एक्स्प्लोर
Advertisement
केजरीवाल आणि कपिल मिश्रा गुरु-शिष्य परंपरेचे खरे पाईक : योगेंद्र यादव
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि कपिल मिश्रा यांच्यातील वाद विकोपाला गेला असतानाच, आपचे माजी नेते आणि स्वराज्य इंडिया पार्टीचे संस्थापक योगेंद्र यादव यांनी दोघांवर टीका केली आहे. योगेंद्र यादव यांनी ट्वीट करुन केजरीवाल आणि कपिल मिश्रा दोघेही गुरु-शिष्य परंपरेचे खरे पाईक असल्याचं म्हणलं आहे.
योगेंद्र यादव यांनी केजरीवाल यांच्यावर टीका करताना कपिल मिश्रांचा परफॉर्मन्स पाहून गुरु (केजरीवाल) गुळ झाले, तर शिष्य (कपिल मिश्रा) साखर बनल्याचं म्हणलं आहे.Kejriwal-Kapil is a model of Guru-Shishya parampara! Today it seemed @KapilMishraAAP is outdoing his guru!
— Yogendra Yadav (@_YogendraYadav) May 14, 2017
Kapil repeats old but serious charges, needs probe. But why no action against BJP Cong on foreign funds? — Yogendra Yadav (@_YogendraYadav) May 14, 2017तसेच कपिल मिश्रा यांनी केजरीवालांवर केलेले आरोप जुने असले, तरी ते गंभीर असल्याचंही त्यांनी म्हणलं आहे. शिवाय, कपिल मिश्रांच्या आरोपांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. तसेच काळ्या पैशांच्या मुद्द्यावरुन भाजप आणि काँग्रेस गप्प का असा सवाल ही त्यांनी यावेळी विचारला. आम आदमी पार्टीतून निलंबित झालेले माजी मंत्री कपिल मिश्रा यांनी आज एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आपच्या देणगीबाबत केजरीवाल यांच्यावर गंभीर आरोप केले. ‘आप’मध्ये सर्रासपणे काळ्याचं पाढरं केलं जातं : कपिल मिश्रा ‘आप’ने निवडणूक आयोगाला पक्षाच्या निधीबाबत चुकीची माहिती दिली. वास्तविक, आपने बनावट कंपन्यांकडून देणगी घेतली असून, अनेकांचा काळा पैसा सर्रासपणे पांढरा केला गेला. 2013-14 मध्ये आपच्या बँके खात्यात 45 कोटी रुपये जमा झाले, मात्र वेबसाईटवर केवळ 19 कोटी रुपये दाखवण्यात आले. म्हणजेच 26 कोटी रुपये लपवले, असा सनसनाटी आरोप कपिल मिश्रा यांनी केला. कपिल मिश्रांनी यावेळी केजरीवालांच्या राजीनाम्याचीही मागणी केली. पत्रकार परिषदेमध्ये बोलतानाच पाच दिवसांपासून उपोषण करणारे कपिल मिश्रा बेशुद्ध झाले. संबंधित बातम्या
केजरीवालांवर आरोप करताना कपिल मिश्रा पत्रकार परिषदेतच बेशुद्ध
केजरीवालांनी सत्येंद्र जैनांकडून दोन कोटी घेतले : कपिल मिश्रा
कपिल मिश्रांच्या आरोपानंतर अण्णा हजारेंचं केजरीवालांवर टीकास्त्र
‘आप’चे माजी मंत्री कपिल मिश्रांना जीवे मारण्याची धमकी
केजरीवालांविरोधात उपोषण, आमदार कपिल मिश्रांवर हल्ला
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement