्र्यांच्या पत्रावर राज्यपाल खवळले