एक्स्प्लोर

Mysuru Dasara 2022 : नृत्य, संगीत, हत्ती, घोडे, उंटांची मिरवणूक; 'मैसूर संस्थान' असे करते दसऱ्याचे 'रॉयल' सेलिब्रेशन

Mysuru Dasara : चामुंदेश्वरी देवीची मूर्ती सुशोभित हत्तीवर ठेवून काढली जाणारी मिरवणूक हे मैसूरच्या संस्थानी दसऱ्याचे विशेष आकर्षण आहे.

Mysuru Dasara 2022 : विजयादशमी म्हणजेच दसऱ्याचा सण आज देशभरात जल्लोषात साजरा केला जात आहे. साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त मानल्या गेलेल्या दसऱ्याचा सण भारतातील विविध प्रांतात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. पण मैसूरचा दसरा (Mysuru Dasara) जगभरात लोकप्रिय आहे. 

चामुंदेश्वरी देवीची मूर्ती सुशोभित हत्तीवर ठेवून काढली जाणारी मिरवणूक हे मैसूरच्या संस्थानी दसऱ्याचे विशेष आकर्षण आहे. 
देश-विदेशातील पर्यटक हा उत्सव पाहण्यासाठी भारतात येतात. संगीत, नृत्य, वाद्यवादन, हत्ती, घोडे, उंट यांची मिरवणूक हे या भव्य-दिव्य उत्सवाचं विशेष आकर्षण आहे. 

मैसूरच्या दसऱ्याला कर्नाटकात 'नदहब्बा' असे म्हणतात. एका आख्यायिकेनुसार, दसऱ्या दिवशी चामुंडेश्‍वरी देवीने महिषासुराचा वध केला. त्यामुळेच या दिवसाला 'विजयादशमी' म्हणतात. महिषासुराच्या नावावरूनच या प्रदेशाला मैसूर असं नाव मिळालं आहे. 

दहा दिवस चालणारा मैसूरचा शाही दसरा

'मैसूरचा दसरा' हा दहा दिवस चालतो. या उत्सवाच्या पहिल्या दिवशी वडियार राजघराण्यातील दांपत्य म्हैसूरमधील चामुंडी पर्वतावरील चामुंडी मंदिरात श्री चामुंडेश्‍वरी देवीची यथासांग पूजा करीत. आजही वडियार घराण्याचे वारस श्रीकांतदत्त नृसिंहराज वडियार दसऱ्याच्या दिवशी खाजगी दरबार भरवून ही प्रथा पाळतात. नवरात्रीच्या नवव्या दिवशी म्हणजे महानवमीच्या दिवशी राजघराण्यातील तलवारींची पूजा करून हत्ती, घोडे व उंटाची मोठी मिरवणूक काढली जाते.

'म्हैसूरचा दसऱ्या'चे आणखी एक आकर्षण म्हणजे मैसूर राजवाड्याच्या विरूद्ध दिशेला असलेल्या मैदानावर भरणारी यात्रा. दसरा सुरू झाल्यापासून सुरू झाल्यापासून ही यात्रा सुरू होते. ती डिसेंबरपर्यंत चालते. या यात्रेत विविध स्टॉल असतात. त्यात कपडे, प्लॅस्टिक वस्तू, किचनमधील वस्तू, कॉस्मेटिक्स, खाण्यापिण्याचे पदार्थ यांचा समावेश असतो. त्यामुळे लोकांची प्रचंड गर्दी होते.

नवरात्राच्या दहा दिवसांत मैसूरमध्ये संगीत व नृत्याचे कार्यक्रम होतात. जगभरातील अनेक सेलिब्रिटी या यात्रेला हजेरी लावतात. तसेच या यात्रेत होणाऱ्या कुस्त्यादेखील आकर्षणाचा बिंदू आहे. जगभरातील प्रसिद्ध कुस्तीगीर येथे येत असतात.

संंबंधित बातम्या

Dasara 2022 : दसऱ्याच्या दिवशी आपट्याच्या पानांचा मोठा मान! आरोग्यासाठी असा आहे फायदा

Dasara 2022: दसरा का साजरा केला जातो? सीमोल्लंघन म्हणजे नेमकं काय? जाणून घ्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 08 November 2024Maharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 08 November 2024Vidhan Sabha SuperFast | विधानसभा निवडणुकीचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
Washim Assembly Election : भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
CJI DY Chandrachud : तारीख पे तारीख झाली, थेट टीका सुद्धा झाली, पण खरी शिवसेना, सत्तासंघर्षावर निकाल नाहीच! सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचुड यांना सुप्रीम कोर्टातून निरोप
तारीख पे तारीख झाली, थेट टीका सुद्धा झाली, पण खरी शिवसेना, सत्तासंघर्षावर निकाल नाहीच! सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचुड यांना सुप्रीम कोर्टातून निरोप
Pune Assembly Election : पुणे जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण आपापसात भिडणार? 21 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट! जाणून घ्या उमेदवारांची नावं
पुणे जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण आपापसात भिडणार? 21 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट! जाणून घ्या उमेदवारांची नावं
Sambhajiraje Chhatrapati : शिवाजी महाराजांचे एकच आदर्श आणि एकच गुरु जिजाऊ माँसाहेब; संभाजीराजेंनी अमित शाहांचा शिराळ्यातील दावा खोडून काढला
शिवाजी महाराजांचे एकच आदर्श आणि एकच गुरु जिजाऊ माँसाहेब; संभाजीराजेंनी अमित शाहांचा शिराळ्यातील दावा खोडून काढला
Embed widget