(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Target Killing: काश्मिरमध्ये दहशतवाद्यांचं कुकृत्य; कुलगाममधील बँक मॅनेजरची हत्या, गृहमंत्रालय अलर्ट मोडवर
Kulgam Terror Attack: काही दिवसांपूर्वी एका टीव्ही कलाकाराची हत्या केल्यानंतर आता एका बँक मॅनेजरची हत्या दहशतवाद्यांनी केली आहे.
Kulgam Terror Attack: जम्मू-काश्मिरच्या कुलगामध्ये दहशतवाद्यांची कुकृत्य कमी व्हायचं नाव घेत नाहीय. काही दिवसांपूर्वी एका टीव्ही कलाकाराची हत्या केल्यानंतर आता एका बँक मॅनेजरची हत्या दहशतवाद्यांनी केली आहे. घाटीमध्ये सुरक्षा दलाकडून सुरु असलेल्या अभियान सुरु आहे. अशात दहशतवाद्यांनी एका बँक मॅनेजरची गोळ्या झाडून हत्या केली आहे. बँक मॅनेजरचं नाव विजय कुमार असं सांगितलं जात आहे. विजय कुमार हे एका गावातील बॅंकेत मॅनेजर म्हणून काम करायचे. काही दिवसांपूर्वी विजय कुमार यांनी या ठिकाणी नोकरी ज्वाईन करत मॅनेजरचा पदभार स्वीकारला होता.
J&K | Terrorists fired upon a bank manager at Ellaqie Dehati Bank at Areh Mohanpora in Kulgam district. He received grievous gunshot injuries in this terror incident. He is a resident of Hanumangarh, Rajasthan. Area cordoned off: Police
— ANI (@ANI) June 2, 2022
कुलगाम जिल्ह्यातील अरेह मोहनपोरा येथील इलाकी देहाती बँकेतील बँक व्यवस्थापक असलेल्या विजय कुमार दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या दहशतवादी घटनेत त्यांना गोळी लागल्याने गंभीर दुखापत झाली. विजय कुमार हे राजस्थानमधील हनुमानगडचे रहिवासी आहेत. दरम्यान या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या परिसराची नाकेबंदी केली असल्याचं जम्मू काश्मिर पोलिसांनी सांगितलं आहे.
Bank manager from Rajasthan shot dead by terrorists in J-K's Kulgam
— ANI Digital (@ani_digital) June 2, 2022
Read @ANI Story | https://t.co/J3My52lmNI#bankmanager #JammuKashmir #Terrorists pic.twitter.com/0exeqoXIlp
काश्मिरात हत्येच्या घटना वाढल्यानं गृहमंत्रालय अलर्ट मोडवर
दरम्यान, काश्मिरात हत्येच्या घटना वाढल्यानं गृहमंत्रालय अलर्ट मोडवर आलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उद्या जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हांसोबत बैठक घेणार आहे. अमित शाह हे जम्मू-काश्मीरमधील सुरक्षेचा आढावा घेणार असल्याची देखील माहिती आहे.