एक्स्प्लोर

केरळच्या मदतीला इतर राज्य धावले, मोदीही केरळात पोहोचले

या महापुरात आतापर्यंत 324 नागरिकांचा मृत्यू झाला असून जवळपास सव्वा दोन लाख नागरिक विस्थापित झाले आहेत. याआधी 1924 साली केरळमध्ये पावसामुळे अशी भीषण आपत्ती आली होती.

तिरुवअनंतपुरम : सतत कोसळणारा पाऊस आणि महापुरामुळे केरळमध्ये गेल्या शंभर वर्षातील सर्वात मोठी जीवितहानी झाली आहे. या महापुरात आतापर्यंत 324 नागरिकांचा मृत्यू झाला असून जवळपास सव्वा दोन लाख नागरिक विस्थापित झाले आहेत. याआधी 1924 साली केरळमध्ये पावसामुळे अशी भीषण आपत्ती आली होती. केरळला आतापर्यंत साडे आठ हजार कोटींचं नुकसान झालं आहे. वीज, रस्ते आणि सर्व जनजीवन विस्कळीत झालं असून पदार्थांचीही सध्या उणीव आहे. केरळच्या मदतीसाठी देशातली सर्व राज्य एकवटली आहेत. दिल्ली, पंजाब, तेलंगणा या राज्यांनी आर्थिक मदत दिली आहे. तर भारतीय रेल्वेकडून आवश्यक वस्तूंचा पुरवठा केला जात आहे. दिल्ली सरकारने 10 कोटी, तेलंगणा, 25 कोटी, आंध्र प्रदेश 10 कोटी आणि पंजाब सरकारने केरळला 10 कोटींचं अर्थसहाय्य जाहीर केलं असून तातडीने ही रक्कम देण्यात येणार आहे. शिवाय केंद्र सरकारने याआधीच शंभर कोटी दिले असून लागेल तेवढी मदत देण्याचं आश्वासन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिलं आहे. केरळच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी केरळमध्ये दाखल झाले आहेत. केरळचे मुख्यमंत्री, राज्यपाल आणि केंद्रीय मंत्र्यांनी विमानतळावर त्यांचं स्वागत केलं. मोदींकडून पूरस्थितीचा आढावा घेण्यात येणार असून लवकरच मोठी मदतही जाहीर होऊ शकते. केरळमध्ये आतापर्यंत 324 जणांनी आपले प्राण गमावले आहेत, तर 80 धरणांचे दरवाजे उघडले असून 22 लाख 31 हजार 139 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवलं आहे. 1500 कॅम्पमध्ये या नागरिकांना ठेवण्यात आलं आहे. केरळ सरकारला मदत करण्याचं आवाहन करण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

मोर्चात सहभागी न होता बर्गर खायला गेले, कॉकरोच जनता पार्टीकडून विजेता दहियांवर कारवाई, प्रवक्तेपदावरुन हकालपट्टी 
मोर्चात सहभागी न होता बर्गर खायला गेले, कॉकरोच जनता पार्टीकडून विजेता दहियांवर कारवाई, प्रवक्तेपदावरुन हकालपट्टी 
Rahul Gandhi : राहुल गांधींची नीट पेपरफुटीवरील संसदेतील चर्चेची मागणी मान्य, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर जितेंद्र सिंह नेमकं काय म्हणाले? 
राहुल गांधींची नीट पेपरफुटीवरील संसदेतील चर्चेची मागणी मान्य, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर जितेंद्र सिंह नेमकं काय म्हणाले? 
Delhi Protest : पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरून राहुल गांधींना उचललं, प्रियंका गांधींचा जोरदार प्रतिक्रार; काँग्रेसचे अनेक खासदार पोलिसांच्या ताब्यात
पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरून राहुल गांधींना उचललं, प्रियंका गांधींचा जोरदार प्रतिक्रार; काँग्रेसचे अनेक खासदार पोलिसांच्या ताब्यात
E20 : इथेनॉल खरेदी करण्यासाठी सरकारचा नेमका किती पैसा खर्च होतो? सरकारकडून आकडेवारी जाहीर
E20 : इथेनॉल खरेदी करण्यासाठी सरकारचा नेमका किती पैसा खर्च होतो? सरकारकडून आकडेवारी जाहीर

