एक्स्प्लोर

Dasara 2022 : दसऱ्याच्या दिवशी आपट्याच्या पानांचा मोठा मान! आरोग्यासाठी असा आहे फायदा

Dasara 2022 : दसऱ्याला धन, ज्ञान आणि भक्तीची पूजा याचे प्रतीक म्हणून सोने म्हणजेच आपट्याची पाने, पाटी-पुस्तके अर्थात सरस्वती देवीची आणि शस्त्रास्त्रांचे पूजन करण्यात येते.

Dasara 2022 : दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पाने सोने म्हणून दिली जातात. आजच्या दिवशी आपट्याच्या पानांचा मान मोठा असल्याने ती घरी ठेवली जातात. दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पाने सोने म्हणून दिली जातात. दसऱ्याला धन, ज्ञान आणि भक्तीची पूजा याचे प्रतीक म्हणून सोने म्हणजेच आपट्याची पाने, पाटी-पुस्तके अर्थात सरस्वती देवीची आणि शस्त्रास्त्रांचे पूजन करण्यात येते. जाणून घ्या याचे महत्व

आपट्याच्या पानाचे महत्व
दसऱ्याला सोन्याचे प्रतीक म्हणून आपट्याच्या झाडाची पाने लुटण्याची प्रथा आजही टिकून असल्याचे दिसून येते. पण दसऱ्याला आपट्याचीच पाने सोने म्हणून का वाटली जातात? विजयादशमी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी श्रीरामांनी रावणावर विजय मिळवून त्याचा वध केला.  दसर्‍याच्या आधीच्या नऊ दिवसांत म्हणजेच नवरात्रात देवीच्या शक्ती रुपांनी दाही दिशांवर विजय मिळवला, असे सांगितले जाते. पांडवांनी अज्ञातवास संपताच शक्तीपूजन करून शमीच्या वृक्षावरची आपली शस्त्रे परत घेतली आणि विराटाच्या गायी पळवणार्‍या कौरव सैन्यावर स्वारी करून विजय मिळवला म्हणून या दिवशी आपट्याची पाने वाटली जातात. या दिवशी सीमोल्लंघन, शमीपूजन, अपराजितापूजन आणि शस्त्रपूजा या चार कृत्यांना अधिक महत्व आहे.विजयाच्या संदर्भात या दिवसाला दशहरा, दसरा आणि विजयादशमी अशी नावे आहेत.

आपट्याच्या पाने आरोग्यासाठी गुणकारी
आपट्याची पाने आरोग्याच्या दृष्टीने अतिशय फायद्याची आहेत. आपट्याची पाने खाऊन तुम्ही विविध आजारांपासून दूर राहू शकता.आपटा ही बहुगुणी वनस्पती आहे. या झाडाची पाने फुले, बिया, सालं औषध म्हणून वापरली जाते. आपट्याला 'अश्मंतक' म्हणूनही ओळखले जाते. अश्मंतक' याचा एक अर्थ मुतखडा होऊ न देणारा किंवा तो जिरवणारा असा आहे. आपट्याच्या सालीपासून दोरखंड बनवला जातो. तर त्याच्या सालापासून डिंक मिळतो. पण त्याव्यतिरिक्तही आपट्याचे बरेच फायदे आहेत.

महाराष्ट्रात आपट्याची पाने ‘सोने’ म्हणून वाटण्याची प्रथा

मान्यतेनुसार, छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे मोहिमेवर गेल्यानंतर शत्रूचा प्रदेश लुटून सोन्या-नाण्यांच्या रूपाने संपत्ती घरी आणत असे. विजयी शिलेदार मोहिमेवरून परत आले की, दारात त्यांची पत्नी किंवा बहीण त्यांना ओवाळीत असे. घरात गेल्यावर आणलेली लूट देवापुढे ठेवीत. नंतर देवाला आणि मोठ्यांना व्यक्तींना करून आशीर्वाद घेत असत. या घटनेची स्मृती सध्याच्या काळात आपट्याची पाने सोने म्हणून वाटली जातात. त्यामुळे दसर्‍याच्या दिवशी इष्टमित्रांना, आप्तेष्टांना, नातेवाईकांना आपट्याची पाने सोने म्हणून वाटण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे. या प्रथेलाही ऐतिहासिक महत्त्व आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

संबंधित बातम्या

Dasara 2022: दसरा का साजरा केला जातो? सीमोल्लंघन म्हणजे नेमकं काय? जाणून घ्या

Durga Visarjan 2022: आज दुर्गा देवीचे विसर्जन, फक्त 2 तासांचा मुहूर्त

महत्त्वाच्या बातम्या

Dengue vs Typhoid: तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
Health: पावसाळ्यात किडनीच्या रुग्णांना अधिक धोका? 'अशी' घ्या काळजी, तज्ज्ञांची महत्त्वाची माहिती...
पावसाळ्यात किडनीच्या रुग्णांना अधिक धोका? 'अशी' घ्या काळजी, तज्ज्ञांची महत्त्वाची माहिती...
Independence Day Fashion Tips : 15 ऑगस्टला 'तिरंगा लूक' करताना 'या' 10 चुका टाळा; असा करा परफेक्ट अन् क्लासिक डिझाईन!
15 ऑगस्टला 'तिरंगा लूक' करताना 'या' 10 चुका टाळा; असा करा परफेक्ट अन् क्लासिक डिझाईन!
National Organ Donation Day: एका 'हो' मुळे अनेकांना मिळालं नवजीवन! अवयवदानाबाबत जनजागृतीची गरज, राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त तज्ज्ञ सांगतात...
एका 'हो' मुळे अनेकांना मिळालं नवजीवन! अवयवदानाबाबत जनजागृतीची गरज, राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त तज्ज्ञ सांगतात...

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
Pune Chakan MIDC : चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
Rahul Gandhi: लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
Abhijit Dipke and Gulabrao Patil: अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
Embed widget