एक्स्प्लोर
लष्कराच्या कारवाईत ठार झालेला सबजार अहमद कोण?
जम्मू-काश्मीर: सबजार अहमद भट्ट... बुरहान वानीचा उत्तराधिकारी, हिज्बुल मुजाहिदीनचा टॉपचा कमांडर पुलवामातल्या त्रालमध्ये एका इमारतीत सबजार लपल्याची माहिती राष्ट्रीय रायफल्सच्या जवानांना मिळाली आणि सबजारच्या घटका भरल्या.
कालपासून दबा धरुन बसलेला सबजार शस्त्रं टाकायला तयार नव्हता. आपल्या दोन साथीदारांसह त्यानं भारतीय जवानांवर अंदाधुंद गोळीबार केला. पण आज सकाळी राष्ट्रीय रायफल्सच्या जवानांनी त्याचा खात्मा केला.
एका दिवसात भारतीय जवानांनी 10 अतिरेक्यांचा खात्मा केला. पण सबजारचा खात्मा हे मोठं यश मानलं जातं आहे. पण सबजारच्या अतिरेकी होण्याची कहाणीही तितकीच थरारक आहे.
प्रेयसीनं लग्नासाठी नकार दिल्यानंतर सबजार अतिरेकी बनला. एका जवानाकडून रायफल हिसकावल्यामुळे त्याला तातडीने हिज्बुलमध्ये सामील करुन घेण्यात आले. गेल्या दोन वर्षांपासून त्याने हिज्बुल मुजाहिदीनशी संधान बांधले होते
सबजार हा बुरहान वानीचा उजवा हात होता. त्याच्यासोबत फोटो काढणे, व्हिडिओ शूट करणे आणि त्याद्वारे सहानुभूती मिळवणे, अशी त्याची मोडस ओपरेंडी होती.
बुरहान वानीच्या खात्म्यानंतर त्याची जागा सबजारने घेतली:
अतिरेकी कारवायांमागचा मेंदू अशी सबजारची ओळख आहे. मार्च महिन्यातच त्रालमध्ये सबजार जाळ्यात अडकला होता, पण दगडफेक करणाऱ्या नागरिकांची ढाल करुन निसटला होता. भारतीय लष्कराला माहिती पुरवणाऱ्या नागरिकांची तो हत्या करायचा. साब डॉन या नावानं तो हिज्बुलमध्ये ओळखला जायचा. सबजारच्या डोक्यावर 10 लाखांचं बक्षीस ठेवण्यात आलं होतं...
बुरहान वानीच्या खात्म्यानंतर त्याला हिरो करण्याचा प्रयत्न कट्टरवाद्यांनी केला. त्यासाठी सोशल मीडियाचं प्रभावी अस्त्र वापरलं. त्यामुळे उसळलेल्या दंगलीत 100 जणांचा मृत्यू झाला. आणि 12 हजार लोक जखमी झाले. पण त्यानंतर काश्मीर खोऱ्यात सोशल मीडियावर बंदी घालण्यात आली. पण तीच बंदी आज योगायोगाने उठवण्यात आली आहे. पण प्रश्न असा आहे, बुरहान वानीप्रमाणेच सबराजलाही हिरो करण्याचा प्रयत्न तर होणार नाही ना?
संबंधित बातम्या:
लष्कराच्या कारवाईत बुरहान वानीचा उत्तराधिकारी सबजार अहमदचा खात्मा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement