एक्स्प्लोर

Cyclone Tauktae : काय आहे 'तोक्ते'चा अर्थ? जाणून घ्या या चक्रीवादळासंबंधीची महत्त्वाची माहिती

मे महिन्यात चक्रीवादळ येणं ही काही नवी बाब नाही पण, अरबी समुद्राच्या भागात अशी वादळं येणं ही मात्र लक्ष वेधणारी बाब आहे

Cyclone Tauktae : मे महिन्यात चक्रीवादळ येणं ही काही नवी बाब नाही पण, अरबी समुद्राच्या भागात अशी वादळं येणं ही मात्र लक्ष वेधणारी बाब आहे. सध्या चर्चेत असणाऱ्या किंबहुना किनाऱ्यावर धडकण्यासाठी घोंगावत प्रवास करणाऱ्या चक्रीवादळाला हवामान विभागानं तोक्ते असं नाव दिलं. या शब्दाचा अर्थ होतो पाल, किंवा Gecko हा पालसदृश प्राणी. बर्मिज भाषेतील हे नाव असून, या वादळामुळं जोरदार पर्जन्यवृष्टी आणि सोसाट्याचे वारे पश्चिम भारतातील पट्ट्यात वाहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. सदर चक्रीवादळाचा प्रवास पाहता, 17 मे च्या मध्यरात्री किंवा 18 मे रोजी सकाळच्या सुमारास हे वादळ कधीही गुजरातला धडकणार आहे. 

तोक्तेची तीव्रता किती असणार? 
'द वेदर चॅनल'च्या वृत्तानुसार, अरबी समुद्रातील काही भागांत तोक्ते अधिक तीव्र दिसेल. दक्षिणपूर्व आणि मध्य अरबी समुद्री पट्टा आणि त्याजवळच्या भागात तोक्तेची तीव्रता अधिक दिसणार आहे. पण, थंड पाणी आणि कोरडी हवा पाहता अरबी समुद्रातील उत्तर भागात या वादळाची तीव्रता कमी होऊ शकते. परंतु आंध्र प्रदेश, ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या तुलनेत गुजरात प्रांत चक्रीवादळाशी समरुप नसल्यामुळे येथे त्याचे काही गंभीर परिणाम दिसून येऊ शकतात. याच पार्श्वभूमीवर हवामान खात्याकडून या भागांमध्ये आवश्यकतेनुसार सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

Cyclone Tauktae : महाराष्ट्रासह देशातील 'या' राज्यांतही चक्रीवादळामुळं सतर्कतेचा इशारा

तोक्तेची निर्मिती होण्यास कारणीभूत ठरलेले घटक 
- दक्षिणपूर्व अरबी समुद्रातील समुद्र पृष्ठ तापमान 
- अॅक्टिव्ह मेडन ज्युलियन ऑसीलेशन
- हायपर अॅक्टिव्ह अॅटमोसपेसिक वेव अॅक्शन
-  वाऱ्याचा झोत आणि आर्द्रता 

Cyclone : अरबी समुद्रात चक्रीवादळाचा धोका; जाणून घ्या कशी ठरवली जातात वादळांची नावं

मान्सूनवर या चक्रीवादळाचे काही परिणाम होणार? 
तोक्ते चक्रीवादळामुळं मान्सूनचा वेग काहीसा कमी होऊन त्याच्या आगमनास काहीसा विलंब होऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. डॉ. श्रीधर बालसुब्रमण्यम यांच्या मते, चक्रीवाळसदृश परिस्थितीमुळं निर्माण होणारे जोरदार वारे मान्सून अगदी तोंडावर असतानाच धडकल्यामुळं त्याच्या प्रवासात अडथळा निर्माण करु शकतात. परिणामी मान्सूनच्या आगमनास विलंब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. निसर्ग चक्रीवादळाच्या वेळीही असंच चित्र दिसलं होतं. 

