एक्स्प्लोर

काश्मिरात चिमुकलीची बलात्कार करुन हत्या

चिमुकलीने आरडाओरड करु नये म्हणून गुंगीचे औषध दिले जात होते. नराधमांनी अनन्वित अत्याचारानंतर असिफाची हत्या केली.

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या कठुआमध्ये 8 वर्षीय मुलीवर झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील आठव्या आरोपीविरोधात सोमवारी आरोपपत्र दाखल करण्यात आलं. दरम्यान, या घटनेनंतर आता सर्व स्तरातून कठोर प्रतिक्रिया उमटत आहेत. चिमुकलीवर अमानुष अत्याचार जम्मू-काश्मीरच्या कठुआमध्ये 8 वर्षीय मुलीवर झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील आठव्या आरोपीविरोधात सोमवारी आरोपपत्र दाखल करण्यात आलं. दरम्यान, या घटनेनंतर आता सर्व स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. 10 जानेवारीला मुलगी खेचर चारण्यासाठी कठुआजवळच्या जंगलात गेली होती. तिथून तिचं एका अल्पवयीन आरोपीने अपहरण केलं आणि जवळच्या मंदिराच्या तळघरात लपवलं. सात ते आठ दिवस नराधमांनी तिच्यावर आळीपाळीने अमानुष अत्याचार केले. या नराधमांनी अनन्वित अत्याचारानंतर तिची हत्या केली. शोधाशोध करुन थकल्यावर 12 जानेवारीला तिच्या कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार केली. 17 जानेवारीला जंगलात तिचा मृतदेह अतिशय भीषण अवस्थेत आढळून आला. या प्रकरणाचा तपास स्थानिक पोलिसांकडून एसआयटीकडे सोपवण्यात आला. मुख्य आरोपी आणि माजी सरकारी अधिकारी संजी राम हा दोन महिने फरार होता. मार्चमध्ये संजी राम स्वत: पोलिसांसमोर हजर झाला. मेरठमधून त्याचा मुलगा विशालला अटक करण्यात आली. संजी रामला मदत करणं आणि चिमुकलीवर अत्याचार केल्याप्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांनाही अटक करण्यात आली आहे. दोन महिन्यांनी आरोपपत्र दाखल करण्यास वकिलांनी विरोध केल्याने देशभरातून संतापाची लाट उसळली आहे. वकिलांचा आरोपींना पाठिंबा धक्कादायक म्हणजे, जम्मू बार असोसिएशनने जम्मू-काश्मीर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या कारवाईविरोधातच निदर्शनं केली. या बार असोसिएशनने या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे देण्याची मागणी केली. चित्रपट, क्रीडासह अनेक क्षेत्रातील दिग्गज आक्रमक प्रियंका चोप्रा, अनुष्का शर्मा, संजय दत्त, सोनम कपूर, रेणुका शहाणे, फरहान अख्तर, जावेद अख्तर, रितेश देशमुख, टेनिस स्टार सानिया मिर्झा, माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर यांसह अनेक दिग्गजांनी ट्वीटरवरुन तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. काँग्रेसचा कँडल मार्च उन्नाव आणि कठुआ बलात्कार प्रकरणाच्या निषेधार्थ काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी मध्यरात्री 12 वाजता दिल्लीतील इंडिया गेटवर मोर्चा काढला. बेटी पढाओ बेटी बचाओचा नारा देणाऱ्या सरकारनं महिलांवरील होणाऱ्या अत्याचारावर कठोर पावलं उचलावीत असा सल्ला राहुल गांधींनी दिला. राहुल गांधींसोबत प्रियांका गांधी, गुलाम नबी आझाद, अहमद पटेल यांच्यासह हजारोंच्या संख्येनं काँग्रेस कार्यकर्ते या मेणबत्ती मोर्चात सहभागी झाले होते. नवी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयापासून या मोर्चाला सुरुवात होऊन रात्री 1 च्या सुमारास हा मोर्चाचा समारोप झाला. न्याय मिळेल : मेहबूबा मुफ्ती “चिमुकलीला न्याय मिळवून देण्याच्या मार्गात कोणतीही अडचण येणार नाही. शिवाय, काही लोक किंवा गटांची बेजबाबदार वक्तव्य आणि कृती कायद्याच्या मार्गात अडथळा ठरणार नाही, याची खबरदारी घेऊ. योग्य ती कारवाई केली जाईल. वेगाने तपास करुन, न्याय दिला जाईल.”, असे जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी ट्वीटद्वारे सांगितले. कठुआसारखी घटना पुन्हा होणार नाही, यासाठी कायदा आणू. असा कायदा आणू, ज्यामुळे आरोपी  अल्पवयीन असला, तरी त्याला मृत्यूदंडाची शिक्षा अनिवार्य होईल, असंही मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Naxalism : नक्षलबारी ते गडचिरोली, भारतातील नक्षलवादाचा इतिहास काय? बंदुकीचा आवाज थांबतोय, विकासाकडे पाऊल पडणार का?
नक्षलबारी ते गडचिरोली, भारतातील नक्षलवादाचा इतिहास काय? बंदुकीचा आवाज थांबतोय, विकासाकडे पाऊल पडणार का?
Silver Rate : चांदीच्या दरवाढीला अचानक  ब्रेक, चांदी  8000 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या सोन्याचे नवे दर 
चांदीच्या दरवाढीला अचानक  ब्रेक, चांदी  8000 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या सोन्याचे नवे दर 
MSRTC : ऐन दिवाळीत एसटी आरक्षण प्रणाली ठप्प, नव्या सॉफ्टवेअरचा प्रवाशांना नाहक त्रास, कर्मचारीही वैतागले
ऐन दिवाळीत एसटी आरक्षण प्रणाली ठप्प, नव्या सॉफ्टवेअरचा प्रवाशांना नाहक त्रास, कर्मचारीही वैतागले
आशिया कपमध्ये भारताविरुद्ध सलग तीन पराभव सलमान आगाला महागात पडणार, पाकिस्तान नवा कॅप्टन निवडणार, या खेळाडूच्या नावाची चर्चा
आशिया कपमध्ये भारताविरुद्ध तीनवेळा पराभव, सलमान आगाचं कर्णधारपद जाणार?पाकिस्तानला नवा कॅप्टन मिळणार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

