एक्स्प्लोर

IIT बॉम्बेत शिक्षण, एअरोस्पेस इंजिनिअर, आता सगळं सोडून साधू झाला; कुंभमेळ्यातल्या 'त्या' तरुणाची थक्क करणारी कहाणी!

महाकुंभमेळ्यात सध्या एका तरुण साधूची सगळीकडे चर्चा आहे. हा तरुण साधू आयआयटीयन आहे. त्याने एअरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये शिक्षण घेतलेलं आहे.

प्रयागराज : सध्या उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभमेळा चालू आहे. या महाकुंभमेळ्यात देशातील कानाकोपऱ्यातून भाविक त्रिवेणीसंमगावर पवित्र स्नान करण्यासाठी येत आहेत. यासह या कुंभमेळ्यात स्नानासाठी येणारे साधू सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. काही दिवसांवूर्वी एका सुंदर तरुणीने अध्यात्माकडे जात असल्याचे सांगत होते. याच महाकुंभमेळ्यात डोक्यावर एक पक्षी असलेला साधू सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होता. असे असतानाच चक्क आयआयटीचे शिक्षण घेतलेला साधू समोर आला आहे. या उच्चशिक्षित साधूची सध्या जगभरात चर्चा आहे. 

आयआयटी बॉम्बेमधून इंजिनिअरिंगचे शिक्षण

सध्या चर्चेत आलेले हे तरुण साधू उच्चशिक्षित आहेत. त्यांनी आयआयटी बॉम्बेमधून एअरोस्पेस इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेले आहे. सोबतच फोटोग्राफीची आवड असल्यामुळे त्यांनी व्ह्युज्यूअल कम्यूनिकेशनचेही शिक्षण घेतलेले आहे. मात्र कशातही शांती, सुख, समाधान न मिळाल्याने शेवटी या तरुणाने साधू होण्याचा निर्णय घेतला. या तरुण साधूने स्वत:च त्याची ही कहाणी सांगितली आहे. 

मी हसत हसत मरणार 

एका माध्यमाशी बोलताना त्यांनी आपली साधू होण्याची कहाणी सांगितली आहे. "मला तर खूप सारी नावं मिळाली आहेत. राघव, माधव, मशानी गोरख, बटुक भैरव अशी खूप सारी नावे मिळाली आहेत. जगात कधीही अंत होऊ शकतो. मी हसत हसत मरणार आहे. मृत्यू कधीही येऊ शकतो. मी जर हसत नसेल आणि माझा अंत जवळ आला तर मी काय देवाला थांबा थांब म्हणू का," असे या साधुने सांगितले.

थ्री इडियट्सप्रमाणे आर्ट्समध्ये

मी आयआयटी बॉम्बे येथून शिकलेलो आहे. मी एअरोस्पेस इंजिनिअरिंग केलेले आहे. माझी ही अवस्था सर्वात चांगली अवस्था आहे. तुम्ही ज्ञानाच्या शोधात चालत राहिलात तर शेवटी इथेच याल. माझा जन्म हरियाणात झालेला आहे. मी चार वर्षे आयआयटी मुंबईत होतो. मी फोटोग्राफी शिकलो. थ्री इडियट्सप्रमाणे आर्ट्समध्ये गेलो. मी एक वर्ष फिजिक्स शिकवलेलं आहे. मला फोटोग्राफीमध्ये काम करायचे होते. पदवी अशल्याशिवाय मला कोणी काम देत नव्हते. त्यानंतर मी मास्टर्स इन डिझाईन ही पदवी घेण्यासाठी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झालो. त्यानंतर फोटोग्राफी शिकलो, असं या तरुण साधून सांगितले.

मी ट्रॅव्हल फोटोग्राफर होतो

मी आयुष्य म्हणजे काय हे समजून घेत होतो. सुरुवातीला मला पॅशन म्हणजे आयुष्य वाटले. त्यानंतर मग मी फोटोग्राफी करण्याचे ठरवले. ड्रीम लाईफ जगण्यासाठी माझी धडपड चालू होती. पैसे येतील, मजा करेन, असा माझा विचार होता. मी ट्रॅव्हल फोटोग्राफर होतो. मी दीड महिने काशीत राहिलो. त्यानंतर आता मी कुंभमेळ्यात आलो," अशीही माहिती या तरुण साधून दिली. 