वादळांच्या बाबतीत अरबी समुद्र मागील काही दिवसांत अधिक सक्रिय होताना का दिसत आहे? 
बंगालच्या उपसागराप्रमाणंच मागील काही दिवसांत अरबी समुद्रातही येणाऱ्या चक्रीवादळांची संख्या वाढली आहे. यासाठी समुद्र पृष्ठ तापमान, वाऱ्यांचा वेग-दिशा-पोत आणि आर्द्रतेचं प्रमाण कारणीभूत ठरत आहे. ओखी, क्याप, महा, निसर्ग आणि आता तोक्ते हे त्याचेच परिणाम अरबी समुद्राच्या काही भागातील तापमान हे गंभीररित्या अधिक उष्ण होत आहे, याचेही परिणाम या चक्रीवादळांच्या निर्मितीच्या रुपात दिसून येत आहेत. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सत्ता स्थापनेपूर्वी मोठ्या घडामोडी, तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीला, वर्षा निवासस्थानी खलबतं
सत्ता स्थापनेपूर्वी मोठ्या घडामोडी, तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीला, वर्षा निवासस्थानी खलबतं
Raj Thackeray: क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर अनेक निकाल बदलले असते; राज ठाकरे यांचा मिश्किल टोला 
क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर..., निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच व्यक्त केली खदखद
Sachin Tendulkar Meet Vinod Kambli :विनोद कांबळी मंचावर आला, राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवत सचिन भेटीसाठी धावला
विनोद कांबळी मंचावर आल्याच पाहताच सचिन तेंडुलकरनं चर्चा राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवली, स्वत: भेट घेत विचारपूस
Balasaheb Thorat : विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nagpur Winter Session : मंत्र्यांना मिळणार 5 स्टार बंगले; हिवाळी अधिवेशनाची जोरदार तयारीTop 25 Superfast News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : ABP Majha : 03 Dec 2024 : 6 PMTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 6 PM : 3 डिसेंबर 2024 : ABP MajhaAjit Pawar : राज्यात 11 मंत्रिपदं, केंद्रात कॅबिनेट आणि राज्यपालपद; अजित पवारांच्या भाजपकडे मागण्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सत्ता स्थापनेपूर्वी मोठ्या घडामोडी, तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीला, वर्षा निवासस्थानी खलबतं
सत्ता स्थापनेपूर्वी मोठ्या घडामोडी, तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीला, वर्षा निवासस्थानी खलबतं
Raj Thackeray: क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर अनेक निकाल बदलले असते; राज ठाकरे यांचा मिश्किल टोला 
क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर..., निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच व्यक्त केली खदखद
Sachin Tendulkar Meet Vinod Kambli :विनोद कांबळी मंचावर आला, राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवत सचिन भेटीसाठी धावला
विनोद कांबळी मंचावर आल्याच पाहताच सचिन तेंडुलकरनं चर्चा राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवली, स्वत: भेट घेत विचारपूस
Balasaheb Thorat : विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
ATM Centers : एटीएम सेंटर्सची संख्या प्रथमच घटली, 5 वर्षातील पहिली घटना, नेमकी कारणं काय?
पाच वर्षात प्रथमच एटीएम सेंटर्सची संख्या घटली? देशात किती ATM केंद्राची संख्या किती?
Maratha Light Infantry : बेळगाव लाईट इन्फ्रंट्रीमध्ये 651 अग्नीविरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात
बेळगाव लाईट इन्फ्रंट्रीमध्ये 651 अग्नीविरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारत पाकिस्तान पोहोचल्यास मॅच लाहोर की अन्य मैदानावर?
चॅम्पियन्स ट्रॉफीत हायब्रीड मॉडेलचा स्वीकार, भारत पाक अंतिम फेरीत आमने सामने आल्यास मॅच कुठं होणार?
अजित दादांचा फॉर्म्युला, स्ट्राइक रेटनुसार कॅबिनेटसह जादा मंत्रीपदांची मागणी; भाजप नेतृत्वानेही पुढे केल्या अटी शर्ती
अजित दादांचा फॉर्म्युला, स्ट्राइक रेटनुसार कॅबिनेटसह मंत्रीपदांची मागणी; भाजप नेतृत्वानेही पुढे केल्या अटी शर्ती
Embed widget