एक्स्प्लोर

Kedarnath Landslide : केदारनाथमध्ये मोठी दुर्घटना! यात्रेच्या मुख्य मार्गावर दरड कोसळली, 10 हून अधिक लोक बेपत्ता

Kedarnath Disaster : केदारनाथ यात्रेचा मुख्य मार्ग असलेल्या गौरीकुंड (Rudraprayag Landslide) येथे भूस्खलन होऊन मोठी दुर्घटना घडली आहे. दरड कोसळल्याने येथे 10 ते 12 जण बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे. 

Kedarnath Landslide : उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) मुसळधार पावसामुळे दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. केदारनाथ (Kedarnath) यात्रेचा मुख्य मार्ग असलेल्या गौरीकुंड येथे भूस्खलन झालं आहे. दरड कोसळल्याने येथे 10 ते 12 जण बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे. रुद्रप्रयाग आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहिती नुसार, भूस्खलनात 10 ते 12 लोक गाडले जाण्याची किंवा वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

उत्तराखंडमध्ये मोठी दुर्घटना, भूस्खलनामुळे 10 हून अधिक लोक बेपत्ता

मुसळधार पावसामुळे उत्तराखंडमध्ये भूस्खलन झालं आहे. उत्तराखंडमधील रुद्रप्रयागमधील (Rudraprayag Landslide) केदारनाथ यात्रेच्या मुख्य थांबा असलेल्या गौरीकुंड येथे दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. ढिगारा खाली कोसळल्याने अनेक दुकाने वाहून गेली. ज्यामध्ये 10-12 लोक वाहून गेल्याची किंवा गाडल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. SDRF कडून या ठिकाणी शोध आणि बचावकार्य राबवण्यात येत असून नागरिकांना शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे. 

केदारनाथ यात्रेच्या मुख्य मार्गावर दरड कोसळली

ही दुर्घटना गुरुवारी रात्री दीड वाजताच्या सुमारास घडल्याची माहिती समोर आली आहे. गौरीकुंड दात पुलियाजवळ दरड कोसळली आहे. काल रात्री उशिरा दरड कोसळल्याने दोन दुकाने वाहून गेल्याची माहिती आहे. सेक्टर ऑफिसर गौरीकुंड, एनडीआरएफ (NDRF), एसडीआरएफ (SDRF) ही पथकं घटनास्थळी दाखल झाले आहेत. आपत्ती व्यवस्थापन अधिकारी आणि डीडीआरएफ टीम मुख्यालय उपकरणांसह घटनास्थळी रवाना झाली आहे. मुसळधार पाऊस आणि वरून दगड कोसळल्याने शोध आणि बचाव कार्य काही काळ थांबवण्यात आले असून सर्व पथके घटनास्थळी हजर आहेत.