मला साधं जेवण बनता येत नव्हतं

हा तरुण साधू तीन ते चार महिने ऋषिकेशमध्ये होता. त्यानंतर त्यांनी पदयात्रा केली होती. ते रोज 20 किलोमिटर करायचे. चारधाम यात्रा करून आता ते कुंभमेळ्यात आले आहेत. आयआयटीमध्ये शिक्षण घेतलं मला काही मिळालं नाही, नंतर फोटोग्राफी केली मला समाधान मिळालं नाही, नंतर मी का फिरतोय हा प्रश्न मला पडला. मला काहीच माहिती नाही, असं मला समजलं नाही. नंतर मी धर्मशाळेत गेलो. तिथे मी खूप काही शिकलो. मला साधं जेवण बनता येत नव्हतं. मला फार आश्चर्य वाटलं. नंतर मग मी रोजच्या जगण्यातली कामं शिकू लागलो, असं या साधून सांगितलं. एवढा उच्चशिक्षित असताना हा तरुण साधू झाल्यामुळे सगळीकडे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

पाहा व्हिडीओ :

हेही वाचा :

त्या सुंदर साध्वीचं एका रात्रीत नशीब पालटलं, भारतभरात फेमस, इन्स्टाग्रामवर काही तासांत 1 मिलियन फॉलोवर्स!  

