एक्स्प्लोर
Advertisement
कोकण आणि गोवा किनारपट्टीला 'क्यार' चक्रीवादळाचा धोका, प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
गोवा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगडला मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार असून ढगफुटीसारखा पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याच्या तज्ज्ञांनी दिला आहे. वादळाचा फटका मुंबईलाही बसणार आहे.
मुंबई : अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने कोकण आणि गोवा किनारपट्टीला 'क्यार' या चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. येत्या 48 तासात महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी ऐन दिवाळीत हे वादळ कोकण आणि गोवा किनारपट्टीवर धडकणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. गोवा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगडला मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार असून ढगफुटीसारखा पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याच्या तज्ज्ञांनी दिला आहे. वादळाचा फटका मुंबईलाही बसणार आहे.
अरबी समुद्रात 8 दिवसापासून कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने या वादळाचे चक्रीवादळात रुपांतर झाले आहे. अरबी समुद्रात जरी वादळ निर्माण होत असले तरी किनारपट्टीला धडकणार नाही. 80 ते 90 किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील त्यामुळे झाड़े, विद्युत खांब कोसळतील, असा अंदाज देखील व्यक्त केला आहे. रत्नागिरीपासून 240 किलोमीटर असून दक्षिण आणि दक्षिणपूर्व मुंबईपासून हे वादळ 380 किलोमीटर अंतरावर आहे. वादळ ओमानच्या दिशेने सरकण्याची चिन्हे आहेत,असे हवामान खात्याने सांगितलं आहे. या काळात 'क्यार'ची तीव्रता वाढणार असल्याने मुंबई-कोकणात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. 25 ते 30 ऑक्टोबरपर्यंत वादळाचा परिणाम जाणवणार आहे. 30 ऑक्टोबरनंतर हे वादळ ओमानच्या दिशेने सरकेल.
'क्यार' चक्रीवादळाचा फटका कोकण किनारपट्टीला बसला आहे. केरळ, तामिळनाडू, गुजरात, कर्नाटक राज्यातील अनेक बोटी आश्रयासाठी कोकणातील सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या देवगड बंदरात आणल्या आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व बोटी देवगडमध्ये दाखल झाल्या आहेत. 'क्यार' चक्रीवादळचा फटका मासेमारी व्यवसायाला आणि पर्यटन व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने तळकोकणात सर्वत्र मुसळधार पाऊस पडत असल्याने जिल्ह्यातील मुख्य पीक असलेलं भात पिकांचे मोठ नुकसान झाले आहे.
चक्रीवादळात कोणती काळजी घ्यावी ?
१) घरातील विजेची उपकरणे बंद करा
२) गॅसचा पुरवठा बंद करा
3) अफवांकडे दुर्लक्ष करा, शांत रहा, घाबरू नका.
४) कनेक्टिव्हिटी सुनिश्चित करण्यासाठी आपले मोबाइल फोन चार्ज ठेवा; एसएमएस वापरा
५) दरवाजे आणि खिडक्या बंद ठेवा.
६) जर आपले घर असुरक्षित असेल तर चक्रीवादळापूर्वी लवकर डागडुजी करून घ्या.
८)आपले कागदपत्रे आणि मौल्यवान वस्तू वॉटर-प्रूफ कंटेनरमध्ये ठेवा.
९) उकळलेले पाणी प्या / क्लोरीनयुक्त पाणी प्या.
१०) केवळ अधिकृत चेतावणीवर विश्वास ठेवा.
११) सुरक्षा आणि जीवनावश्यक वस्तूंसह आपत्कालीन किट तयार करा.
१२) आपले घर सुरक्षित करा; दुरुस्ती पार पाडणे; तीक्ष्ण वस्तू सैल सोडू नका.
१३) तुटलेल्या विद्युत खांब व तारा व इतर तीक्ष्ण वस्तूपासून सरक्षित रहा.
१४) शक्यतो लवकरात लवकर सुरक्षित स्थळी आश्रय घ्या. मच्छीमारांनी नौका उंचवट्यांना सुरक्षित ठिकाणी बांधा.
१५) समुद्रात जाऊ नका, गेले असाल तर तात्काळ जवळच्या बंदरात परत जा.
१६) प्रशासन सांगेपर्यंत समुद्रात जाऊ नका.
आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, विवेकानंद कदम यांच्याशी 9158760756, 8329439902 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन पालघरचे जिल्हा व्यवस्थापन अधिकारी डाॅ. कैलास शिंदे यांनी केले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
सोलापूर
निवडणूक
निवडणूक
Advertisement