डोंगरावरून दगड तुटून दोन दुकानांवर पडले

केदारनाथ धामचा मुख्य थांबा असलेल्या गौरीकुंड येथील डाकपुलियाजवळ डोंगरावरून दगड तुटून दोन दुकानांवर पडल्याने दुकानांचे नुकसान झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 13 जण बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. एसडीआरएफचे (SDRF) पथक घटनास्थळी तपासात गुंतले आहे. राज्यातील विविध डोंगराळ भागात गुरुवारी रात्रीपासून पाऊस पडत आहे. पावसामुळे गौरीकुंड येथील डोंगरावरून दगड कोसळून दुकानांवर पडले आहेत.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : लाडक्या बहिणींची कोणतीही योजना बंद होणार नाही, राज्यात एक कोटी लखपती दीदी करणार: देवेंद्र फडणवीस
लाडक्या बहिणींची कोणतीही योजना बंद होणार नाही, राज्यात एक कोटी लखपती दीदी करणार: देवेंद्र फडणवीस
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2025 | शनिवार
धरालीनंतर आता थराली; उत्तराखंडमध्ये आभाळ फाटण्याची मालिका सुरुच, 70 ते 80 घरे गाळाने भरली, लष्कराला पाचारण
धरालीनंतर आता थराली; उत्तराखंडमध्ये आभाळ फाटण्याची मालिका सुरुच, 70 ते 80 घरे गाळाने भरली, लष्कराला पाचारण
Indian Post : ट्रम्प यांच्या नवीन नियमाचा भारताला फटका, अमेरिकेकडे जाणारी टपाल सेवा तात्पुरती बंद, भारतीय पोस्टची घोषणा
ट्रम्प यांच्या नवीन नियमाचा भारताला फटका, अमेरिकेकडे जाणारी टपाल सेवा तात्पुरती बंद, भारतीय पोस्टची घोषणा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Powai Filterpada  : वाहून जाताना तरुण थोडक्यात वाचला, पवईतल्या फिल्टरपाड्यातील धक्कादायक घटना
Mumbai Rain Filterpada Powai : हात सुटला, तरुण वाहून गेला! मुंबईतील धडकी भरवणारा व्हिडीओ
Maharashtra Rains | Raigad ला Red Alert, शाळा बंद; Mumbai-Goa Highway ठप्प, 15 जणांना वाचवले
Chiplun Floods | चिपळूणमध्ये Vashishthi, Shiviya नद्यांना पूर, Parshuram Ghat मध्ये भीषणता
Maharashtra Rains | चिपळूणमध्ये पूरस्थिती, नद्या धोका पातळीवर, प्रशासनाचा इशारा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis : लाडक्या बहिणींची कोणतीही योजना बंद होणार नाही, राज्यात एक कोटी लखपती दीदी करणार: देवेंद्र फडणवीस
लाडक्या बहिणींची कोणतीही योजना बंद होणार नाही, राज्यात एक कोटी लखपती दीदी करणार: देवेंद्र फडणवीस
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2025 | शनिवार
धरालीनंतर आता थराली; उत्तराखंडमध्ये आभाळ फाटण्याची मालिका सुरुच, 70 ते 80 घरे गाळाने भरली, लष्कराला पाचारण
धरालीनंतर आता थराली; उत्तराखंडमध्ये आभाळ फाटण्याची मालिका सुरुच, 70 ते 80 घरे गाळाने भरली, लष्कराला पाचारण
Indian Post : ट्रम्प यांच्या नवीन नियमाचा भारताला फटका, अमेरिकेकडे जाणारी टपाल सेवा तात्पुरती बंद, भारतीय पोस्टची घोषणा
ट्रम्प यांच्या नवीन नियमाचा भारताला फटका, अमेरिकेकडे जाणारी टपाल सेवा तात्पुरती बंद, भारतीय पोस्टची घोषणा
Akola News : शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार नाही, पाशा पटेलांच्या वक्तव्यावर महादेव जानकरांची प्रतिक्रिया, सरकारी पदावरील व्यक्तीने...
शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार नाही, पाशा पटेलांच्या वक्तव्यावर महादेव जानकरांची प्रतिक्रिया, सरकारी पदावरील व्यक्तीने...
Mumbai Metro : गणेशोत्सवात मुंबईकरांचा प्रवास सोयीस्कर, मुंबई मेट्रो लाईन 2A आणि Line 7 वर गाड्या मध्यरात्रीपर्यंत धावणार; जाणून घ्या टाईमटेबल
गणेशोत्सवात मुंबईकरांचा प्रवास सोयीस्कर, मुंबई मेट्रो लाईन 2A आणि Line 7 वर गाड्या मध्यरात्रीपर्यंत धावणार; जाणून घ्या टाईमटेबल
टॅरिफमध्ये डबल दंडित केल्यानंतरही अमेरिकेचा भारताला झटका सुरुच; एक चुकीचा यू टर्न अन् थेट व्हिसा थांबवला! डेमोक्रॅट आणि रिपब्लिकन आमनेसामने
टॅरिफमध्ये डबल दंडित केल्यानंतरही अमेरिकेचा भारताला झटका सुरुच; एक चुकीचा यू टर्न अन् थेट व्हिसा थांबवला! डेमोक्रॅट आणि रिपब्लिकन आमनेसामने
माझं लेकरु मेलं नाही, त्यांनी मारलंय...;  श्रीनाथ गित्तेच्या आईला अश्रू अनावर, नेमकं प्रकरण काय?
माझं लेकरु मेलं नाही, त्यांनी मारलंय...; श्रीनाथ गित्तेच्या आईला अश्रू अनावर, नेमकं प्रकरण काय?
Embed widget