Khan Sir on Operation Sindoor : जिथे 24 कोटी दहशतवादी राहतात, तिथे 500-1000 दहशतवाद्यांना मारून काहीही साध्य होणार नाही; ऑपरेशन सिंदूरबाबत खान सरांचं मोठं वक्तव्य
Khan Sir on Operation Sindoor : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत खान सर यांनी मोठं विधान केलं आहे.

Khan Sir on Operation Sindoor: पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भारतीय लष्कराने (Indian Army) सुरू केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत (Operation Sindoor) खान सर (Khan Sir) यांनी मोठं विधान केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, आपण पाकिस्तानबाबत सुधारणा होण्याची अपेक्षा ठेवतोय, पण ते शक्य नाही. 500 ते 1000 दहशतवाद्यांना मारून काही साध्य होणार नाही, असं खान सरांनी म्हटलं आहे. इतकंच नाही तर पाकिस्तानमध्ये तब्बल 24 कोटी दहशतवादी राहतात, असं देखील त्यांनी म्हटलंय.
एक जरी पाकिस्तानी जिवंत असेल, तर तो दहशतवादीच
खान सर म्हणाले, आपला हा गैरसमज आहे की, आपण पाकिस्तानमधून दहशतवाद संपवू शकतो. एक जरी पाकिस्तानी जिवंत असेल, तर तो दहशतवादीच आहे. पाकिस्तानमध्ये एखादा चांगला माणूसही राहतो ही कल्पना मनातून काढून टाका, असे त्यांनी म्हटले. पाकिस्तानवर करण्यात आलेल्या प्रत्युत्तरात्मक कारवाईवर खान सर समाधानी नाहीत. त्यांनी म्हटलंय की, "पाकिस्तानचं अजून मोठं नुकसान व्हायला हवं होतं. त्यांचं एकही विमानतळ व्यवस्थित राहू द्यायला नको होता, असं केलं असतं तर पाकिस्तानच्या जनतेला समजलं असतं की त्यांच्या देशाने किती मोठी चूक केली आहे, असे खान सर यांनी म्हटले आहे.
ये रहा खान सर का पूरा वीडियो,
— Vinod Kumar (@we_knowd) May 18, 2025
देखिए कैसे एक 2 बात समझाई इन्होंने, pic.twitter.com/KIePozoKVq
पाकिस्तानचा पूर्णपणे खात्मा व्हायला हवा होता
खान सर पुढे म्हणाले की, "जिथे 24 कोटी दहशतवादी राहतात, तिथे 500-1000 दहशतवाद्यांना मारून काहीही साध्य होणार नाही. पाकिस्तानला इतकं आर्थिकदृष्ट्या कमकुवत करावं की तिथल्या प्रत्येक मुलालाही वाटलं पाहिजे की पाकिस्तानने चूक केली आहे. जेव्हा पाकिस्तानचा नागरिकच स्वतः पाकिस्तान सरकारला म्हणेल की भारताशी संघर्ष करू नका, तेव्हाच त्यांना खरी जाणीव होईल. आपण जितकी अपेक्षा केली होती, तितकं नुकसान पाकिस्तानचं झालेलं नाही. जोपर्यंत तिथं नवीन स्मशानभूमी तयार केली जात नाही आणि एकावर एक मृतदेह साचत नाहीत, तोपर्यंत पहलगाम हल्ल्याचं पूर्ण उत्तर दिलं गेलं असं म्हणता येणार नाही. यावेळी पाकिस्तानचा पूर्णपणे खात्मा व्हायला हवा होता. मला याचंच दुःख वाटतं, " असेही त्यांनी म्हटले आहे.
भारताचं पाकला चोख प्रत्युत्तर
दरम्यान, पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर भारताने 6 आणि 7 मेच्या रात्री ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवलं. या मोहिमेअंतर्गत पाकव्याप्त काश्मीरमधील (पीओके) 9 दहशतवादी ठिकाणांवर निशाणा साधण्यात आला. या कारवाईत 100 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती समोर येत आहे. यानंतर पाकिस्तानकडून सलग तीन दिवस ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या साहाय्याने हल्ले करण्यात आले, मात्र भारतीय लष्कराने त्याला चोख प्रत्युत्तर दिलं. या प्रत्युत्तरात भारतीय लष्कराने पाकिस्तानचे 11 एअरबेस उद्ध्वस्त केले आहेत.
आणखी वाचा