ECI Controversy: 'निवडणूक आयोग ही भाजपची एक्सटेंडेड शाखा', खासदार Sanjay Raut यांचा थेट हल्लाबोल
Fake Voter ID : 'Donald Trump' चं बोगस आधारकार्ड, Rohit Pawar यांचा थेट आरोप
Battleground Thane: 'अब की बार ७० पार', ठाण्यात BJP चा नारा, Eknath Shinde गटात नाराजीचा सूर
Ram Mandir Station Delivery :: 'बाळाचं डोकं बाहेर आलं होतं', धावत्या ट्रेनमध्ये महिलेची प्रसूती
Bulldozer Action: Satpur गोळीबार प्रकरणातील आरोपी, RPI जिल्हाध्यक्ष Prakash Londhe यांच्या Nashik मधील अनधिकृत बांधकामावर बुलडोझर!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Naxalism : नक्षलबारी ते गडचिरोली, भारतातील नक्षलवादाचा इतिहास काय? बंदुकीचा आवाज थांबतोय, विकासाकडे पाऊल पडणार का?
नक्षलबारी ते गडचिरोली, भारतातील नक्षलवादाचा इतिहास काय? बंदुकीचा आवाज थांबतोय, विकासाकडे पाऊल पडणार का?
Silver Rate : चांदीच्या दरवाढीला अचानक  ब्रेक, चांदी  8000 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या सोन्याचे नवे दर 
चांदीच्या दरवाढीला अचानक  ब्रेक, चांदी  8000 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या सोन्याचे नवे दर 
MSRTC : ऐन दिवाळीत एसटी आरक्षण प्रणाली ठप्प, नव्या सॉफ्टवेअरचा प्रवाशांना नाहक त्रास, कर्मचारीही वैतागले
ऐन दिवाळीत एसटी आरक्षण प्रणाली ठप्प, नव्या सॉफ्टवेअरचा प्रवाशांना नाहक त्रास, कर्मचारीही वैतागले
आशिया कपमध्ये भारताविरुद्ध सलग तीन पराभव सलमान आगाला महागात पडणार, पाकिस्तान नवा कॅप्टन निवडणार, या खेळाडूच्या नावाची चर्चा
आशिया कपमध्ये भारताविरुद्ध तीनवेळा पराभव, सलमान आगाचं कर्णधारपद जाणार?पाकिस्तानला नवा कॅप्टन मिळणार
Gujarat Cabinet Reshuffle : नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी उच्चस्तरिय बैठक अन् गुजरातच्या 16 मंत्र्यांचे राजीनामे, भाजपनं फेरबदल का केले?
मोदींच्या निवासस्थानी उच्चस्तरिय बैठक अन् गुजरातमध्ये भाजपनं भाकरी फिरवली, पटेलांना मंत्र्यांची नवी टीम मिळणार
Share Market : शेअर बाजारात पुन्हा तेजी सुरु, दिवाळीपूर्वी गुंतवणूकदार मालामाल, सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये तेजीची कारणं...
शेअर बाजाराला 'या' तीन कारणांमुळं झळाळी, सेन्सेक्स आणि निफ्टी 50 मध्ये तेजी, गुंतवणूकदार मालामाल
Gujarat Cabinet: गुजरात सरकारमध्ये राजकीय भूकंप! मुख्यमंत्री सोडून सर्वच्या सर्व मंत्र्यांचा राजीनामा; अमित शाह सुद्धा आज रात्रीच होम ग्राऊंडवर पोहोचणार
गुजरात सरकारमध्ये राजकीय भूकंप! मुख्यमंत्री सोडून सर्वच्या सर्व मंत्र्यांचा राजीनामा; अमित शाह सुद्धा आज रात्रीच होम ग्राऊंडवर पोहोचणार
अवघ्या 10 महिन्यांपूर्वी लग्नाच्या बेडीत, त्वचारोगतज्ज्ञ डॉक्टर पत्नी म्हणाली, पोटात दुखतंय; गॅस्ट्रो-सर्जन डॉक्टर पतीनं तिथंच संधी शोधली अन्... तब्बल सहा महिन्यांनी हत्येचा कट उघडकीस
अवघ्या 10 महिन्यांपूर्वी लग्नाच्या बेडीत, त्वचारोगतज्ज्ञ डॉक्टर पत्नी म्हणाली, पोटात दुखतंय; गॅस्ट्रो-सर्जन डॉक्टर पतीनं तिथंच संधी शोधली अन्... तब्बल सहा महिन्यांनी हत्येचा कट उघडकीस
Embed widget