एक्स्प्लोर

संपत्तीसाठी वयाने दुप्पट महिलेशी लग्न केल्याचा दावा, नववधूच्या शरीरयष्टीची खिल्ली, वायरल मेसेजमधील तथ्य

'फोटोत दिसणारी महिला (ज्यूबी) 48 वर्षांची, तर तरुण (अनूप) आहे 25 वर्षांचा. महिलेची संपत्ती 25 कोटींची आहे. 101 भेटवस्तूंसह 50 लाखांचा हुंडा देण्यात आला. हे लग्न आपल्या (केरळातील) चेरुपुझामध्ये पार पडलं' असा तथ्यहीन आणि खोटा मेसेज अनूप-ज्यूबीच्या फोटोसह वायरल करण्यात आला होता.

तिरुअनंतपुरम : सोशल मीडियावर केरळी दाम्पत्याविषयी खोटी माहिती वायरल करणाऱ्या आणि नववधूच्या शरीरयष्टीची खिल्ली उडवणाऱ्या ट्रोलर्सविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पाच जणांना बेड्या ठोकल्या आहेत. 29 वर्षीय अनूप पी सबॅस्टियन आणि 27 वर्षांची ज्यूबी जोसेफ चार फेब्रुवारीला विवाहबंधनात अडकले होते. केरळातील कुन्नूरमध्ये जवळचे नातेवाईक आणि मित्र मंडळींच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडला. नवदाम्पत्याचा फोटो स्थानिक वृत्तपत्रातील विवाहसंबंधी विभागात छापण्यात आला होता. त्यानंतर सुरुवात झाली या दाम्पत्याच्या मानसिक छळवादाला. काही टवाळखोरांनी अनूप-ज्यूबी यांचा फोटो खोट्या माहितीसह सोशल मीडियावर वायरल केला. अचानक एके दिवशी अनूप-ज्यूबी आणि त्यांच्या कुटुंबीयांना शिवराळ भाषेतील मेसेज आणि फोन यायला लागले. इतकंच काय, तर ज्यूबीच्या शरीरयष्टीची खिल्ली (बॉडी शेमिंग) उडवणारे मेसेजही लिहिले जात होते. सुरुवातीला दोघांनाही हा प्रकार काय आहे, याचा थांगपत्ता लागत नव्हता. मात्र वस्तुस्थिती उघड झाली आणि दोघांचीही झोप उडाली. वस्तूस्थिती पडताळून न पाहता अनोळखी लोकांकडून होणारी शिवीगाळ इतकी भयंकर होती, की अनूप-ज्यूबीला पोलिसात तक्रार दाखल करण्यावाचून गत्यंतर नव्हतं. काय होता मेसेज? 'फोटोत दिसणारी महिला (ज्यूबी) 48 वर्षांची, तर तरुण (अनूप) आहे 25 वर्षांचा. महिलेची संपत्ती 25 कोटींची आहे. 101 भेटवस्तूंसह 50 लाखांचा हुंडा देण्यात आला. हे लग्न आपल्या (केरळातील) चेरुपुझामध्ये पार पडलं' असा तथ्यहीन आणि खोटा मेसेज अनूप-ज्यूबीच्या फोटोसह वायरल करण्यात आला होता. मेसेज वायरल करणाऱ्या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या पाच जणांपैकी एकही व्यक्ती अनूप-ज्यूबीच्या परिचयातील नाही. त्यामुळे 'उचलली जीभ'च्या धर्तीवर 'उचलला फोटो आणि काहीपण लिहून पोस्ट केला सोशल मीडियावर' या प्रवृत्तीला आळा घालण्याची गरज व्यक्त होत आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

सोने खरेदी करण्याची स्पर्धा! जगभरातील मध्यवर्ती बँकांनी सोन्याचा साठा वाढवला, कोणता देश पहिल्या क्रमांकावर?
सोने खरेदी करण्याची स्पर्धा! जगभरातील मध्यवर्ती बँकांनी सोन्याचा साठा वाढवला, कोणता देश पहिल्या क्रमांकावर?
RBI च्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल! जागतिक स्तरावर भारताची पेमेंट प्रणाली होणार मजबूत, जाणून घ्या सविस्तर माहिती
RBI च्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल! जागतिक स्तरावर भारताची पेमेंट प्रणाली होणार मजबूत, जाणून घ्या सविस्तर माहिती
LPG PNG टेन्शन संपलं? इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा खुलासा, गॅस पुरवठा सुरळीत
LPG PNG टेन्शन संपलं? इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा खुलासा, गॅस पुरवठा सुरळीत
West Bengal : बंगाल निवडणुकीत ट्विस्ट, ओवैसींच्या AIMIM चा हुमायूं कबीर यांच्याशी काडीमोड, 'एकला चलो रे'ची भूमिका
बंगाल निवडणुकीत ट्विस्ट, ओवैसींच्या AIMIM चा हुमायूं कबीर यांच्याशी काडीमोड, 'एकला चलो रे'ची भूमिका