व्हिडीओ

Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं
Sandeep Deshpande:मोदींपेक्षा जास्त अहंकार अश्विनी भिडेंना; चेंबूर दुर्घटनेवरून संदीप देशपांडे भडकले
Sanjay Raut PC : 20 जुलै हा लोकशाहीतील 'डरपोक दिवस' म्हणून साजरा करा; संजय राऊत आक्रमक
Delhi CJP Protest | जंतर-मंतर ते सफदरजंग, वांगचुक-दिपके आंदोलनाचा निर्णायक दिवस | Special Report
J P Nadda Meeting With CJP : सरकार-आंदोलक पहिली बैठक, नड्डांकडे मागण्यांचं निवेदन | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : राहुल गांधींची नीट पेपरफुटीवरील संसदेतील चर्चेची मागणी मान्य, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर जितेंद्र सिंह नेमकं काय म्हणाले? 
राहुल गांधींची नीट पेपरफुटीवरील संसदेतील चर्चेची मागणी मान्य, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर जितेंद्र सिंह नेमकं काय म्हणाले? 
अमरावतीतून वारी, काठी टेकत आली 80 वर्षांची आजी; कलेक्टरांनी दिलं विठ्ठलाचं VIP दर्शन, पुंडलिकाची आठवण
अमरावतीतून वारी, काठी टेकत आली 80 वर्षांची आजी; कलेक्टरांनी दिलं विठ्ठलाचं VIP दर्शन, पुंडलिकाची आठवण
दिल्लीत नरेंद्र मोदींच्या घरासमोर राडा, पोलिसांनी राहुल गांधींना उचललं; प्रियंका गांधींसह माजी मुख्यमंत्रीही ताब्यात
दिल्लीत नरेंद्र मोदींच्या घरासमोर राडा, पोलिसांनी राहुल गांधींना उचललं; प्रियंका गांधींसह माजी मुख्यमंत्रीही ताब्यात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जुलै 2026 | मंगळवार
पुणेकरांसाठी गुडन्यूज ! म्हाडाकडून 634 सदनिकांच्या विक्रीसाठी दुसरी जाहिरात प्रसिद्ध; MIG गटासाठी उत्पन्नाची अट शिथिल
पुणेकरांसाठी गुडन्यूज ! म्हाडाकडून 634 सदनिकांच्या विक्रीसाठी दुसरी जाहिरात प्रसिद्ध; MIG गटासाठी उत्पन्नाची अट शिथिल
Rahul Gandhi : राहुल गांधींचा पोलिसांना चकवा, खासदारांसह थेट मोदींच्या घराला घेरावा, मोदींनी चर्चेसाठी विश्वासू मंत्री धाडला; नेमकं काय घडलं? 
राहुल गांधींचा पोलिसांना चकवा, खासदारांसह थेट मोदींच्या घराला घेरावा, मोदींनी चर्चेसाठी विश्वासू मंत्री धाडला; नेमकं काय घडलं? 
Rain Update: पुढील 4 ते 5 दिवस महत्त्वाचे; 'या' जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट, तर कोकण, विदर्भाला ऑरेंज अलर्ट, मराठवाड्यात 'पाणीबाणी', पुणे वेधशाळेचा अंदाज
पुढील 4 ते 5 दिवस महत्त्वाचे; 'या' जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट, तर कोकण, विदर्भाला ऑरेंज अलर्ट, मराठवाड्यात 'पाणीबाणी', पुणे वेधशाळेचा अंदाज
ओटीटीवर क्राइम सिरीज पाहून काटा काढला, पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला संपवलं; पोलिसांनी गुढ उलगडलं
ओटीटीवर क्राइम सिरीज पाहून काटा काढला, पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला संपवलं; पोलिसांनी गुढ उलगडलं
Embed widget