Khan Sir Wife : खान सरांनीही मुहूर्त साधला, ऑपरेशन सिंदूर दिवशीच गुपचूप लग्न उरकलं, कोण आहेत खान मॅडम?
Khan Sir Marriage : बिहारच्या प्रसिद्ध खान सरांनी गुपचूप विवाह उरकला असून त्यांनी 6 जून रोजी त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांना जेवणासाठी निमंत्रण दिलं.

Khan Sir News : आपल्या व्हिडीओंमुळे सतत प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या बिहारच्या खान सरांनी गुपचूप लग्न उरकल्याची माहिती समोर आली आहे. ज्यावेळी भारत-पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण होऊन युद्धाची परिस्थिती निर्माण झाली होती, त्यादरम्यान म्हणजे 7 मे रोजी खान सरांनी हा विवाह केला. खान सरांनी त्यांच्या क्लासमध्ये ही माहिती दिली आणि 6 जून रोजी सर्व विद्यार्थांना जेवणाचे आमंत्रण दिले.
Who is the wife of Khan Sir : खान सरांच्या वधूचे नाव काय आहे?
खान सरांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यामधून त्यांच्या लग्नाची बातमी समोर आली. या व्हिडीओमध्ये एक लग्नपत्रिकाही दिसत असून त्यामध्ये खान सरांच्या वधूचे नाव हे एएस खान असे लिहिल्याचे दिसते. 7 मे रोजी त्यांनी विवाह केला. त्यामध्ये अगदीच मोजके लोक उपस्थित होते. या लग्नासाठी 2 जून रोजी रिसेप्शन ठेवण्यात आले आहेत. त्यामध्येही घरचे आणि निकटवर्तीय असे मोजके लोक उपस्थित असणार आहेत अशी माहिती आहे. तर 6 जून रोजी खान सरांनी त्यांच्या सर्व विद्यार्थांना जेवणासाठी आमंत्रण दिले आहे.
Khan Sir Marriage : साधेपणाचे कौतुक
खान सरांनी त्यांचा विवाह अत्यंत साधेपणाने केल्याची माहिती आहे. भारत-पाकिस्तान युद्धाची स्थिती असताना त्यांनी अगदीच मोजक्या लोकांमध्ये विवाह उरकला. आता परिस्थिती निवळल्याने खान सरांनी त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांना जेवणाचे निमंत्रण दिलं आहे.
खान सरांचे खरे नाव नेहमीच लोकांसाठी एक गूढ राहिले आहे. काही लोक त्यांचे नाव फैजल खान असल्याचे सांगतात. आता त्याचे लग्नही गुपचूप झाले आहे आणि त्याने एक नवीन इनिंग सुरू केली आहे. परंतु खान सरांनी त्यांचे वैयक्तिक आयुष्य अद्याप लोकांसमोर उघड केलं नाही. लग्न झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या वधूचा फोटो अथवा नावही समोर येऊ दिलं नाही.
Who Is Khan Sir : कोण आहेत खान सर?
खान सर हे एक शिक्षक आणि YouTube कंटेंट क्रिएटर आहेत. ते स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांसाठी परवडणाऱ्या दरात क्लास घेतात. अगदी कमी वेळात ते देशभर नावारुपास आले आहेत. त्यांच्या यूट्यूबवरील 'खान जीएस रिसर्च सेंटर' या शैक्षणिक चॅनेलचे सुमारे 2.4 कोटी सबस्क्राइबर आहेत.
खान सरांच्या या चॅनेलवर शेकडो व्हिडीओ आहेत. त्यामध्ये चालू घडामोडी आणि राजकारणापासून ते गणितापर्यंत विविध विषयांचा समावेश आहे. अलिकडेच बिहारचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी पाटणा येथे 'चॅम्पियन्स ऑफ चेंज बिहार पुरस्कार सोहळ्यात' खान सरांना सन्मानित केले.























