Coronavirus : गेल्या 24 तासात देशात 30 हजार 615 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, तर 514 जणांचा मृत्यू
आज कालच्यापेक्षा कोरोना रुग्णांची संख्या थोडी वाढली हे. गेल्या 24 तासात देशात 30 हजार 615 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 514 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
Coronavirus Cases Today in India : मागच्या काही दिवसापासून कोरोना (Coronavirus) रुग्णांच्या संख्येत दररोज घट होताना दिसत होत. मात्र, आज कालच्यापेक्षा कोरोना रुग्णांची संख्या थोडी वाढली हे. गेल्या 24 तासात देशात 30 हजार 615 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 514 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. काल देशात 27 हजार 409 कोरोनाचे रुग्ण आढळले होते. कालच्यापेक्षा आज 3 हजार 206 जास्त रुग्णांची नोंद झाली आहे.
सध्या देशातील सक्रिय रुग्णांची संख्या ही 3 लाख 7 हजार 240 झाली आहे. केद्रीय आरोग् मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. आत्तापर्यंत कोरोनामुळे 5 लाख 9 हजार 872 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आत्तापर्यंत कोरोनामुळे 4 कोटी 18 लाख 43 हजार 446 लोक कोरोनातून मुक्त झाले आहेत.
केरळमध्ये कोरोनाचा कहर सुरूच
दक्षिणेकडील केरळ राज्यात अजूनही मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोना रुग्णांची संख्या 10 हजारांच्या खाली गेल्यानंतर, मंगळवारी पुन्हा 11,776 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झासी आहे. कोरोना रुग्णांमध्ये वाड झाली आहे. त्यामुळे राज्यात आतापर्यंत एकूण कोरोना बाधितांची संख्या 64 लाख 28 हजार 148 झाली आहे. मंगळवारी केरळमध्ये कोविडमुळे 304 जणांचा मृत्यू झाला असून, या साथीने एकूण मृतांची संख्या ही 62 हजार 681 झाली आहे. केरळमधील रुग्णालयातून सोमवारी 32,027 लोकांना डिस्चार्ज मिळाल्याने, राज्यातील एकूण संसर्गमुक्त लोकांची संख्या 62 लाख 40 हजार 864 झाली आहे.
आतापर्यंत लसीचे 173 कोटी डोस
देशात सध्या मोठ्या प्रमाणावर लसीकरण देखील सुरू आहे. ज्यांनी लस घेतली नाही, त्यांना लसीकरण करुन घेण्याचे आवाहन सरकारच्या वतीने करण्यात आहे. आत्तापर्यंत देशात 173 कोटी 86 लाख 81 हजार 476 लसीचे डोस देण्यात आले आहेत. काल दिवसभरात 41 लाख 54 हजार 476 डोस देण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- Lassa fever : ओमायक्रॉननंतर धुमाकूळ घालतोय 'लासा फिवर'; काय आहेत लक्षणं?
- ABG Bank Fraud : काही राज्यांनी CBIच्या तपासाची संमती काढून घेतल्याने अनेक अडचणी: सीबीआयचा राज्य सरकारांवर गंभीर आरोप
- PM Modi on Bappi Lahiri : 'जिंदादिल बप्पी लाहिरींच्या निधनानं दु:खी झालोय'; आठवण शेअर करत पंतप्रधान मोदींच्या भावना