व्हिडीओ

Arvind Sawant Shivsena: भगवा घेऊन आलोय, भगवा पांघरुन जाणार, संतापलेले अरविंद सावंतानी भर पत्रकारपरिषदेत पत्रही लिहलं,
Sanjay Raut on Eknath Shinde Operation Tiger: देवेंद्र फडणवीसांनी शिंदे गटाची डेडबॉडी केलीय, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेवर संजय राऊतांचा जोरदार पलटवार
Karuna Sharma Baramati Exclusive : अर्ज बाद करण्यासाठी मुंबईतील वकील पाठवला, धनूभाऊंवर आरोप
Suresh Dhas On Dhananjay Munde: आधी एकत्र बसले, मग म्हणाले, मुंडे-धस संघर्ष संपला नाही- सुरेश धस
Pankaja Munde Speech Beed: गोपीनाथ मुंडे हे नाव मी जगाला विसरु देणार नाही; शिकवण सांगत पंकजांचं भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitin Gadkari : मुंबई गोवा महामार्गाचं काम मे महिना संपण्याअगोदर पूर्ण करणार, नारायण राणेंसमोर नितीन गडकरींचा शब्द
मुंबई गोवा महामार्गाचं काम मे महिना संपण्याअगोदर पूर्ण करणार पण उद्घाटनाला येणार नाही, नितीन गडकरींनी कारण सांगितलं
Personal Loan : वैयक्तिक कर्ज घ्यायचा विचार करताय? 'या' 7 गोष्टींबाबत सतर्क राहा, अन्यथा मोठं नुकसान होण्याची शक्यता 
वैयक्तिक कर्ज घ्यायचा विचार करताय? 'या' 7 गोष्टींबाबत सतर्क राहा, अन्यथा मोठं नुकसान होण्याची शक्यता 
मोठी बातमी : मोदी, शाहांसोबत शरद पवार, अडीच वर्षांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पोस्टरवर थोरल्या पवारांचा फोटो
मोदी, शाहांसोबत शरद पवार, अडीच वर्षांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पोस्टरवर थोरल्या पवारांचा फोटो
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 एप्रिल 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 एप्रिल 2026 | शुक्रवार
SIP : गुंतवणूकदारांचा एसआयपीवरील विश्वास वाढला, SIP खात्यांची संख्या 10 कोटींच्या पार, 2025-26 मध्ये विक्रमी गुंतवणूक
गुंतवणूकदारांचा एसआयपीवरील विश्वास वाढला, SIP खात्यांची संख्या 10 कोटींच्या पार, 2025-26 मध्ये विक्रमी गुंतवणूक
Devendra Fadnavis : भाडेतत्त्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी सक्षम यंत्रणा कार्यान्वित करा, देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
भाडेतत्त्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी सक्षम यंत्रणा कार्यान्वित करा, देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
RBI : डिजीटल फसवणूक रोखण्यासाठी मास्टरस्ट्रोक, UPI वरुन 10 हजार रुपये पाठवल्यास 1 तास वाट पाहावी लागणार,आरबीआय नवा नियम लागू करण्याची शक्यता
UPI वरुन 10 हजार रुपये पाठवल्यास 1 तास वाट पाहावी लागणार,आरबीआय नवा नियम लागू करण्याची शक्यता
तोपर्यंत आम्ही चर्चा करणार नाही; पाकिस्तानातील चर्चेला काही तास बाकी असतानाच इराणचा थेट पवित्रा? अमेरिका काय करणार, चर्चेसाठी ठरलेलं शिष्टमंडळ सुद्धा पोहोचलं नाही
तोपर्यंत आम्ही चर्चा करणार नाही; पाकिस्तानातील चर्चेला काही तास बाकी असतानाच इराणचा थेट पवित्रा? अमेरिका काय करणार, चर्चेसाठी ठरलेलं शिष्टमंडळ सुद्धा पोहोचलं नाही
Embed widget