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Politics: इकडे नाशिकमधील काँग्रेस पदाधिकऱ्यांनी मनसेशी युती जाहीर केली, पण मुंबईतील नेत्याने अवघ्या 15 मिनिटातच तोंडघशी पाडलं; नेमकं काय घडलं?
इकडे नाशिकमधील काँग्रेस पदाधिकऱ्यांनी मनसेशी युती जाहीर केली, पण मुंबईतील नेत्याने अवघ्या 15 मिनिटातच तोंडघशी पाडलं; नेमकं काय घडलं?
Sangli Bailgada Race Sharyat: बकासूर, मथूर, हरण्या सगळ्यांना मागे टाकलं, वेगाचा बादशाह सर्जाने बैलाने मैदान मारलं, आता फॉर्च्युनरही काळ्या रंगाचीच मागणार
बकासूर, मथूर, हरण्या सगळ्यांना मागे टाकलं, वेगाचा बादशाह सर्जाने बैलाने मैदान मारलं, आता फॉर्च्युनरही काळ्या रंगाचीच मागणार
Sandeep Deshpande on Ashish Shelar: 'मोहम्मद पठाण स्पेशली डेडिकेटेड टू आशिष शेलार' संदीप देशपांडेंकडून शेलारांच्या बांद्रा पश्चिम मतदारसंघातील बोगस मतदारांची पोलखोल!
'मोहम्मद पठाण स्पेशली डेडिकेटेड टू आशिष शेलार' संदीप देशपांडेंकडून शेलारांच्या बांद्रा पश्चिम मतदारसंघातील बोगस मतदारांची पोलखोल!
डॉक्टरच्या खोलीत तब्बल 300 किलो RDX सापडलं; AK-56 आणि काडतुसे जप्त, दोन दिवसांपूर्वीच, काश्मीरमध्ये त्याच्याच लॉकरमध्ये एके-47 सापडली
डॉक्टरच्या खोलीत तब्बल 300 किलो RDX सापडलं; AK-56 आणि काडतुसे जप्त, दोन दिवसांपूर्वीच, काश्मीरमध्ये त्याच्याच लॉकरमध्ये एके-47 सापडली
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sharad Pawar Meet CM : शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट, एमसीए निवडणुकीसंदर्भात चर्चा
Sharad Pawar Meet Devendra Fadnavis: शरद पवारांनी घेतली होती 'मुख्यमंत्री' फडणवीसांची भेट, MCA निवडणुकीचं राजकारण तापलं
Gujrat Terrorist : काल तीन दहशतवाद्यांना अटक, आज मोठा खुलासा
Sharad Pawar Meet Devendra Fadnavis: शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, MCA निवडणुकीवर खलबतं
MNS Banner : मतदारायादीतील घोळाबाबत मनसेची बॅनरबाजी, निवडणुकीचा धुरळा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Politics: इकडे नाशिकमधील काँग्रेस पदाधिकऱ्यांनी मनसेशी युती जाहीर केली, पण मुंबईतील नेत्याने अवघ्या 15 मिनिटातच तोंडघशी पाडलं; नेमकं काय घडलं?
इकडे नाशिकमधील काँग्रेस पदाधिकऱ्यांनी मनसेशी युती जाहीर केली, पण मुंबईतील नेत्याने अवघ्या 15 मिनिटातच तोंडघशी पाडलं; नेमकं काय घडलं?
Sangli Bailgada Race Sharyat: बकासूर, मथूर, हरण्या सगळ्यांना मागे टाकलं, वेगाचा बादशाह सर्जाने बैलाने मैदान मारलं, आता फॉर्च्युनरही काळ्या रंगाचीच मागणार
बकासूर, मथूर, हरण्या सगळ्यांना मागे टाकलं, वेगाचा बादशाह सर्जाने बैलाने मैदान मारलं, आता फॉर्च्युनरही काळ्या रंगाचीच मागणार
Sandeep Deshpande on Ashish Shelar: 'मोहम्मद पठाण स्पेशली डेडिकेटेड टू आशिष शेलार' संदीप देशपांडेंकडून शेलारांच्या बांद्रा पश्चिम मतदारसंघातील बोगस मतदारांची पोलखोल!
'मोहम्मद पठाण स्पेशली डेडिकेटेड टू आशिष शेलार' संदीप देशपांडेंकडून शेलारांच्या बांद्रा पश्चिम मतदारसंघातील बोगस मतदारांची पोलखोल!
डॉक्टरच्या खोलीत तब्बल 300 किलो RDX सापडलं; AK-56 आणि काडतुसे जप्त, दोन दिवसांपूर्वीच, काश्मीरमध्ये त्याच्याच लॉकरमध्ये एके-47 सापडली
डॉक्टरच्या खोलीत तब्बल 300 किलो RDX सापडलं; AK-56 आणि काडतुसे जप्त, दोन दिवसांपूर्वीच, काश्मीरमध्ये त्याच्याच लॉकरमध्ये एके-47 सापडली
धनंजय देशमुखांना 20 कोटींची ऑफर; दादा गरुडचा कथित व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल, धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडच्या मुलाच्या माध्यमातून ऑफरचा दावा
धनंजय देशमुखांना 20 कोटींची ऑफर; दादा गरुडचा कथित व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल, धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडच्या मुलाच्या माध्यमातून ऑफरचा दावा
कोल्हापूरकरांचा अनोखा निषेध; कचऱ्याचीच निघाली प्रतीकात्मक अंत्ययात्रा
कोल्हापूरकरांचा अनोखा निषेध; कचऱ्याचीच निघाली प्रतीकात्मक अंत्ययात्रा
Gold Silver Prices today: सोन्याची 1.5 टक्क्याने उसळी!  चांदीने दीड लाखांचा टप्पा ओलांडला, सोन्याची तोळ्यामागे किंमत किती?
सोन्याची 1.5 टक्क्याने उसळी!  चांदीने दीड लाखांचा टप्पा ओलांडला, सोन्याची तोळ्यामागे किंमत किती?
Vicky Kaushal Baby Announcement Post: 'ये सब प्राइवेट चीजें...'; विक्की-कतरिनाच्या 'गूड न्यूज'च्या पोस्टवर सलमान खानची कमेंट?
'ये सब प्राइवेट चीजें...'; विक्की-कतरिनाच्या 'गूड न्यूज'च्या पोस्टवर सलमान खानची कमेंट?
Embed widget